1. {#1दुष्टाला मुळणाऱ्या प्रतिफळाचे ईयोब वर्णन करतो }
2. [PS]नंतर ईयोब ने आपले बोलणे पुढे चालू ठेवले आणि म्हणाला, [PE][QS]“जसे देव जिवंत आहे, तो माझ्याबाबतीत अन्यायी होता, [QE][QS]त्या सर्वशक्तिमान देवाने माझ्या जीवाला दु:ख दिले आहे, [QE]
3. [QS]जोपर्यंत माझ्यात जीव आहे [QE][QS]आणि देवाचा जिवंत श्वास माझ्या नाकात आहे तोपर्यंत, [QE]
4. [QS]माझे ओठ वाईट गोष्टी बोलणार नाहीत [QE][QS]आणि माझी जीभ खोटे सांगणार नाही. [QE]
5. [QS]तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही. [QE][QS]मी निरपराध आहे हेच मी मरेपर्यंत सांगत राहीन. [QE]
6. [QS]मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना मी चिकटून राहीन. [QE][QS]चांगले वागणे मी कधीही सोडणार नाही. मरेपर्यंत माझे मन मला कधीही खाणार नाही. [QE]
7. [QS]माझे शत्रू दुष्टासारखे होवो, [QE][QS]अनितीमान मनुष्यासारखे ते माझ्यावर उठो. [QE]
8. [QS]कारण देवविरहीत राहणाऱ्यांना देव जीवनातून छेदतो तर त्यांची काय आशा आहे, [QE][QS]त्याचा जीव त्याने काढून घेतला म्हणजे त्यास काय आशा आहे? [QE]
9. [QS]देव त्याची आरोळी ऐकेल काय? [QE][QS]जेव्हा त्याच्यावर संकटे येतील, [QE]
10. [QS]तो सर्वशक्तिमानाच्या ठायी आनंद मानेल काय? [QE][QS]आणि तो देवाला सर्वदा हाक मारेल काय? [QE]
11. [QS]मी तुम्हास देवाच्या हाताविषयी शिकविल, [QE][QS]सर्वशक्तिमानाच्या योजना मी तुमच्यापासून लपवणार नाही. [QE]
12. [QS]पाहा, तुम्ही सर्वांनी हे पाहिले आहे, [QE][QS]मग तुम्ही असे निरर्थक का बोलता? [QE]
13. [QS]देवाने वाईट लोकांसाठी हीच योजना आखली होती. [QE][QS]आणि सर्वशक्तिमानाकडून जुलम्यास हेच वतन मिळते. [QE]
14. [QS]त्यास खूप मुले असतील परंतु त्याची मुले तलवारीने मरतील, [QE][QS]दुष्ट मनुष्याच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही. [QE]
15. [QS]राहीलेली सर्व मुले साथीने मरतील, [QE][QS]आणि त्यांच्या [* त्याची ]विधवा विलाप करणार नाहीत. [QE]
16. [QS]दुष्ट मनुष्यास इतकी चांदी मिळेल की ती त्यास मातीमोल वाटेल, त्यास इतके कपडे मिळतील की ते त्यास मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील. [QE]
17. [QS]जरी तो कपडे करील ते धार्मिक अंगावर घालतील, [QE][QS]निर्दोष त्याची चांदी त्यांच्यामध्ये वाटून घेतील. [QE]
18. [QS]तो त्याचे घर कोळ्यासारखे बांधतो, [QE][QS]रखवालदाराने बांधलेल्या झोपडीसारखे ते असते. [QE]
19. [QS]तो श्रीमंत स्थितीत अंग टाकतो, [QE][QS]परंतू सर्वदा असे राहणार नाही, [QE][QS]तो उघडून बघेल तेव्हा सर्व गेलेले असेल. [QE]
20. [QS]भय त्यास पाण्याप्रमाणे घेवून जाईल, [QE][QS]वादळ त्यास रात्री घेवून जाईल. [QE]
21. [QS]पूर्वेचा वारा त्यास वाहून नेईल आणि तो जाईल [QE][QS]वादळ त्यास त्याच्या घरातून उडवून लावेल. [QE]
22. [QS]तो वारा[† देव ] त्यास फेकून देईल आणि थांबणार नाही, [QE][QS]तो त्याच्या हातातून निसटून जाण्याचा प्रयत्न करील. [QE]
23. [QS]तेव्हा लोक टाळ्या वाजवतील आणि त्याची थट्टा करतील, [QE][QS]त्याच्या ठिकाणातून त्यास पळवून लावतील.” [QE]