मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
यिर्मया
1. {#1बाबेलविषयी परमेश्वराचा निर्णय } [QS]परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी बाबेलावर आणि [QE][QS]लेब-कामाईत[* बाबेलचे आणखीन एक नाव ] जे कोणी राहतात त्यांच्याविरुद्ध विध्वंसक वाऱ्याने [† आत्म्याने ]खळबळ उडवीन. [QE]
2. [QS]मी बाबेलाकडे परदेशीय पाठवीन. ते तिला पाखडून काढतील आणि तिचा देश उध्वस्त करतील, [QE][QS]कारण ते तिला अरिष्टाच्या दिवशी चहूकडून तिच्याविरूद्ध होतील. [QE]
3. [QS]तिरंदाजाने आपले धनुष्य वाकवू नये; त्यांनी चिलखते घालू नये. [QE][QS]तिच्या तरुणांना वाचवू नको. तिच्या सर्व सैन्याला विध्वंसकाच्या हवाली कर. [QE]
4. [QS]कारण जखमी लोक खास्द्यांच्या भूमीत पडतील. वधलेले तिच्या रस्त्यांवर पडतील. [QE]
5. [QS]कारण जरी इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरूद्ध केलेल्या अपराधांनी त्यांचा देश भरून गेला आहे, [QE][QS]तरी इस्राएलास व यहूदास, त्यांचा देव सेनाधीश परमेश्वर याने त्यांना सोडले नाही. [QE]
6. [QS]बाबेलामधून पळून जा. प्रत्येक मनुष्याने आपणास वाचवावे. तिच्या अन्यायात नष्ट होऊ नये. [QE][QS]कारण परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे. तो तिला तिचे सर्व प्रतिफळ भरून देईल. [QE]
7. [QS]बाबेल परमेश्वराच्या हातातील सोन्याचा पेला होता, तिने सर्व देशाला धुंद केले आहे. [QE][QS]राष्ट्रे तिचा द्राक्षरस प्याली आणि ते विवेकशून्य झाले. [QE]
8. [QS]बाबेल अकस्मात पडेल आणि नाश होईल. त्याची शकले पडतील. [QE][QS]तिच्यासाठी शोक करा. तिच्या वेदनेसाठी तिला औषध द्या. कदाचित् ती बरी होईल. [QE]
9. [QS]बाबेल बरी होण्याची आमची इच्छा होती, पण ती बरी झाली नाही, चला आपण सर्व तिला सोडून व [QE][QS]दूर आपल्या देशात जाऊ. कारण तिचा गुन्हा आकाशास पोहचला आहे; त्याचा आभाळापर्यंत ढीग झाला आहे. [QE]
10. [QS]परमेश्वराने आपली नितीमत्ता जाहीर केली आहे. या, [QE][QS]परमेश्वर आमचा देव याची कृत्ये आपण सीयोनांत सांगू या. [QE]
11. [QS]बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराने माद्य राजाचा आत्म्यास चिथावणी दिली आहे [QE][QS]कारण बाबेलाचा नाश करावा अशी त्याची योजना होती. [QE][QS]कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याचे मंदिर उध्वस्त केल्याबद्दलचा सूड आहे. [QE]
12. [QS]बाबेलाच्या तटासमोर झेंडा उभारा. पहारा बळकट करा. [QE][QS]पहारेकरी ठेवा; जे कोणी नगरातून पळून येतील त्यांना पकडण्यासाठी सैनिकांना लपवा, [QE][QS]कारण परमेश्वराने बाबेलाच्या रहिवाश्याविरूद्ध जी योजना करून सांगितले ते त्याने केलेच आहे. [QE]
13. [QS]तुम्ही लोक जे बहुत पाण्याच्या प्रवाहाजवळ राहतात, जे तुम्ही लोक खजिन्यांनी धनवान आहात, [QE][QS]तुझा शेवट आला आहे. तुझ्या आयुष्याची दोरी आता संक्षीप्त केली आहे. [QE]
14. [QS]सेनाधीश परमेश्वराने आपल्याच जीविताची शपथ वाहिली आहे की, “टोळाच्या पीडेप्रमाणे, मी तुला तुझ्या शत्रूंनी भरीन.” [QE][QS]ते तुझ्याविरूद्ध युद्धाची आरोळी करतील. [QE]
