1. {#1दुष्टांची भरभराट होते असे ईयोब निक्षून सांगतो }
2. [PS]नंतर ईयोबाने उत्तर दिले. [PE][QS]“मी काय म्हणतो ते निट ऐक [QE][QS]म्हणजे माझे सांत्वन होईल. [QE]
3. [QS]मी बोलेन तेव्हा तू थोडा धीर धर, [QE][QS]माझे बोलणे संपल्यावर तू माझी थट्टा करु शकतोस. [QE]
4. [QS]माझी लोकांविरुध्द तक्रार काय आहे? [QE][QS]मी अधीर का होऊ नये? [QE]
5. [QS]माझ्याकडे बघ व आश्चर्यचकित हो, [QE][QS]व तुझे हात तू आपल्या तोंडावर ठेव. [QE]
6. [QS]माझ्यावर आलेल्या त्रांसाचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते [QE][QS]आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो. [QE]
7. [QS]दुष्ट मनुष्यांना जास्त आयुष्य का असते? [QE][QS]ते वृध्द आणि यशस्वी का होतात? [QE]
8. [QS]आणि त्याचे वंशज त्याच्या डोळ्यासमोर स्थापीत होतात, [QE][QS]आणि त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुलेबाळे नांदतात. [QE]
9. [QS]त्यांची घरे भितीपासून सुरक्षित असतात, [QE][QS]देवाची काठी त्याच्यांवर पडत नाही. [QE]
10. [QS]त्यांच्या बैलाचे प्रजोत्पादन असफल होत नाही. [QE][QS]त्यांच्या गायींना वासरे होतात आणि त्यांची वासरे अकाली मृत्युमुखी पडत नाहीत. [QE]
11. [QS]ते आपल्या मुलांना वासराप्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. [QE][QS]त्यांची मुले सभोवती नाचत असतात. [QE]
12. [QS]ते डफ आणि वीणेच्या आवाजावर गातात [QE][QS]आणि ते पावांचा नाद ऐकुण आनंदी होतात. [QE]
13. [QS]ते त्यांचे दिवस भरभराटीत घालवतात, [QE][QS]नंतर ते शांतपणे [* क्षणात ]खाली अधोलोकात जातात. [QE]
14. [QS]ते देवाला म्हणाले, आम्हास एकटे सोड [QE][QS]आम्हास तुझ्या ज्ञानाच्या मार्गाची इच्छा नाही. [QE]
15. [QS]सर्वशक्तिमान कोण आहे, की त्याची उपासना आम्ही करावी? [QE][QS]त्याची प्रार्थना करून आम्हास काय लाभ? [QE]
16. [QS]पाहा, त्याची भरभराट त्याच्या स्वतःच्या हाती नाही? [QE][QS]दुष्ट मनुष्याचा सल्ला माझ्यापासुन दूर असो. [QE]
17. [QS]वांरवार दुष्टाचा दिप विझवला जातो, [QE][QS]त्याची विपत्ती त्यांच्यावर येते? [QE][QS]आणि असे कीतीतरी वेळ घडते की, देव त्याच्या क्रोधाने त्यांची पीडा त्यांना वाटून देतो. [QE]
18. [QS]ते कितीदा वाऱ्यापुढे धसकटासारखे होतात, [QE][QS]किंवा ते वादळाने उडालेल्या भूशासारखे होतात. [QE]
19. [QS]पण तू म्हणतोस देव वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा करतो. [QE][QS]तर त्याने त्यालाच प्रतिफळ द्यावे म्हणजेच त्यास त्याचा दोष कळेल. [QE]
20. [QS]त्याच्या डोळ्यांनीच तो आपला नाश पाहो, [QE][QS]तो सर्वशक्तिमान देवाच्या रागाचे प्राशन करो. [QE]
21. [QS]जेव्हा त्याच्या आयुष्याची मद्दत कमी करण्यास येईल, [QE][QS]तेव्हा त्याच्या मरणानंतर तो त्याच्या परीवाराची काळजी कशी करील? [QE]
22. [QS]देवाला कोणी ज्ञान शिकवू शकते का? [QE][QS]तो तर उच्च पदावर असलेल्या लोकांचाही न्यायनिवाडा करतो. [QE]
23. [QS]एखादा मनुष्य त्याच्या पूर्ण शक्तीतच मरतो, [QE][QS]पुर्णपणे शांतीत आणि सहजतेने. [QE]
24. [QS]त्याची भांडी दुधाने [QE][QS]आणि त्याची हाडे मज्जारसाने ओलसर आहेत. [QE]
25. [QS]दुसरा मनुष्य मनाच्या कटूपणात मरतो, [QE][QS]त्याने कधीच चांगले अनुभवलेले नसते. [QE]
26. [QS]शेवटी हे दोघेही बरोबरच मातीत जातील. [QE][QS]किडे त्यांना झाकून टाकतील. [QE]
27. [QS]पाहा, मला तुमचे विचार माहीती आहेत, [QE][QS]कोणत्या चुकांनी मला दु:ख द्यायची तुझी इच्छा आहे हे मला माहीत आहे. [QE]
28. [QS]तू कदाचित् म्हणशील ‘आता राजाचे घर कोठे आहे? [QE][QS]दुष्ट ज्या तंबूत राहतो तो कोठे आहे. [QE]
29. [QS]तू कधीच प्रवास करणाऱ्या लोकांस विचारले नाहीस काय? [QE][QS]ते काय चिन्ह देतील हे तुला ठावूक नाही काय, [QE]
30. [QS]दुष्ट मनुष्य नाशाच्या दिवसासाठी ठेवलेला आहे, [QE][QS]आणि त्यास क्रोधाच्या दिवशी बाहेर आणतील. [QE]
31. [QS]त्याच्या तोंडावर त्याचा मार्ग कोण प्रकट करील? [QE][QS]त्याने जे केले त्याची परत फेड कोण करील? [QE]
32. [QS]नंतर त्यास कबरेकडे नेतील, [QE][QS]त्याच्या थडग्यावर पहारा ठेवतील. [QE]
33. [QS]खोऱ्यातील ढेकळे त्यास गोड लागतील, [QE][QS]सर्व लोक त्याच्या पाठीमागे जातील [QE][QS]जसे असंख्य लोक होऊन गेले तसे ते सर्व त्याच्या मागे जातील [QE]
34. [QS]मग तुमच्या मुर्खपणाने तुम्ही माझे सांत्वन कसे करु शकता, [QE][QS]म्हणून तुमची उत्तरे काहीच नाही ती मुर्खपणाची आहेत.” [QE]