1. {#1देव आपल्या निर्दोष ठरवील ही ईयोबाची खातरी }
2. [PS]नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला, [PE][QS]“तुम्ही मला किती वेळ माझ्या जीवाला त्रास देणार आहात? आणि शब्दांनी मला मोडणार आहात? [QE]
3. [QS]तुम्ही आतापर्यंत दहा वेळा माझा अपमान केला आहे. [QE][QS]तुम्ही कठोरतेने माझ्याबरोबर वागता त्याची लाजही बाळगत नाही [QE]
4. [QS]जर खरच मी काही चुक केली असेल तर, [QE][QS]ती चुक माझी मला आहे. [QE]
5. [QS]तुम्ही माझ्यापेक्षा चांगले आहात एवढेच तुम्हास दाखवायचे आहे, [QE][QS]माझी संकटे माझ्या चुकीमुळेच निर्माण झाली आहेत असे तुम्ही (उगीचच) म्हणता. [QE]
6. [QS]मग तुम्हास हे माहीती पाहिजे कि, [QE][QS]देवानेच मला पकडण्यासाठी जाळे टाकले आहे. [QE]
7. [QS]‘पाहा, असे मी ओरडतो कि मी चुकीचे केले आहे, पण कोणी ऐकले नाही. [QE][QS]मी मदतीसाठी जोरात ओरडलो तरी न्याय मिळत नाही. [QE]
8. [QS]मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला. [QE][QS]त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे. [QE]
9. [QS]देवाने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली. [QE][QS]आणि त्याने माझ्या डोक्यावरचा मुकुट काढून घेतला. [QE]
10. [QS]माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चाऱ्ही बाजूंनी झोडपतो. [QE][QS]एखादे झाड मुळासकट उपटून काढावे त्याप्रमाणे त्याने माझ्या आशा उपटून टाकल्या आहेत. [QE]
11. [QS]त्याचा क्रोध मला जाळीत आहे, [QE][QS]तो मला त्याचा एक शत्रू असे संबोधतो. [QE]
12. [QS]त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो [QE][QS]ते माझ्याभोवती मोर्चा उभारतात, [QE][QS]आणि ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात. [QE]
13. [QS]त्याने माझ्या भावांना माझ्यापासुन फार दूर केले आहे, [QE][QS]माझ्या सर्वांना दूर ठेवण्याचा अनुभव त्याने मला दिला आहे. [QE]
14. [QS]माझे नातलग मला सोडून गेले आहेत, [QE][QS]माझ्या जवळचे मित्र मला विसरले आहेत. [QE]
15. [QS]माझ्या घरी येणारे पाहुणे आणि माझ्या दासी मला परका आणि परदेशातला समजतात, [QE][QS]मी त्यांच्या दृष्टीने उपरा झालो आहे. [QE]
16. [QS]जरी मी माझ्या मुखाने याचना केली, [QE][QS]माझ्या नोकराला बोलावले, तरी तो मला उत्तर देत नाही, [QE]
17. [QS]माझी पत्नी माझ्या श्वासाचा तिरस्कार करते, [QE][QS]माझे स्वतःचे भाऊ आणि बहिणी[* भाऊ आणि बहिणी मुले-मुली ] माझा तिरस्कार करतात. [QE]
18. [QS]लहान मुलेदेखील मला चिडवतात, [QE][QS]जेव्हा मी बोलायला जातो तेव्हा ते माझ्या विरूद्ध बोलतात. [QE]
19. [QS]माझे जवळचे मित्रदेखील माझा तिरस्कार करतात. [QE][QS]माझे ज्यांच्यावर प्रेम आहे ते लोक देखील माझ्याविरुध्द गेले आहेत. [QE]
20. [QS]मी इतका कृश झालो आहे की माझी कातडी हाडांवर लोबंते, [QE][QS]मी केवळ दाताच्या कातडीने बचावलो आहे. [QE]
21. [QS]माझी दया येऊ द्या, मित्रांनो, तुम्हास माझी दया येऊ द्या! [QE][QS]कारण देवाचा हात मजवर पडला आहे. [QE]
22. [QS]तुम्ही माझा छळ असा करीत आहात जसे तुम्ही देव आहात. [QE][QS]माझ्या देहाला सतत त्रास देण्याचा तुम्हास कंटाळा येत नाही का? [QE]
23. [QS]अहो, मी जे बोलतो ते कुणीतरी लिहून ठेवावे! [QE][QS]अहो, ते पुस्तकात नमुद करून ठेवायला हवेत. [QE]
24. [QS]अहो, मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर [QE][QS]किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे. [QE]
25. [QS]माझा तारण करणारा जिवंत आहे याची मला खात्री आहे. [QE][QS]आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील. [QE]
26. [QS]मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल [QE][QS]तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन. [QE]
27. [QS]मी देवाला बघेन, तर मी स्वत:च त्यास पाहीन, [QE][QS]माझे डोळे त्यास पाहतील, आणि ते परक्यासारखे राहणार नाही. [QE][QS]माझा अतंरात्मा झुरत आहे. [QE]
28. [QS]या सगळ्याचे मूळ माझ्याकडेच आढळून आले आहे, [QE][QS]म्हणून याचा छळ कोणत्या प्रकारे करावा असे तुम्ही म्हणाल. [QE]
29. [QS]तर तुम्हास तलवारीची भीती वाटायला हवी, [QE][QS]कारण रागामुळे तलवारीने शासन होते, [QE][QS]यावरुन तुम्हास कळेल की न्याय आहे.” [QE]