1. {#1दुष्टाईकडे देव दुर्लक्ष करतो ही ईयोबाची तक्रार } [QS]“त्या सर्वशक्तिमानाने न्यायवेळ का नेमून ठेवली नाही? [QE][QS]त्यास ओळखणाऱ्यांना त्या न्याय दिवसाची का प्रतिती येत नाही? [QE]
2. [QS]आणि काही जण हद्द दर्शविणाऱ्या खुणा सरकवतात. [QE][QS]लोक पशूंचे कळप चोरुन स्वच:च्या रानात चरायला नेतात. [QE]
3. [QS]ते अनाथ मुलांची गाढवे चोरतात. [QE][QS]ते विधवेचा बैल गहाण म्हणून ठेवतात. [QE]
4. [QS]ते गरजंवताना त्यांच्या मार्गापासून बहकवतात. [QE][QS]सगळ्या पृथ्वीवरील गरीबांना या दुष्टांपासून लपून रहावे लागते. [QE]
5. [QS]गरीब लोक वाळवंटात हिंडून अन्न शोधणाऱ्या मोकाट गाढवाप्रमाणे आहेत ते काळजीपूर्वक अन्नाचा शोध घेतात. [QE][QS]त्यांच्या मुलाबाळांना जंगल अन्न पुरवते. [QE]
6. [QS]गरीब लोक रात्रीपर्यंत इतरांच्या शेतात कापणी करतात, [QE][QS]आणि ते दुष्टांच्या पिकातील द्राक्षे वेचतात. [QE]
7. [QS]त्यांना रात्री कपड्यांशिवाय झोपावे लागते. [QE][QS]थंडीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ पांघरुण नसते. [QE]
8. [QS]ते डोंगरावरील पावसाने भिजतात, [QE][QS]आश्रय नसल्याकारणाने ते खडकांना कवटाळून बसतात. [QE]
9. [QS]दुष्ट लोक स्तनपान करणारे बाळ आई जवळून घेतात. [QE][QS]ते गरीबाच्या त्याने काढलेल्या कर्जाबद्दल तारण म्हणून त्यांची मुले ठेवून घेतात. [QE]
10. [QS]ते कपडे नसल्यामुळे उघडेच असतात, [QE][QS]ते दुसऱ्यांच्या धान्यांच्या पेंढ्या वाहतात पण स्वत: मात्र उपाशीच राहतात. [QE]
11. [QS]ते आवाराच्या आत तेल काढतात, [QE][QS]ते दुष्टांच्या द्राक्षकुंडात द्राक्ष तुडवतात तरी ते तान्हाले राहतात. [QE]
12. [QS]शहरात मरणास टेकलेल्या मनुष्यांचे दु:खद रडणे ऐकू येते, [QE][QS]घायाळाचा आत्मा आरोळी मारतो, [QE][QS]परंतु देव त्यांच्या प्रारर्थनेकडे लक्ष देत नाही. [QE]
13. [QS]काही लोक प्रकाशा विरूद्ध बंड करतात. [QE][QS]देवाला काय हवे आहे हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा नसते. [QE][QS]देवाच्या इच्छेप्रमाणे जगणे त्यांना आवडत नाही. [QE]
14. [QS]खुनी सकाळी लवकर उठतो [QE][QS]आणि गरीब व असहाय्य लोकांस ठार मारतो [QE][QS]तो रात्रीच्या वेळी चोरासारखा असतो. [QE]
15. [QS]ज्या मनुष्यास व्यभिचार करायचा आहे तो रात्रीची वाट बघतो. [QE][QS]तो म्हणतो, ‘मला कोणीही बघणार नाही’ पण तरीही तो त्याचा चेहरा झाकतो. [QE]
16. [QS]रात्रीच्या वेळी अंधार असतो तेव्हा दुष्ट लोक दुसऱ्यांची घरे फोडतात. [QE][QS]पण दिवसा ते स्वत:ला त्यांच्या घरांत कोंडून घेतात. ते प्रकाशाला टाळतात. [QE]
17. [QS]त्या दुष्टांना काळीकुटृ रात्र सकाळसारखी वाटते. [QE][QS]त्या भयंकर काळोखाची भयानकता त्यांना चांगलीच माहीत असते. [QE]
18. [QS]पुरात जशा वस्तू वाहून जातात तशी दुष्ट माणसे वाहून नेली जातात, [QE][QS]त्यांच्या जमिनीला शाप दिला जातो, [QE][QS]त्यांच्या शेतात काम करण्यास कोणीही जात नाहीत. [QE]
19. [QS]हिवाळ्यातल्या बर्फापासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते. [QE][QS]त्याप्रमाणे त्या पापी लोकांस थडग्यात नेले जाते. [QE]
20. [QS]ज्या उदराने त्यास जन्म दिला ती विसरून जाईल, [QE][QS]त्याची आठवण राहणार नाही, [QE][QS]त्याप्रमाणे दुष्टपणा झाडासारखा मोडून पडेल. [QE]
21. [QS]दुष्ट माणसे वांझ बायकांना त्रास देतात ज्यांना मुले झालेली नाहीत, [QE][QS]ते विधवांसाठी काही चांगले करीत नाहीत. [QE]
22. [QS]तरी देव आपल्या सामर्थ्याने बलवानास राखतो, [QE][QS]ज्याला जगण्याचा भरवसा नाही तो उठतो, [QE]
23. [QS]देव दुष्टांना आपण सुरक्षित आहेत असा विचार करण्यास भाग पाडतो [QE][QS]आणि त्याविषयी ते आनंदी होतात. [QE]
24. [QS]ते उंचावले जातात परंतू थोड्या काळापुरते नंतर ते जातात. [QE][QS]खरोखर, ते खचून जातात, ते इतर सर्वांप्रमाणे काढून टाकले जातात. [QE][QS]आणि ते कणसाच्या शेड्यांप्रमाणे कापून टाकले जातात. [QE]
25. [QS]या गोष्टी खऱ्या नाहीत असे कोण म्हणतो, मी खोटे बोललो हे कोण सिध्द करेल? [QE][QS]माझे बोलने निरर्थक आहे हे कोण दाखवून देईल?” [QE]