15. [QS]त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने निर्माण केली, त्याने आपल्या ज्ञानाने कोरडी भूमी स्थापिली [QE][QS]आपल्या बुद्धीने आकाश पसरिले; [QE]
16. [QS]जेव्हा तो गरजतो, तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो, कारण तो पृथ्वीच्या शेवटापासून धुके वर आणतो. [QE][QS]तो पावसासाठी वीजा निर्माण करतो आणि आपल्या कोठारातून वारा काढून पाठवतो. [QE]
17. [QS]प्रत्येक मनुष्य पशूसारखा ज्ञानहीन झाला आहे; प्रत्येक धातु कारागीर आपल्या मूर्तीमुळे लज्जित झाला आहे. [QE][QS]कारण त्याच्या ओतीव मूर्ती खोट्या आहेत. तेथे त्यांच्यात जीवन नाही. [QE]
18. [QS]त्या निरुपयोगी आहेत, त्या चेष्टेचे काम आहे. त्यांच्या शिक्षेच्या दिवशी त्या नष्ट होतील. [QE]
19. [QS]पण देव, याकोबाचा हिस्सा, त्यासारखा नाही, कारण तो सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे; [QE][QS]त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे. [QE]
20. [QS]तू माझा लढाईचा हातोडा आहेस, माझे लढाईचे हत्यार आहेस. [QE][QS]तुझ्याबरोबर मी राष्ट्रांना मोडून तुकडे तुकडे करीन आणि राज्यांचा नाश करीन. [QE]
21. [QS]तुझ्याबरोबर मी घोडे आणि त्यांचे स्वार त्यांचे तुकडे तुकडे करीन, तुझ्याबरोबर मी त्यांचे रथ आणि सारथी ह्यांचे तुकडे तुकडे करीन. [QE]
22. [QS]तुझ्याबरोबर मी प्रत्येक पुरुष आणि स्त्रिया यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी वृद्ध आणि तरुण यांचे तुकडे तुकडे करीन. [QE][QS]तुझ्याबरोबर मी तरुण पुरुष आणि कुमारी मुलगी यांचे तुकडे तुकडे करीन. [QE]
23. [QS]तुझ्याबरोबर मी मेंढपाळ व त्याचे कळप यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी शेतकरी आणि त्यांच्या बैलांची जोडी यांचे तुकडे तुकडे करीन. [QE][QS]तुझ्याबरोबर मी राज्यकर्ते व अधिकारी यांचे तुकडे तुकडे करीन. [QE]
24. [QS]परमेश्वर असे म्हणतो, मी बाबेलाला व खास्द्यांच्या देशातल्या सर्व राहणाऱ्यांनी जे अनिष्ट त्यांनी तुमच्या समक्ष [QE][QS]सियोनेत केले आहे त्या सर्वांचे फळ भरून देईन. [QE]
25. [QS]परमेश्वर असे म्हणतो, “हे नाश करणाऱ्या पर्वता तू जो दुसऱ्यांचा नाश करतो, मी तुझ्याविरूद्ध आहे, सर्व पृथ्वीचा नाश करतो. [QE][QS]मी आपल्या हाताने तुला तडाखा देईल आणि तुला कड्यांवरुन खाली लोटून देईन. मग बेचिराख झालेल्या पर्वताप्रमाणे मी तुला करीन. [QE]
26. [QS]म्हणून ते तुझ्यामधून इमारतीच्या कोपऱ्यासाठी किंवा पायासाठी एकही दगड तोडून घेणार नाहीत; [QE][QS]कारण तुझा कायमचा विध्वंस होईल.” असे परमेश्वर म्हणतो. [QE]
27. [QS]पृथ्वीवर निशाण उंच करा. राष्ट्रांमध्ये कर्णा फुंका. तिच्यावर हल्ला करण्यासाठी राष्ट्रांना नेमा. [QE][QS]तिच्याविरूद्ध अरारात, मिन्नी, आष्कनाज या राज्यांना एकत्र बोलवा, [QE][QS]तिच्याविरूद्ध हल्ला करण्यास सेनापतीची निवड करा. विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या. [QE]
28. [QS]तिच्याविरूद्ध हल्ला करण्यासाठी राष्ट्रे माद्यांचे राजे, [QE][QS]त्यांचे सर्व अधिपती आणि राज्याच्या अंमलाखालचा सर्व देश सिद्ध करा. [QE]
29. [QS]भूमी हालेल व यातना होतील, कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे [QE][QS]परमेश्वराचे बाबेलाविरूद्धच्या ठरून योजना सिद्धीस जात आहेत. [QE]
