1. {अलीहू ईयोबाला दोष लावतो} [PS] “ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक. [QBR] माझे सर्व शब्दांकडे लक्ष दे. [QBR]
2. पाहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे, [QBR] माझी जीभ माझ्या तोंडात हालू लागली आहे. [QBR]
3. माझे शब्दच माझ्या अंत:करणाचे प्रामाणिकपण सांगतील, [QBR] माझ्या ओठांना जे माहीती आहे, तेच ते प्रामाणिकपणे बोलतील. [QBR]
4. देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, [QBR] मला सर्वशक्तिमान देवाच्या श्वासाद्ववारे जीवन मिळाले आहे. [QBR]
5. तुला शक्य झाले तर मला उत्तर दे, [QBR] माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव. [QBR]
6. पाहा, देवासमोर मी आणि तू सारखेच आहोत, [QBR] मलाही माती पासून उत्पन्न केले आहे. [QBR]
7. पाहा, माझी दरारा तुला घाबरवणार नाही, [QBR] माझा दाब तुला जड होणार नाही. [QBR]
8. तू जे बोललास ते मी निश्चित ऐकले, [QBR] मी तुझ्या शब्दांचा आवाज असे म्हणतांना ऐकला, [QBR]
9. ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही [QBR] मी निर्दोष आहे, आणि माझ्यामध्ये पाप नाही. [QBR]
10. पाहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतो [QBR] देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे. [QBR]
11. देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले [QBR] देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’ [QBR]
12. पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस, [QBR] देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे. [QBR]
13. तू त्याच्याशी का वाद घालत आहेस? [QBR] तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही. [QBR]
14. देव एकदा बोलतो, [QBR] होय दोनदा बोलतो, तरी मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही. [QBR]
15. देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल, [QBR] जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो. [QBR]
16. नंतर देव मनुष्याची कानउघडणी करतो, [QBR] आणि त्याच्या धमकीने घाबरवितो. [QBR]
17. मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी, [QBR] आणि गर्व न करण्याचेही सांगतो. [QBR]
18. देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो, [QBR] त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो. [QBR]
19. मनुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु:ख भोगत असेल [QBR] वेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात. [QBR]
20. नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाही [QBR] चांगल्या अन्नाचासुध्दा त्यास तिरस्कार वाटतो. [QBR]
21. त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. [QBR] त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात. [QBR]
22. खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतो [QBR] आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते. [QBR]
23. परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला, [QBR] मध्यस्थ, हजारो देवदुतापैकी एक, [QBR] त्यास चांगला मार्ग दाखवणारा. [QBR]
24. आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागेल, आणि देवाला सांगेल. [QBR] ‘या मनुष्यास मृत्युलोकात जाण्यापासून वाचव [QBR] त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’ [QBR]
25. मग त्याचे शरीर पुन: बालकासारखे जोमदार बनेल. [QBR] तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल. [QBR]
26. तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल. [QBR] म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील. [QBR] नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल. [QBR]
27. नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. [QBR] मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. [QBR] पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही. [QBR]
28. त्याने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवेल. [QBR] माझ्या जीव नियमीत त्याचा प्रकाश पाहील. [QBR]
29. पाहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो, [QBR] दोनदा, होय तीनदा, [QBR]
30. त्याच्या जीवाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी असे करतो [QBR] म्हणजे त्याचे जीवन प्रकाशाने प्रकाशीत होते. [QBR]
31. ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. [QBR] माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे. [QBR]
32. पण ईयोबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. [QBR] मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे. [QBR]
33. परंतु ईयोबा, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. [QBR] तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.” [PE]