1. {मानवाचा ज्ञानासाठी शोध} [PS] “खरोखर चांदी मिळते अशा खाणी आहेत, [QBR] सोने शुद्ध करण्याची जागा असते. [QBR]
2. जमिनीतून लोखंड काढतात, [QBR] पाषाणामधून तांबे वितळवले जाते. [QBR]
3. मनुष्य अंधाराचे निवारण करतो, [QBR] अगदी खोलवर जाऊन, [QBR] गडद अंधारातील व मृत्यूछायेतील पाषाणाचा तो शोध करीतो. [QBR]
4. लोकांच्या राहण्याच्या जागेपासून तो दूर खाण खणतो, [QBR] जिथे आजपर्यंत कोणाचेही पाऊल गेले नसेल तिथे तो जातो, [QBR] तो दोरीला लोंबकळतो इतरांपेक्षा खूप खोल जातो. [QBR]
5. जसे जमिनीकडे पाहा, तिच्यातून आपणास अन्न मिळते, [QBR] जसे अग्नीने तिला उलटवले जाते. [QBR]
6. जमिनीच्या खालचे पाषाण म्हणजे जेथे नीलमणी मिळतात, [QBR] आणि त्या मातीमध्ये सोने असते. [QBR]
7. पक्ष्यांना त्या वाटांविषयी काही माहिती नसते, [QBR] कोणत्याही बहिरी ससाण्याच्या डोळ्यांनी त्या वाटा पाहिलेल्या नसतात. [QBR]
8. रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात, [QBR] सिंहही त्या वाटेने गेलेला नसतो. [QBR]
9. मनुष्य कठीण खडकावर हात टाकतो, [QBR] तो ते डोंगर पूर्ण मुळापासून उलटवून टाकतो. [QBR]
10. ते खडकातून बोगदा खणतात, [QBR] आणि त्यांचे डोळे खडकातला खजिना बघतात. [QBR]
11. ते पाण्याचे प्रवाह बंद करतात म्हणजे त्यातून पाणि बाहेर पडत नाही, [QBR] ते दडलेल्या वस्तू बाहेर प्रकाशात आणतात. [QBR]
12. पण मनुष्यास शहाणपण कुठे मिळेल? [QBR] समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल? [QBR]
13. शहाणपण किती मोलाचे आहे हे मनुष्याला कळत नाही, [QBR] पृथ्वीवरचे लोक जमीन खणून शहाणपण शोधू शकत नाहीत. [QBR]
14. पृथ्वीवरील मोठे खोल जलाशय असे म्हणते, ‘माझ्यामध्ये ते नाही.’ [QBR] सागर म्हणतो, ‘माझ्याजवळीही ते नाही.’ [QBR]
15. तुम्ही सोने देऊन ते विकत घेऊ शकत नाही, [QBR] ते विकत घेण्यासाठी जगात तेवढी चांदी नाही. [QBR]
16. तुम्ही ओफीरच्या सोन्याने किंवा मौल्यवान गोमेद [QBR] किंवा नीलमण्याने शहाणपण विकत घेऊ शकत नाही. [QBR]
17. शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते, [QBR] सोन्यात जडवलेले मौल्यवान खडेही शहाणपण विकत घेऊ शकत नाही. [QBR]
18. शहाणपण पोवळ्यापेक्षा व स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे, [QBR] माणकापेक्षा ही त्याचे मोल अधिक आहे. [QBR]
19. इथिओपियातील (कूश) पीतमणी त्याच्या बरोबरीचा नाही, [QBR] शुध्द सोन्याने तुम्ही तो विकत घेऊ शकत नाही. [QBR]
20. मग शहाणपणा कुठून येते? [QBR] समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल? [QBR]
21. पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे, [QBR] आकाशातले पक्षीसुध्दा ते बघू शकत नाहीत. [QBR]
22. मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हास शहाणपण सापडले नाही, [QBR] आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’ [QBR]
23. फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे, [QBR] फक्त देवालाच तो कुठे आहे हे माहीत आहे. [QBR]
24. देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते, [QBR] त्यास आकाशाखालचे सर्वकाही दिसते. [QBR]
25. देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली, [QBR] सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले. [QBR]
26. पावसास कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले [QBR] आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले. [QBR]
27. तेव्हा देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला, [QBR] शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने पारखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली. [QBR]
28. आणि देव लोकांस म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्यास मान द्या हेच शहाणपण आहे, [QBR] वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.” [PE]