1. {#1ईयोब आपल्या जन्मदिवसास शाप देतो }
2. [PS]यानंतर, ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला. [PE][QS]तो (ईयोब) म्हणाला, [QE]
3. [QS]“मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस नष्ट होवो, [QE][QS]मुलाची गर्भधारणा झाली अशी जी रात्र म्हणाली ती भस्म होवो. [QE]
4. [QS]तो दिवस अंधकारमय होवो, [QE][QS]देवाला त्याचे विस्मरण होवो, [QE][QS]त्यावर सुर्यप्रकाश पडला नसता तर फार बरे झाले असते. [QE]
5. [QS]मृत्यूची सावली आणि अंधार त्यास आपल्या स्वतःचा समजो, [QE][QS]ढग सदैव त्यावर राहो, जी प्रत्येक गोष्ट दिवसाचा अंधार करते ती त्यास खरेच भयभीत करो, [QE]
6. [QS]ती रात्र काळोख घट्ट पकडून ठेवो, वर्षाच्या दिवसांमध्ये ती आनंद न पावो. [QE][QS]महिन्याच्या तिथीत तिची गणती न होवो. [QE]
7. [QS]पाहा, ती रात्र फलीत न होवो, [QE][QS]तिच्यातून आनंदाचा ध्वनी न येवो. [QE]
8. [QS]जे लिव्याथानाला जागविण्यात निपुण आहेत [QE][QS]ते त्या दिवसास शाप देवो. [QE]
9. [QS]त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत. [QE][QS]तो दिवस प्रकाशाची वाट पाहो पण तो कधी न मिळो, [QE][QS]त्याच्या पापण्यास उषःकालाचे दर्शन न घडो. [QE]
10. [QS]कारण तिने माझ्या जननीचे ऊदरद्वार बंद केले नाही, [QE][QS]आणखी हे दुःख माझ्या डोळ्यापासून लपवीले नाही. [QE]
11. [QS]उदरातुन बाहेर आलो तेव्हाच मी का मरण पावलो नाही? माझ्या आईने मला जन्म देताच मी का प्राण त्यागला नाही? [QE]
12. [QS]तिच्या मांडयानी माझा स्विकार का केला? [QE][QS]किंवा मी जगावे म्हणून तिच्या स्तनांनी माझा स्विकार का केला? [QE]
13. [QS]तर मी आता निश्चिंत खाली पडून राहीलो असतो, [QE][QS]मी झोपलो असतो आणि विश्रांती पावलो असतो. [QE]
14. [QS]पृथ्वीवरील राजे आणि सल्लागार, [QE][QS]ज्यांनी आपल्यासाठी कबरा बांधल्या त्या आता उध्वस्त झाल्या आहेत. [QE]
15.
16. [PS]किंवा ज्या राजकुमारांनी आपली घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच मलाही मरण आले असते तर बरे झाले असते. [PE][QS]कदाचित मी जन्मापासूनच मृत मूल का झालो नाही, किंवा [QE][QS]प्रकाश न पाहिलेले अर्भक मी असतो तर बरे झाले असते. [QE]
17. [QS]तेथे गेल्यानंतरच दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात. [QE][QS]तेथे दमलेल्यांना आराम मिळतो. [QE]
18. [QS]तेथे कैदीही सहज एकत्र राहतात, [QE][QS]तेथे त्यांना गुलाम बनविणाऱ्यांचे ओरडणे ऐकू येत नाही. [QE]
19. [QS]लहान आणि थोर तेथे आहेत, [QE][QS]तेथे गुलाम त्यांच्या मालकापासून मुक्त आहेत. [QE]
20. [QS]दुर्दशेतील लोकांस प्रकाश का दिल्या जातो, [QE][QS]जे मनाचे कटू आहेत अशांना जीवन का दिले जाते, [QE]
21. [QS]ज्याला मरण पाहीजे त्यास मरण येत नाही, [QE][QS]दु:खी मनुष्य गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या अधिक शोधात असतो? [QE]
22. [QS]त्यास थडगे प्राप्त झाले म्हणजे ते हर्षीत होतात, त्यास अति आनंद होतो? [QE]
23. [QS]ज्या पुरूषाचा मार्ग लपलेला आहे, देवाने ज्या पुरुषाला कुपंणात ठेवले आहे अशाला प्रकाश का मिळतो? [QE]
24. [QS]मला जेवणाऐवजी उसासे मिळत आहेत! [QE][QS]माझे कण्हने, पाण्यासारखे बाहेर ओतले जात आहे. [QE]
25. [QS]ज्या गोष्टींना मी घाबरतो त्याच गोष्टी माझ्यावर येतात. मी ज्याला भ्यालो तेच माझ्यावर आले. [QE]
26. [QS]मी निश्चिंत नाही, मी स्वस्थ नाही, आणि मला विसावा नाही. [QE][QS]तरी आणखी पीडा येत आहे.” [QE]