30. [QS]बाबेलात सैनिक लढाई करायचे थांबले आहेत. ते त्यांच्या बालेकिल्ल्यात राहत आहेत. [QE][QS]त्यांची शक्ती संपली आहे; ते स्त्रिया असे झाले आहेत. तिची घरे पेटवली आहेत, तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत. [QE]
31. [QS]बाबेलाच्या राजाला त्याचे नगर सर्वस्वी काबीज झाले आहे [QE][QS]हे सांगण्यासाठी एका दूतामागून दुसरा दूत आणि एक जासूद दुसऱ्या जासूदाला सांगण्यास धावत आहेत. [QE]
32. [QS]नदीचे उतार जप्त झाले आहेत. शत्रू किल्ले जाळत आहेत [QE][QS]आणि बाबेलाचे लढणारी माणसे गोंधळून गेले आहेत. [QE]
33. [QS]कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मळण्याच्या वेळी खळे जसे असते त्यासारखी बाबेलाची कन्या आहे. [QE][QS]तिला पायाखाली तुडवण्याची वेळ आहे. अजून थोडा अवकाश आहे, मग तिच्या कापणीचा समय येईल.” [QE]
34. [QS]यरूशलेम म्हणते, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने मला खाऊन टाकले आहे. त्याने मला निचरून कोरडे केले आहे [QE][QS]आणि मला रिकामे पात्र करून ठेवले आहे. त्याने मला अजगराप्रमाणे गिळून टाकले आहे. [QE]
35. [QS]मजवर व माझ्या कुटूंबावर केलेला जुलूम बाबेलाविरूद्ध उलटो, असे सियोनामध्ये राहणारे म्हणतील. [QE][QS]“माझे रक्त पाडल्याचा दोष खास्द्यांच्या रहिवाश्याविरूद्ध फिरो.” असे यरूशलेम म्हणेल. [QE]
36. [QS]म्हणून परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी तुझ्या दाव्याविषयी बाजू मांडीन आणि तुझ्यासाठी सूड घेईन. [QE][QS]कारण मी बाबेलाचे समुद्र आटवीन आणि तिचे झरे सुकवून टाकीन. [QE]
37. [QS]बाबेल पडक्या इमारतीच्या दगडाविटांची रास, कोल्ह्यांचे राहण्याचे ठिकाण, दहशत, [QE][QS]चेष्टेचा विषय, निर्जन स्थान असे होईल. [QE]
38. [QS]“बाबेली जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील. ते सिंहाच्या छाव्याप्रमाणे गुरगुरतील. [QE]
39. [QS]जेव्हा ते अधाशीपणाने तप्त होतील, तेव्हा मी त्यांना मेजवानी देईन. मग त्यांनी उल्लास करून निरंतरची झोप घ्यावी [QE][QS]व जागे होऊ नये म्हणून मी त्यांना मस्त करीन.” असे परमेश्वर म्हणतो. [QE]
40. [QS]“मी त्यांना कोकरासारखे, मेंढे व बोकड यांच्यासारखे खाली कत्तल करण्यास घेऊन जाईन. [QE]
41. [QS]शेशख कसे काबीज झाले आहे! सर्व जगाचा प्रशंसा असा कसा धरला गेला आहे. [QE][QS]राष्ट्रांत बाबेल कशी उध्वस्त जागा झाली आहे. [QE]
42. [QS]बाबेलावर समुद्र आला आहे! ती त्याच्या गरजणाऱ्या लाटांनी झाकली आहे. [QE]
43. [QS]तिची नगरे नाश झाली आहेत, कोरडी भूमी आणि ओसाड प्रदेश झाली आहे, [QE][QS]आणि जिच्यात कोणी मनुष्य राहत नाही आणि कोणी मनुष्यप्राणी त्यातून जात नाही [QE]
44. [QS]म्हणून बाबेलात मी बेलाला शिक्षा करीन; त्यांने जे गिळले आहे ते मी त्याच्या तोंडातून बाहेर आणील, [QE][QS]आणि राष्ट्रे त्याच्याकडे आपल्या संततीला बरोबर घेऊन वाहणार नाही. बाबेलाची भिंत पडेल. [QE]
45. [QS]माझ्या लोकांनो, बाबेलाच्या शहरातून बाहेर या. माझ्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येकजण आपला जीव वाचवा. [QE]
