1. {#1मानवाचा ज्ञानासाठी शोध } [QS]“खरोखर चांदी मिळते अशा खाणी आहेत, [QE][QS]सोने शुद्ध करण्याची जागा असते. [QE]
2. [QS]जमिनीतून लोखंड काढतात, [QE][QS]पाषाणामधून तांबे वितळवले जाते. [QE]
3. [QS]मनुष्य अंधाराचे निवारण करतो, [QE][QS]अगदी खोलवर जाऊन, [QE][QS]गडद अंधारातील व मृत्यूछायेतील पाषाणाचा तो शोध करीतो. [QE]
4. [QS]लोकांच्या राहण्याच्या जागेपासून तो दूर खाण खणतो, [QE][QS]जिथे आजपर्यंत कोणाचेही पाऊल गेले नसेल तिथे तो जातो, [QE][QS]तो दोरीला लोंबकळतो इतरांपेक्षा खूप खोल जातो. [QE]
5. [QS]जसे जमिनीकडे पाहा, तिच्यातून आपणास अन्न मिळते, [QE][QS]जसे अग्नीने तिला उलटवले जाते. [QE]
6. [QS]जमिनीच्या खालचे पाषाण म्हणजे जेथे नीलमणी मिळतात, [QE][QS]आणि त्या मातीमध्ये सोने असते. [QE]
7. [QS]पक्ष्यांना त्या वाटांविषयी काही माहिती नसते, [QE][QS]कोणत्याही बहिरी ससाण्याच्या डोळ्यांनी त्या वाटा पाहिलेल्या नसतात. [QE]
8. [QS]रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात, [QE][QS]सिंहही त्या वाटेने गेलेला नसतो. [QE]
9. [QS]मनुष्य कठीण खडकावर हात टाकतो, [QE][QS]तो ते डोंगर पूर्ण मुळापासून उलटवून टाकतो. [QE]
10. [QS]ते खडकातून बोगदा खणतात, [QE][QS]आणि त्यांचे डोळे खडकातला खजिना बघतात. [QE]
11. [QS]ते पाण्याचे प्रवाह बंद करतात म्हणजे त्यातून पाणि बाहेर पडत नाही, [QE][QS]ते दडलेल्या वस्तू बाहेर प्रकाशात आणतात. [QE]
12. [QS]पण मनुष्यास शहाणपण कुठे मिळेल? [QE][QS]समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल? [QE]
13. [QS]शहाणपण किती मोलाचे आहे हे मनुष्याला कळत नाही, [QE][QS]पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत. [QE]
14. [QS]पृथ्वीवरील मोठे खोल जलाशय असे म्हणते, ‘माझ्यामध्ये ते नाही.’ [QE][QS]सागर म्हणतो, ‘माझ्याजवळीही ते नाही.’ [QE]
15. [QS]तुम्ही सोने देऊन ते विकत घेऊ शकत नाही, [QE][QS]ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही. [QE]
16. [QS]तुम्ही ओफीरच्या सोन्याने किंवा मौल्यवान गोमेद [QE][QS]किंवा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही. [QE]
17. [QS]शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते, [QE][QS]सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही. [QE]
18. [QS]शहाणपण पोवळ्यापेक्षा व स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे, [QE][QS]माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे. [QE]
19. [QS]इथिओपियातील (कूश) पीतमणी त्याच्या बरोबरीचा नाही, [QE][QS]शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही. [QE]
20. [QS]मग शहाणपणा कुठून येते? [QE][QS]समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल? [QE]
21. [QS]पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे, [QE][QS]आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत. [QE]
22. [QS]मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हास शहाणपण सापडले नाही, [QE][QS]आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’ [QE]
23. [QS]फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे, [QE][QS]फक्त देवालाच तो कुठे आहे हे माहीत आहे. [QE]
24. [QS]देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते, [QE][QS]त्यास आकाशाखालचे सर्वकाही दिसते. [QE]
25. [QS]देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली, [QE][QS]सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले. [QE]
26. [QS]पावसास कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले [QE][QS]आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले. [QE]
27. [QS]तेव्हा देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला, [QE][QS]शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने पारखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली. [QE]
28. [QS]आणि देव लोकांस म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्यास मान द्या हेच शहाणपण आहे, [QE][QS]वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.” [QE]