1. {#1अलिफज ईयोबावर भयंकर दुष्टाईचा दोष लादतो }
2. [PS]मग अलीफज तेमानीने उत्तर दिले व तो म्हणाला, [PE][QS]“देवासाठी मनुष्य उपयुक्त होऊ शकेल काय? [QE][QS]ज्ञानी मनुष्य देवाला उपयोगी होऊ शकतो काय? [QE]
3. [QS]तुमच्या धार्मिक जगण्याने सर्वसमर्थाला काही आनंद होतो काय? [QE][QS]तू चांगला राहीलास तर त्यास काही लाभ होईल काय? [QE]
4. [QS]तो तुझा भक्तीभाव पाहून तुझा निषेध करतो [QE][QS]आणि तुला न्यायाकडे नेतो का? [QE]
5. [QS]तुझे पाप मोठे नाही काय? [QE][QS]तुझ्या दुष्टाईला अंत नाही ना? [QE]
6. [QS]तू विनाकारण आपल्या भावाचे गहाण अडकवून ठेवले, [QE][QS]उघड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतली. [QE]
7. [QS]तू थकलेल्यास पाणी दिले नाही [QE][QS]आणि भुकेल्या लोकांस अन्न दिले नाही. [QE]
8. [QS]जरी तू, शक्तीमान मनुष्य असशील, सर्व भूमी तुझी असेल, [QE][QS]जरी तू एक सन्मानीत मनुष्य असशील. [QE]
9. [QS]तू विधवांना काहीही न देता घालवून दिले असशील, [QE][QS]पोरक्याचे बाहू मोडले असशील. [QE]
10. [QS]म्हणूनच तुझ्या भोवती सापळे आहेत [QE][QS]आणि अचानक आलेल्या संकटानी तू घाबरुन जात आहेस. [QE]
11. [QS]म्हणूनच सर्वत्र इतका अंधार आहे की तुला काही दिसत नाही [QE][QS]आणि तू पुराच्या पाण्याने चोहोबाजूंनी वेढला आहेस. [QE]
12. [QS]देव उंच स्वर्गात नाही काय? [QE][QS]तारे किती उंचावर आहेत ते बघ, ते कीती उंच आहेत. [QE]
13. [QS]आणि तू म्हणतो देवाला काय माहीती आहे? [QE][QS]दाट अंधाराच्या आडून तो कसा न्याय करतो. [QE]
14. [QS]दाट ढग त्यास झाकत आहेत, [QE][QS]म्हणजे त्याने आपल्याला बघू नये. [QE]
15. [QS]तू जूनाच मार्ग धरणार आहेस काय, [QE][QS]ज्यावर दुष्टजण चालले. [QE]
16. [QS]त्यांची वेळ येण्यापूर्वीच त्यांचा नाश करण्यात आला, [QE][QS]त्यांचा पाया नदीसारखा वाहून गेला. [QE]
17. [QS]जे देवाला म्हटले, ‘आमच्या पासून निघून जा [QE][QS]तो सर्वशक्तिमान देव आम्हास काय करु शकतो?’ [QE]
18. [QS]आणि त्यानेच त्यांची घरे चांगल्या वस्तूंनी भरली होती. [QE][QS]परंतू दुष्टाची योजना माझ्यापासुन दूर आहे. [QE]
19. [QS]धार्मिक त्यांचा नाश पाहून संतोष पावतील. [QE][QS]निर्दोष त्यांचा उपहास करतात. [QE]
20. [QS]आणि म्हणतात खरोखरच आमच्या विरूद्ध जे उठले त्यांचा नाश झाला आहे. [QE][QS]त्यांची संपत्ती आगीत नष्ट होत आहे. [QE]
21. [QS]तू आता देवाला शरण जा. त्याच्याशी सलोखा कर. [QE][QS]तू हे केलेस तर तुला खूप चांगल्या गोष्टी मिळतील. [QE]
22. [QS]मी तुला विनंती करतो त्याच्या तोंडच्या सूचनांचा स्विकार कर. [QE][QS]त्याचे शब्द आपल्या हृदयात ठेव. [QE]
23. [QS]तू सर्वशक्तिमान देवाकडे परत येशील, तर तुझी बांधणी होईल. [QE][QS]जर तू अधार्मीकता आपल्या तंबूपासून दूर ठेवशील. [QE]
24. [QS]तुझ्याजवळ असलेल्या संपत्तीला मातीमोल मानशील, [QE][QS]तू तुझ्या सर्वात चांगल्या ओफीरच्या सोन्याला दरीतल्या दगडाएवढी किंमत देशील. [QE]
25. [QS]म्हणजे सर्वशक्तिमान देवच तुझे धन असा होईल [QE][QS]आणि तो तुला मोलवान रूपे असा होईल. [QE]
26. [QS]तेव्हा तू सर्वशक्तिमानच्या ठायी आनंद पावशील, [QE][QS]तू तुझे मुख देवाकडे वर करशील. [QE]
27. [QS]तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल [QE][QS]आणि तू आपले नवस फेडशील. [QE]
28. [QS]जी गोष्ट तू मनात आणशील तेव्हा ती सिध्दीस जाईल. प्रकाश तुझ्या मार्गात चमकेल. [QE]
29. [QS]देव गर्वीष्ठांना नम्र करील, [QE][QS]आणि तो नम्र लोंकाची सुटका करील. [QE]
30. [QS]जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो, तुझ्या हाताच्या निर्मळतेमुळे ते बचावले जातील.” [QE]