46. [QS]देशातील जे वर्तमान ऐकण्यात येईल त्यांने भिऊ नका अथवा आपले हृदय खचू देऊ नका. [QE][QS]कारण एका वर्षात वर्तमान येईल. यानंतर पुढच्या वर्षात वर्तमान येईल, [QE][QS]आणि देशात हिंसाचार होईल. राज्यकर्ते राज्यकर्त्याविरूद्ध होतील. [QE]
47. [QS]यास्तव, पाहा, दिवस येत आहेत की, जेव्हा मी बाबेलाच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करील. [QE][QS]तेव्हा तिचा संपूर्ण देश लज्जित होईल, आणि तिचे सर्व वधलेले तिच्यामध्ये पडतील. [QE]
48. [QS]मग आकाश व पृथ्वी आणि त्यामध्ये जे काही आहे ते सर्व बाबेलावर आनंद करतील. [QE][QS]कारण तिचा नाश करणारा उत्तरेकडून येईल.” परमेश्वर असे म्हणतो. [QE]
49. [QS]बाबेलाने जसे इस्राएलाचे वधलेले पडतील असे केले आहे, [QE][QS]तसे तिच्या देशात वधलेले सर्व बाबेलात पडतील. [QE]
50. [QS]जे तुम्ही तलवारीपासून वाचले आहात, दूर जा! थांबू नका. [QE][QS]दुरून परमेश्वराचे स्मरण करा. यरूशलेमे तुमच्या मनात येवो. [QE]
51. [QS]“आम्ही अपमान ऐकला आहे, म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत. लाजेने आमची तोंडे झाकली आहेत, [QE][QS]कारण परमेश्वराच्या घरातील पवित्र स्थानात परक्यांनी प्रवेश केला आहे.” [QE]
52. [QS]यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, मी तिच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करीन, [QE][QS]आणि तिच्या देशात जखमी झालेले कण्हतील. [QE]
53. [QS]कारण जरी बाबेल आकाशापर्यंत वर चढली किंवा जरी तिने आपले बळाचे उंचस्थान मजबूत केले, [QE][QS]तरी माझ्याकडून नाश करणारे तिच्यावर येतील. असे परमेश्वर म्हणतो. [QE]
54. [QS]“बाबेलातून दुःखाच्या आरोळीचा, खास्द्यांच्या देशातून मोठा कोसळण्याचा आवाज येतो. [QE]
55. [QS]कारण परमेश्वर बाबेलाचा नाश करत आहे. तिच्यातील मोठा आवाज तो नष्ट करत आहे. [QE][QS]त्यांचे शत्रू बहुत जलांच्या लाटांप्रमाणे गर्जना करीत आहेत. त्यांच्या गर्जनेचा गोंगाट फार बलवान होत आहे. [QE]
56. [QS]कारण तिच्यावर, म्हणजे बाबेलाविरूद्ध नाश करणारा आला आहे, आणि तिचे योद्धे पकडले गेले आहेत. [QE][QS]त्यांचे धनुष्ये मोडली आहेत, कारण परमेश्वर सूड घेणारा देव आहे. तो खचित प्रतिफल भरून देईल. [QE]
57. [QS]कारण मी तिचे सरदार, तिचे ज्ञानी, तिचे अधिकारी आणि तिचे सैनिक मस्त होतील [QE][QS]व ते अंत नसणाऱ्या झोपेत झोपतील आणि कधी जागे होणार नाहीत.” [QE][QS]असे राजाचे म्हणणे आहे; सेनाधीश परमेश्वर त्याचे नाव आहे. [QE]
58. [QS]सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “बाबेलाची जाड तटबंदी जमीनदोस्त केली जाईल, [QE][QS]आणि तिची उंच प्रवेशद्वारे जाळली जातील. मग तिच्या मदतीला येणाऱ्या लोकांची मेहनत निरुपयोगी होईल. [QE][QS]जी प्रत्येकगोष्ट राष्ट्र तिच्यासाठी करण्याचा प्रयत्न करेल ती जाळण्यात येईल.” [QE]
59. [QS]महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा सारया [QE][QS]हा जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर त्याच्या राज्याच्या चौथ्या वर्षी, [QE][QS]बाबेलास गेला तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याने त्यास आज्ञापिले ते हे. कारण सराया हा प्रमुख अधिकारी होता.
