मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
ईयोब
1. {#1देवाचे सामर्थ्य व ज्ञान ह्यांचा ईयोब पुरस्कार करतो }
2. [PS]नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला, [PE][QS]“तुम्हीच फक्त शहाणे लोक आहात, यामध्ये काही शंका नाहीत, तुमच्याबरोबरच शहाणपणही मरून जाईल. [QE]
3. [QS]माझे ही मन तुमच्या मनाइतकेच चांगले आहे, मीही तुमच्या इतकाच हुशार आहे. अहो खरेच, अशा प्रकारच्या गोष्टी कोणासही माहित नाहीत? [QE]
4. [QS]माझ्या शेजाऱ्यांना मी हसण्याचा विषय झालो आहे. ते म्हणतात, त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि त्यास त्याचे उत्तर मिळाले! मी चांगला आणि निष्पाप मानव आहे, पण तरीही ते मला हसतात. [QE]
5. [QS]जो कोणी सुखी आहे, त्याच्या मते संकट हे दुदैव आहे, जो संकटात पडत आहे, त्यांच्या विचारा प्रमाणे तो अधिक तिरस्कारास पात्र आहे. [QE]
6. [QS]परंतु चोरांचे तंबू समृध्द होतात. आणि जे लोक देवाला क्रोध आणतात ते निर्भय राहतात. केवळ त्यांच्या स्वत:चे हातच त्यांचे देव आहेत. [QE]
7. [QS]पण आता पशूंस विचार, ते तुला शिकवतील, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना विचार आणि ते तुम्हास सांगतील. [QE]
8. [QS]किंवा पृथ्वीशी बोला, ती तुला शिकवेल. समुद्रातील मासे तुला कळवतील कि, [QE]
9. [QS]या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हाताने केल्या, त्यांना जीवन दिले हे माहित नाही असा, त्यांच्या मध्ये कोण प्राणी आहे. [QE]
10. [QS]जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा प्रत्येक मनुष्य देवाच्या अधिपत्याखाली असतो. [QE]
11. [QS]ज्या प्रमाणे जिभेला अन्नांची चव समजते, तसेच कानास शब्दातील फरक कळणार नाही का [QE]
12. [QS]वृध्द माणसे शहाणी असतात. दीर्घायुष्याने समजुतदारपणा येतो. [QE]
13. [QS]देवाच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. त्याच्याजवळ चांगला उपदेश आणि समजूतदारपणाही आहे. [QE]
14. [QS]देव जेव्हा एखादी गोष्ट उध्वस्त करतो तेव्हा लोकांस ती परत उभारता येत नाही. देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करु शकत नाहीत. [QE]
15. [QS]पहा, जर त्याने पाऊस पडू दिला नाही तर पृथ्वी सुकून जाईल आणि जर त्याने पावसास मोकळे सोडले तर सारी पृथ्वी जलमय होऊन जाईल. [QE]
16. [QS]त्याच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. जिंकणारे आणि हरणारे सर्वच देवाच्या अधिन आहेत. [QE]
17. [QS]तो राज्यमंत्र्यांना दुखात अनवाणी पायांनी घेवून जातो, तो न्यायाधीशास मूर्ख ठरवतो. [QE]
18. [QS]तो राजाचा अधिकार काढून घेतो, त्याच्या कमरेस बंधन लावतो. [QE]
19. [QS]तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही. [QE]
20. [QS]तो विश्वासू उपदेशकाचा उपदेश काढून टाकतो, आणि वृद्धांची विद्वत्ता काढून घेतो. [QE]
21. [QS]तो राजकुमारावर तिरस्काराची ओतनी करतो आणि सत्तेचे बंधन काढून टाकतो. [QE]
22. [QS]तो अंधारातील रहस्ये प्रगट करितो. मृत्यूलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो. [QE]
23. [QS]तोच महान राष्ट्र बनवतो आणि तोच त्यांना नष्टही करतो. तो देशांना मोठे होऊ देतो आणि नंतर त्यातील लोकांस नष्ट करतो. [QE]
24. [QS]देव नेत्यांना मूर्ख बनवतो. तो त्यांना वाळवंटात इकडे तिकडे मार्गहीन भटकायला लावतो. [QE]
