1. {देवापुढे आपला वाद करण्याची ईयोबाची इच्छा} [PS] नंतर ईयोबने उत्तर दिले व तो म्हणाला, [QBR]
2. “तरीही मी आज कडवटपणे तक्रार करीन? [QBR] कारण माझा त्रास माझ्या विलापाहून भारी आहे. [QBR]
3. देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असते तर [QBR] मी त्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहचलो असतो [QBR]
4. मी देवाला माझी फिर्याद सांगितली असती. [QBR] माझ्या मुखाने सतत वाद घातला असता. [QBR]
5. त्याने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते. [QBR] तो मला काय म्हणाला ते मी लक्षात घेतले असते. [QBR]
6. त्याच्या महान सामर्थ्याने त्याने माझ्याविरुध्द वाद केला असता का? [QBR] नाही; तर त्याने माझ्याकडे लक्ष दिले असते. [QBR]
7. तेथे सरळ मनुष्यांनी त्याच्याशी वाद केला असता. [QBR] म्हणजे मी माझ्या न्यायाधीशापासुन सुटलो असतो. [QBR]
8. पाहा, मी पूर्वेकडे गेलो, पण तो तीथे नव्हता, [QBR] मी पश्चिमेकडे गेलो, पण मी त्यास पाहीले नाही. [QBR]
9. उत्तरेकडे तो कार्य करीत असला, तरी मला तो दिसू शकत नाही. [QBR] आणि दक्षिणेकडेही, जेथे तो स्वतःस लपवितो त्यामुळे तेथेही तो मला दिसत नाही. [QBR]
10. परंतु माझा मार्ग त्यास कळाला आहे, [QBR] जेव्हा तो माझी परीक्षा घेतो, तेव्हा मी सोन्यासारखा असेन. [QBR]
11. त्याच्या पावलावर माझी पावले पडत आहेत, [QBR] मी त्याचा मार्ग धरला आहे व त्यापासून वळालो नाही. [QBR]
12. मी त्याच्या ओठांच्या आज्ञेचे पालन करण्यापासुन मागे वळालो नाही, [QBR] मी संपत्ती प्रमाणे माझ्या हृदयात देवाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द ठेवले आहेत. [QBR]
13. परंतु देव कधी बदलत नाही, त्यास कोण बदलेल. [QBR] त्याच्या मनाच्या ईच्छेप्रमाणे तो करतो. [QBR]
14. कारण तो माझ्यासाठी त्याचा हूकुम चालवितो, [QBR] माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत. [QBR]
15. यास्तव, मी त्याच्या उपस्थीतीला घाबरतो, [QBR] जेव्हा मी त्याच्याबद्दल विचार करतो, मला त्याची भीती वाटते. [QBR]
16. त्यामुळे देवाने माझे हृदय कमजोर केले आहे, [QBR] आणि सर्वशक्तिमानाने मला भयभीत केले आहे. [QBR]
17. काय मी अंधकाराने काढून टाकला गेलो नाही काय? [QBR] आणि गडद अंधकाराने माझे मुख झाकले गेले नाही काय.” [PE]