60. यिर्मयाने बाबेलावर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलाविषयीची ही सर्व वचने एका गुंडाळीवर लिहिली होती. [QE]
61. [PS]यिर्मया सरायाला म्हणाला, “जेव्हा, तू बाबेलास जाशील तेव्हा ही सर्व वचने वाचण्याची खात्री करून घे.
62. आणि म्हण, ‘हे परमेश्वरा, तू स्वतः या स्थानाविषयी बोलला आहेस की, ते नष्ट होईल. मग तेथे कोणी रहिवासी किंवा लोक व पशू राहणार नाहीत. ती कायमची टाकाऊ होईल.’ [PE]
63. [PS]मग जेव्हा ही गुंडाळी वाचून संपताच त्यास एक दगड बांध आणि फरात नदीमध्ये फेकून दे.
64. म्हण ‘बाबेल याप्रमाणे बुडेल. जे अरिष्ट मी तिच्याविरूद्ध पाठवणार आहे त्यामुळे ती कधीही वर येणार नाही आणि ते थकून जातील.” येथे यिर्मयाची वचने संपली. [PE]
Total 52 अध्याय, Selected धडा 51 / 52
बाबेलविषयी परमेश्वराचा निर्णय 1 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी बाबेलावर आणि लेब-कामाईत* बाबेलचे आणखीन एक नाव जे कोणी राहतात त्यांच्याविरुद्ध विध्वंसक वाऱ्याने † आत्म्याने खळबळ उडवीन. 2 मी बाबेलाकडे परदेशीय पाठवीन. ते तिला पाखडून काढतील आणि तिचा देश उध्वस्त करतील, कारण ते तिला अरिष्टाच्या दिवशी चहूकडून तिच्याविरूद्ध होतील. 3 तिरंदाजाने आपले धनुष्य वाकवू नये; त्यांनी चिलखते घालू नये. तिच्या तरुणांना वाचवू नको. तिच्या सर्व सैन्याला विध्वंसकाच्या हवाली कर. 4 कारण जखमी लोक खास्द्यांच्या भूमीत पडतील. वधलेले तिच्या रस्त्यांवर पडतील. 5 कारण जरी इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरूद्ध केलेल्या अपराधांनी त्यांचा देश भरून गेला आहे, तरी इस्राएलास व यहूदास, त्यांचा देव सेनाधीश परमेश्वर याने त्यांना सोडले नाही. 6 बाबेलामधून पळून जा. प्रत्येक मनुष्याने आपणास वाचवावे. तिच्या अन्यायात नष्ट होऊ नये. कारण परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे. तो तिला तिचे सर्व प्रतिफळ भरून देईल. 7 बाबेल परमेश्वराच्या हातातील सोन्याचा पेला होता, तिने सर्व देशाला धुंद केले आहे. राष्ट्रे तिचा द्राक्षरस प्याली आणि ते विवेकशून्य झाले. 8 बाबेल अकस्मात पडेल आणि नाश होईल. त्याची शकले पडतील. तिच्यासाठी शोक करा. तिच्या वेदनेसाठी तिला औषध द्या. कदाचित् ती बरी होईल. 9 बाबेल बरी होण्याची आमची इच्छा होती, पण ती बरी झाली नाही, चला आपण सर्व तिला सोडून व दूर आपल्या देशात जाऊ. कारण तिचा गुन्हा आकाशास पोहचला आहे; त्याचा आभाळापर्यंत ढीग झाला आहे. 10 परमेश्वराने आपली नितीमत्ता जाहीर केली आहे. या, परमेश्वर आमचा देव याची कृत्ये आपण सीयोनांत सांगू या. 11 बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराने माद्य राजाचा आत्म्यास चिथावणी दिली आहे कारण बाबेलाचा नाश करावा अशी त्याची योजना होती. कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याचे मंदिर उध्वस्त केल्याबद्दलचा सूड आहे. 12 बाबेलाच्या तटासमोर झेंडा उभारा. पहारा बळकट करा. पहारेकरी ठेवा; जे कोणी नगरातून पळून येतील त्यांना पकडण्यासाठी सैनिकांना लपवा, कारण परमेश्वराने बाबेलाच्या रहिवाश्याविरूद्ध जी योजना करून सांगितले ते त्याने केलेच आहे. 13 तुम्ही लोक जे बहुत पाण्याच्या प्रवाहाजवळ राहतात, जे तुम्ही लोक खजिन्यांनी धनवान आहात, तुझा शेवट आला आहे. तुझ्या आयुष्याची दोरी आता संक्षीप्त केली आहे. 