1. {#1अलीहू ईयोबाला दोष लावतो } [QS]“ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक. [QE][QS]माझे सर्व शब्दांकडे लक्ष दे. [QE]
2. [QS]पाहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे, [QE][QS]माझी जीभ माझ्या तोंडात हालू लागली आहे. [QE]
3. [QS]माझे शब्दच माझ्या अंत:करणाचे प्रामाणिकपण सांगतील, [QE][QS]माझ्या ओठांना जे माहीती आहे, तेच ते प्रामाणिकपणे बोलतील. [QE]
4. [QS]देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, [QE][QS]मला सर्वशक्तिमान देवाच्या श्वासाद्ववारे जीवन मिळाले आहे. [QE]
5. [QS]तुला शक्य झाले तर मला उत्तर दे, [QE][QS]माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव. [QE]
6. [QS]पाहा, देवासमोर मी आणि तू सारखेच आहोत, [QE][QS]मलाही माती पासून उत्पन्न केले आहे. [QE]
7. [QS]पाहा, माझी दरारा तुला घाबरवणार नाही, [QE][QS]माझा दाब तुला जड होणार नाही. [QE]
8. [QS]तू जे बोललास ते मी निश्चित ऐकले, [QE][QS]मी तुझ्या शब्दांचा आवाज असे म्हणतांना ऐकला, [QE]
9. [QS]‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही [QE][QS]मी निर्दोष आहे, आणि माझ्यामध्ये पाप नाही. [QE]
10. [QS]पाहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतो [QE][QS]देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे. [QE]
11. [QS]देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले [QE][QS]देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’ [QE]
12. [QS]पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस, [QE][QS]देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे. [QE]
13. [QS]तू त्याच्याशी का वाद घालत आहेस? [QE][QS]तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही. [QE]
14. [QS]देव एकदा बोलतो, [QE][QS]होय दोनदा बोलतो, तरी मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही. [QE]
15. [QS]देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल, [QE][QS]जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो. [QE]
16. [QS]नंतर देव मनुष्याची कानउघडणी करतो, [QE][QS]आणि त्याच्या धमकीने घाबरवितो. [QE]
17. [QS]मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी, [QE][QS]आणि गर्व न करण्याचेही सांगतो. [QE]
18. [QS]देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो, [QE][QS]त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो. [QE]
19. [QS]मनुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल [QE][QS]वेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात. [QE]
20. [QS]नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाही [QE][QS]चांगल्या अन्नाचासुध्दा त्यास तिरस्कार वाटतो. [QE]
21. [QS]त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. [QE][QS]त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात. [QE]
22. [QS]खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतो [QE][QS]आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते. [QE]
23. [QS]परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला, [QE][QS]मध्यस्थ, हजारो देवदुतापैकी एक, [QE][QS]त्यास चांगला मार्ग दाखवणारा. [QE]
24. [QS]आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागेल, आणि देवाला सांगेल. [QE][QS]‘या मनुष्यास मृत्युलोकात जाण्यापासून वाचव [QE][QS]त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’ [QE]
25. [QS]मग त्याचे शरीर पुन: बालकासारखे जोमदार बनेल. [QE][QS]तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल. [QE]
26. [QS]तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल. [QE][QS]म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील. [QE][QS]नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल. [QE]
27. [QS]नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. [QE][QS]मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. [QE][QS]पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही. [QE]
28. [QS]त्याने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवेल. [QE][QS]माझ्या जीव नियमीत त्याचा प्रकाश पाहील. [QE]
29. [QS]पाहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो, [QE][QS]दोनदा, होय तीनदा, [QE]
30. [QS]त्याच्या जीवाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी असे करतो [QE][QS]म्हणजे त्याचे जीवन प्रकाशाने प्रकाशीत होते. [QE]
31. [QS]ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. [QE][QS]माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे. [QE]
32. [QS]पण ईयोबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. [QE][QS]मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे. [QE]
33. [QS]परंतु ईयोबा, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. [QE][QS]तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.” [QE]