25. [QS]प्रकाशाविना ते अंधारात चाचपडतात, तो त्यांना दारु प्यायलेल्या मनुष्या सारखा झोकांड्या खाणारा बनवतो.” [QE]
Total 42 अध्याय, Selected धडा 12 / 42
देवाचे सामर्थ्य व ज्ञान ह्यांचा ईयोब पुरस्कार करतो 1 2 नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला, “तुम्हीच फक्त शहाणे लोक आहात, यामध्ये काही शंका नाहीत, तुमच्याबरोबरच शहाणपणही मरून जाईल. 3 माझे ही मन तुमच्या मनाइतकेच चांगले आहे, मीही तुमच्या इतकाच हुशार आहे. अहो खरेच, अशा प्रकारच्या गोष्टी कोणासही माहित नाहीत? 4 माझ्या शेजाऱ्यांना मी हसण्याचा विषय झालो आहे. ते म्हणतात, त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि त्यास त्याचे उत्तर मिळाले! मी चांगला आणि निष्पाप मानव आहे, पण तरीही ते मला हसतात. 5 जो कोणी सुखी आहे, त्याच्या मते संकट हे दुदैव आहे, जो संकटात पडत आहे, त्यांच्या विचारा प्रमाणे तो अधिक तिरस्कारास पात्र आहे. 6 परंतु चोरांचे तंबू समृध्द होतात. आणि जे लोक देवाला क्रोध आणतात ते निर्भय राहतात. केवळ त्यांच्या स्वत:चे हातच त्यांचे देव आहेत. 7 पण आता पशूंस विचार, ते तुला शिकवतील, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना विचार आणि ते तुम्हास सांगतील. 8 किंवा पृथ्वीशी बोला, ती तुला शिकवेल. समुद्रातील मासे तुला कळवतील कि, 9 या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हाताने केल्या, त्यांना जीवन दिले हे माहित नाही असा, त्यांच्या मध्ये कोण प्राणी आहे. 10 जगणारा प्रत्येक प्राणी आणि श्वास घेणारा प्रत्येक मनुष्य देवाच्या अधिपत्याखाली असतो. 11 ज्या प्रमाणे जिभेला अन्नांची चव समजते, तसेच कानास शब्दातील फरक कळणार नाही का 12 वृध्द माणसे शहाणी असतात. दीर्घायुष्याने समजुतदारपणा येतो. 13 देवाच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. त्याच्याजवळ चांगला उपदेश आणि समजूतदारपणाही आहे. 14 देव जेव्हा एखादी गोष्ट उध्वस्त करतो तेव्हा लोकांस ती परत उभारता येत नाही. देवाने जर एखाद्याला तुरुंगात टाकले तर लोक त्याची सुटका करु शकत नाहीत. 15 पहा, जर त्याने पाऊस पडू दिला नाही तर पृथ्वी सुकून जाईल आणि जर त्याने पावसास मोकळे सोडले तर सारी पृथ्वी जलमय होऊन जाईल. 16 त्याच्या ठायी ज्ञान आणि सामर्थ्य आहेत. जिंकणारे आणि हरणारे सर्वच देवाच्या अधिन आहेत. 17 तो राज्यमंत्र्यांना दुखात अनवाणी पायांनी घेवून जातो, तो न्यायाधीशास मूर्ख ठरवतो. 18 तो राजाचा अधिकार काढून घेतो, त्याच्या कमरेस बंधन लावतो. 19 तो याजकांचे सामर्थ्य काढून घेतो आणि मंदिरातील सेवकांना फारसे महत्व देत नाही. 20 तो विश्वासू उपदेशकाचा उपदेश काढून टाकतो, आणि वृद्धांची विद्वत्ता काढून घेतो. 21 तो राजकुमारावर तिरस्काराची ओतनी करतो आणि सत्तेचे बंधन काढून टाकतो. 22 तो अंधारातील रहस्ये प्रगट करितो. मृत्यूलोकातल्या काळोखापेक्षा अधिक काळोख असलेल्या ठिकाणी तो प्रकाश पाठवतो. 23 तोच महान राष्ट्र बनवतो आणि तोच त्यांना नष्टही करतो. तो देशांना मोठे होऊ देतो आणि नंतर त्यातील लोकांस नष्ट करतो. 24 देव नेत्यांना मूर्ख बनवतो. तो त्यांना वाळवंटात इकडे तिकडे मार्गहीन भटकायला लावतो. 25 प्रकाशाविना ते अंधारात चाचपडतात, तो त्यांना दारु प्यायलेल्या मनुष्या सारखा झोकांड्या खाणारा बनवतो.”
Total 42 अध्याय, Selected धडा 12 / 42
×

Alert

×

Marathi Letters Keypad References