14 सेनाधीश परमेश्वराने आपल्याच जीविताची शपथ वाहिली आहे की, “टोळाच्या पीडेप्रमाणे, मी तुला तुझ्या शत्रूंनी भरीन.” ते तुझ्याविरूद्ध युद्धाची आरोळी करतील. 15 त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने निर्माण केली, त्याने आपल्या ज्ञानाने कोरडी भूमी स्थापिली आपल्या बुद्धीने आकाश पसरिले; 16 जेव्हा तो गरजतो, तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो, कारण तो पृथ्वीच्या शेवटापासून धुके वर आणतो. तो पावसासाठी वीजा निर्माण करतो आणि आपल्या कोठारातून वारा काढून पाठवतो. 17 प्रत्येक मनुष्य पशूसारखा ज्ञानहीन झाला आहे; प्रत्येक धातु कारागीर आपल्या मूर्तीमुळे लज्जित झाला आहे. कारण त्याच्या ओतीव मूर्ती खोट्या आहेत. तेथे त्यांच्यात जीवन नाही. 18 त्या निरुपयोगी आहेत, त्या चेष्टेचे काम आहे. त्यांच्या शिक्षेच्या दिवशी त्या नष्ट होतील. 19 पण देव, याकोबाचा हिस्सा, त्यासारखा नाही, कारण तो सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे. इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे; त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे. 20 तू माझा लढाईचा हातोडा आहेस, माझे लढाईचे हत्यार आहेस. तुझ्याबरोबर मी राष्ट्रांना मोडून तुकडे तुकडे करीन आणि राज्यांचा नाश करीन. 21 तुझ्याबरोबर मी घोडे आणि त्यांचे स्वार त्यांचे तुकडे तुकडे करीन, तुझ्याबरोबर मी त्यांचे रथ आणि सारथी ह्यांचे तुकडे तुकडे करीन. 22 तुझ्याबरोबर मी प्रत्येक पुरुष आणि स्त्रिया यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी वृद्ध आणि तरुण यांचे तुकडे तुकडे करीन. तुझ्याबरोबर मी तरुण पुरुष आणि कुमारी मुलगी यांचे तुकडे तुकडे करीन. 23 तुझ्याबरोबर मी मेंढपाळ व त्याचे कळप यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी शेतकरी आणि त्यांच्या बैलांची जोडी यांचे तुकडे तुकडे करीन. तुझ्याबरोबर मी राज्यकर्ते व अधिकारी यांचे तुकडे तुकडे करीन. 24 परमेश्वर असे म्हणतो, मी बाबेलाला व खास्द्यांच्या देशातल्या सर्व राहणाऱ्यांनी जे अनिष्ट त्यांनी तुमच्या समक्ष सियोनेत केले आहे त्या सर्वांचे फळ भरून देईन. 25 परमेश्वर असे म्हणतो, “हे नाश करणाऱ्या पर्वता तू जो दुसऱ्यांचा नाश करतो, मी तुझ्याविरूद्ध आहे, सर्व पृथ्वीचा नाश करतो. मी आपल्या हाताने तुला तडाखा देईल आणि तुला कड्यांवरुन खाली लोटून देईन. मग बेचिराख झालेल्या पर्वताप्रमाणे मी तुला करीन. 26 म्हणून ते तुझ्यामधून इमारतीच्या कोपऱ्यासाठी किंवा पायासाठी एकही दगड तोडून घेणार नाहीत; कारण तुझा कायमचा विध्वंस होईल.” असे परमेश्वर म्हणतो. 27 पृथ्वीवर निशाण उंच करा. राष्ट्रांमध्ये कर्णा फुंका. तिच्यावर हल्ला करण्यासाठी राष्ट्रांना नेमा. तिच्याविरूद्ध अरारात, मिन्नी, आष्कनाज या राज्यांना एकत्र बोलवा, तिच्याविरूद्ध हल्ला करण्यास सेनापतीची निवड करा. विक्राळ टोळांप्रमाणे घोडे येऊ द्या. 28 तिच्याविरूद्ध हल्ला करण्यासाठी राष्ट्रे माद्यांचे राजे, त्यांचे सर्व अधिपती आणि राज्याच्या अंमलाखालचा सर्व देश सिद्ध करा. 