1. {दुष्टाच्या प्रतिफळाचे सोफर वर्णन करतो} [PS] नंतर सोफर नामाथी उत्तर देऊन म्हणाला, [QBR]
2. “माझे विचार मला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत. [QBR] कारण त्याबद्दलची काळजी माझ्या मनात आहे. [QBR]
3. तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस, [QBR] परंतु उत्तर कसे द्यायचे ते माझे मन मला शिकवते जी माझ्या समजण्यापलीकडे आहे. [QBR]
4. तुला हे सत्य प्राचीन काळापासुन माहीती आहे, [QBR] जेव्हा देवाने मनुष्याची स्थापना पृथ्वीवर केली, तेव्हा पासून, [QBR]
5. दुष्टांचा जयजयकार फार कमी काळासाठी असतो, [QBR] अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो. [QBR]
6. त्याचा माहातम्य गगनाला जाऊन भिडेल, [QBR] आणि त्याचे मस्तक ढगांपर्यंत पोहोचू शकेल. [QBR]
7. परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा नाश होईल. [QBR] जे लोक त्यास ओळखतात ते विचारतील, ‘तो कुठे गेला?’ [QBR]
8. तो एखाद्या स्वप्नासारखाउडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही. [QBR] त्यास घालवून देण्यात येईल आणि एखाद्या रात्रीच्या स्वप्नासारखा तो विसरलाही जाईल. [QBR]
9. ज्या लोकांनी त्यास पाहिले होते, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही. [QBR] त्याचे कुटुंब पुन्हा कधी त्याच्याकडे बघणार नाही, [QBR]
10. दुष्ट मनुष्याने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील. [QBR] दुष्ट मनुष्याचे स्वत:चे हातच [* संतान] त्याची संपत्ती परत करतील. [QBR]
11. तो तरुण होता तेव्हा त्याची हाडे मजबूत होती. [QBR] परंतु आता इतर अवयवांप्रमाणे त्यांची सुध्दा माती होईल. [QBR]
12. दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात. [QBR] तो त्यांची चव नीट कळावी म्हणून त्या आपल्या जिभेखाली ठेवतो. [QBR]
13. दुष्ट मनुष्यास वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही. [QBR] तो त्या आपल्या तोंडात ठेवतो. [QBR]
14. परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील. [QBR] त्याच्या आत त्याचे सर्पाच्या विषासारखे जहर होईल. [QBR]
15. त्याने धन गिळले तरी तो ती ओकून टाकील, [QBR] देव त्यास ती पोटातून ओकायला भाग पाडेल. [QBR]
16. तो फुरशाचे विष चोखील, [QBR] सर्पाचा दंशच त्यास मारुन टाकील. [QBR]
17. नंतर मधाने आणि दुधाने भरुन वाहाणाऱ्या नद्या [QBR] बघण्याचे सौख्य तो अनुभवू शकणार नाही. [QBR]
18. त्याचा नफा परत करणे भाग पडेल. त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले [QBR] ते सुख भोगण्याची परवानगी त्यास मिळणार नाही. [QBR]
19. कारण त्याने गरीबांना कष्ट दिले. [QBR] त्यांना वाईट वागवले. त्याने त्यांची काळजी घेतली नाही. त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या. दुसऱ्यांनी बांधलेली घरे त्यांनी बळकावली. [QBR]
20. कारण त्यास माहीती आहे त्यास कोणतेच समाधान नसते. [QBR] म्हणून त्यास आपल्या कोणत्याही गोष्टीविषयी निभावून जाता येणार नाही. [QBR]
21. तो खातो तेव्हा काहीही शिल्लक ठेवीत नाही. [QBR] त्याचे यश टिकणार नाही. [QBR]
22. जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटानी दबून जाईल. [QBR] गरीबीमध्ये असणाऱ्यांचे हात त्याच्यावर येतील. [QBR]
23. दुष्ट मनुष्याने त्यास हवे तितके खाल्ल्यानंतर देव त्याचा क्रोधाग्नी त्याच्यावर फेकेल. [QBR] देव दुष्टावर त्याच्या शिक्षेचा पाऊस पाडेल. [QBR]
24. दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल. [QBR] परंतु पितळी बाण त्याचा बळी घेईन. [QBR]
25. पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल. [QBR] त्याचे चकाकणारे टोक त्याचे पित्ताशय भेदील [QBR] आणि तो भयभीत होईल. [QBR]
26. त्याच्या खजिन्यावर पूर्ण कोळोख येईल. [QBR] मानवाने उत्पन्न केला नाही असा अग्नी त्याचा नाश करेल. [QBR] त्याच्या घरातल्या सर्व वस्तूंचा नाश करेल. [QBR]
27. आकाश त्याचा अधर्म प्रकट करील, [QBR] पृथ्वी त्याच्याविरुध्द साक्ष देईल. [QBR]
28. पुराने त्याच्या घरातील संपत्ती नष्ट होईल, [QBR] देवाच्या क्रोधाच्या दिवशी त्याची संपत्ती वाहून जाईल. [QBR]
29. देवाकडून नेमलेला हा दुष्टमनुष्याचा वाटा आहे, देवाने ठेवलेले हे त्याचे वतन आहे.” [PE]