1. {#1ईयोब देवाच्या सार्वभौमत्वाचे प्रतिपादन करतो }
2. [PS]नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला, [PE][QS]“बलहिन असलेल्यास तू कसे साहाय्य केले, [QE][QS]शक्ती नसलेल्या बाहूंना तू कसे सोडविले. [QE]
3. [QS]बुध्दीनसलेल्यास तू कसा सल्ला दिलास, [QE][QS]आणि तू त्यास केवढे ज्ञान कळविले. [QE]
4. [QS]तू कोणाच्या साह्यायाने हे शब्द बोललास? [QE][QS]तुझ्यातुन कोणाचे मन प्रगट झाले. [QE]
5. [QS]बिल्ददने उत्तर दिले, मृत झालेल्याची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जनस्थळी थरथरा कापत आहेत. [QE]
6. [QS]देवापुढे अधोलोक नग्न आहे, [QE][QS]त्याच्यापुढे विनाशस्थान स्वत:ला झाकून घेवू शकत नाही. [QE]
7. [QS]त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शुन्य आकाशावर पसरवले आहे, [QE][QS]आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे. [QE]
8. [QS]तिच्या गडद मेघात तो पाणी बांधून ठेवतो, [QE][QS]तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही. [QE]
9. [QS]तो चंद्राचा चेहरा झाकतो [QE][QS]आणि त्यावर आपले मेघ पसरवितो. [QE]
10. [QS]त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सीमा कोरली [QE][QS]आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितीजरेखा आखली. [QE]
11. [QS]त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात [QE][QS]आणि भयचकीत होतात. [QE]
12. [QS]तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो, [QE][QS]तो आपल्या ज्ञानबलाने राहाबाला छिन्नभिन्न करतो. [QE]
13. [QS]त्याचा नि:श्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो [QE][QS]त्याच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले. [QE]
14. [QS]पाहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे, [QE][QS]किती हळूवार आम्ही त्याचे ऐकतो! [QE][QS]परंतू त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल?” [QE]