29 भूमी हालेल व यातना होतील, कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे परमेश्वराचे बाबेलाविरूद्धच्या ठरून योजना सिद्धीस जात आहेत. 30 बाबेलात सैनिक लढाई करायचे थांबले आहेत. ते त्यांच्या बालेकिल्ल्यात राहत आहेत. त्यांची शक्ती संपली आहे; ते स्त्रिया असे झाले आहेत. तिची घरे पेटवली आहेत, तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत. 31 बाबेलाच्या राजाला त्याचे नगर सर्वस्वी काबीज झाले आहे हे सांगण्यासाठी एका दूतामागून दुसरा दूत आणि एक जासूद दुसऱ्या जासूदाला सांगण्यास धावत आहेत. 32 नदीचे उतार जप्त झाले आहेत. शत्रू किल्ले जाळत आहेत आणि बाबेलाचे लढणारी माणसे गोंधळून गेले आहेत. 33 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, “मळण्याच्या वेळी खळे जसे असते त्यासारखी बाबेलाची कन्या आहे. तिला पायाखाली तुडवण्याची वेळ आहे. अजून थोडा अवकाश आहे, मग तिच्या कापणीचा समय येईल.” 34 यरूशलेम म्हणते, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सराने मला खाऊन टाकले आहे. त्याने मला निचरून कोरडे केले आहे आणि मला रिकामे पात्र करून ठेवले आहे. त्याने मला अजगराप्रमाणे गिळून टाकले आहे. 35 मजवर व माझ्या कुटूंबावर केलेला जुलूम बाबेलाविरूद्ध उलटो, असे सियोनामध्ये राहणारे म्हणतील. “माझे रक्त पाडल्याचा दोष खास्द्यांच्या रहिवाश्याविरूद्ध फिरो.” असे यरूशलेम म्हणेल. 36 म्हणून परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी तुझ्या दाव्याविषयी बाजू मांडीन आणि तुझ्यासाठी सूड घेईन. कारण मी बाबेलाचे समुद्र आटवीन आणि तिचे झरे सुकवून टाकीन. 37 बाबेल पडक्या इमारतीच्या दगडाविटांची रास, कोल्ह्यांचे राहण्याचे ठिकाण, दहशत, चेष्टेचा विषय, निर्जन स्थान असे होईल. 38 “बाबेली जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील. ते सिंहाच्या छाव्याप्रमाणे गुरगुरतील. 39 जेव्हा ते अधाशीपणाने तप्त होतील, तेव्हा मी त्यांना मेजवानी देईन. मग त्यांनी उल्लास करून निरंतरची झोप घ्यावी व जागे होऊ नये म्हणून मी त्यांना मस्त करीन.” असे परमेश्वर म्हणतो. 40 “मी त्यांना कोकरासारखे, मेंढे व बोकड यांच्यासारखे खाली कत्तल करण्यास घेऊन जाईन. 41 शेशख कसे काबीज झाले आहे! सर्व जगाचा प्रशंसा असा कसा धरला गेला आहे. राष्ट्रांत बाबेल कशी उध्वस्त जागा झाली आहे. 42 बाबेलावर समुद्र आला आहे! ती त्याच्या गरजणाऱ्या लाटांनी झाकली आहे. 43 तिची नगरे नाश झाली आहेत, कोरडी भूमी आणि ओसाड प्रदेश झाली आहे, आणि जिच्यात कोणी मनुष्य राहत नाही आणि कोणी मनुष्यप्राणी त्यातून जात नाही 44 म्हणून बाबेलात मी बेलाला शिक्षा करीन; त्यांने जे गिळले आहे ते मी त्याच्या तोंडातून बाहेर आणील, आणि राष्ट्रे त्याच्याकडे आपल्या संततीला बरोबर घेऊन वाहणार नाही. बाबेलाची भिंत पडेल. 45 माझ्या लोकांनो, बाबेलाच्या शहरातून बाहेर या. माझ्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येकजण आपला जीव वाचवा. 46 देशातील जे वर्तमान ऐकण्यात येईल त्यांने भिऊ नका अथवा आपले हृदय खचू देऊ नका. कारण एका वर्षात वर्तमान येईल. यानंतर पुढच्या वर्षात वर्तमान येईल, आणि देशात हिंसाचार होईल. राज्यकर्ते राज्यकर्त्याविरूद्ध होतील. 47 यास्तव, पाहा, दिवस येत आहेत की, जेव्हा मी बाबेलाच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करील. तेव्हा तिचा संपूर्ण देश लज्जित होईल, आणि तिचे सर्व वधलेले तिच्यामध्ये पडतील. 48 मग आकाश व पृथ्वी आणि त्यामध्ये जे काही आहे ते सर्व बाबेलावर आनंद करतील. कारण तिचा नाश करणारा उत्तरेकडून येईल.” परमेश्वर असे म्हणतो. 49 बाबेलाने जसे इस्राएलाचे वधलेले पडतील असे केले आहे, तसे तिच्या देशात वधलेले सर्व बाबेलात पडतील. 50 जे तुम्ही तलवारीपासून वाचले आहात, दूर जा! थांबू नका. दुरून परमेश्वराचे स्मरण करा. यरूशलेमे तुमच्या मनात येवो. 51 “आम्ही अपमान ऐकला आहे, म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत. लाजेने आमची तोंडे झाकली आहेत, कारण परमेश्वराच्या घरातील पवित्र स्थानात परक्यांनी प्रवेश केला आहे.” 52 यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, मी तिच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करीन, आणि तिच्या देशात जखमी झालेले कण्हतील. 53 कारण जरी बाबेल आकाशापर्यंत वर चढली किंवा जरी तिने आपले बळाचे उंचस्थान मजबूत केले, तरी माझ्याकडून नाश करणारे तिच्यावर येतील. असे परमेश्वर म्हणतो. 54 “बाबेलातून दुःखाच्या आरोळीचा, खास्द्यांच्या देशातून मोठा कोसळण्याचा आवाज येतो. 55 कारण परमेश्वर बाबेलाचा नाश करत आहे. तिच्यातील मोठा आवाज तो नष्ट करत आहे. त्यांचे शत्रू बहुत जलांच्या लाटांप्रमाणे गर्जना करीत आहेत. त्यांच्या गर्जनेचा गोंगाट फार बलवान होत आहे. 56 कारण तिच्यावर, म्हणजे बाबेलाविरूद्ध नाश करणारा आला आहे, आणि तिचे योद्धे पकडले गेले आहेत. त्यांचे धनुष्ये मोडली आहेत, कारण परमेश्वर सूड घेणारा देव आहे. तो खचित प्रतिफल भरून देईल. 57 कारण मी तिचे सरदार, तिचे ज्ञानी, तिचे अधिकारी आणि तिचे सैनिक मस्त होतील व ते अंत नसणाऱ्या झोपेत झोपतील आणि कधी जागे होणार नाहीत.” असे राजाचे म्हणणे आहे; सेनाधीश परमेश्वर त्याचे नाव आहे. 58 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “बाबेलाची जाड तटबंदी जमीनदोस्त केली जाईल, आणि तिची उंच प्रवेशद्वारे जाळली जातील. मग तिच्या मदतीला येणाऱ्या लोकांची मेहनत निरुपयोगी होईल. जी प्रत्येकगोष्ट राष्ट्र तिच्यासाठी करण्याचा प्रयत्न करेल ती जाळण्यात येईल.” 59 महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा सारया हा जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर त्याच्या राज्याच्या चौथ्या वर्षी, बाबेलास गेला तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याने त्यास आज्ञापिले ते हे. कारण सराया हा प्रमुख अधिकारी होता. 60 यिर्मयाने बाबेलावर जे सर्व अरिष्ट येणार होते ते म्हणजे बाबेलाविषयीची ही सर्व वचने एका गुंडाळीवर लिहिली होती. 61 यिर्मया सरायाला म्हणाला, “जेव्हा, तू बाबेलास जाशील तेव्हा ही सर्व वचने वाचण्याची खात्री करून घे. 62 आणि म्हण, ‘हे परमेश्वरा, तू स्वतः या स्थानाविषयी बोलला आहेस की, ते नष्ट होईल. मग तेथे कोणी रहिवासी किंवा लोक व पशू राहणार नाहीत. ती कायमची टाकाऊ होईल.’ 63 मग जेव्हा ही गुंडाळी वाचून संपताच त्यास एक दगड बांध आणि फरात नदीमध्ये फेकून दे. 64 म्हण ‘बाबेल याप्रमाणे बुडेल. जे अरिष्ट मी तिच्याविरूद्ध पाठवणार आहे त्यामुळे ती कधीही वर येणार नाही आणि ते थकून जातील.” येथे यिर्मयाची वचने संपली.
Total 52 अध्याय, Selected धडा 51 / 52
×

Alert

×

Marathi Letters Keypad References