1. {#1देवाच्या न्याय्यत्वाचे अलीहू समर्थन करतो }
2. [PS]नंतर अलीहूने आपले बोलणे चालूच ठेवले तो म्हणाला, [PE][QS]“शहाण्या मनुष्यांनो मी काय सांगतो ते ऐका [QE][QS]हुशार मनुष्यांनो, माझ्याकडे लक्ष द्या. [QE]
3. [QS]तुमची जीभ ज्या अन्नाला स्पर्श करते त्याची चव तिला कळते [QE][QS]आणि तुमच्या कानांवर जे शब्द पडतात ते त्यांना पारखता येतात. [QE]
4. [QS]तेव्हा आपण आता काय न्याय आहे ते निवडून घेवू [QE][QS]काय चांगले आहे ते आपण सगळ्यांनी बरोबर शिकू या. [QE]
5. [QS]ईयोब म्हणतो, मी निष्पाप आहे, [QE][QS]आणि देव माझ्याबाबतीत न्यायी नाही. [QE]
6. [QS]मी निरपराध आहे, परंतु माझ्याविरुध्द लागलेला निकाल मला खोटारडा ठरवतो [QE][QS]मी निरपराध असूनही मला खूप कष्ट भोगायला लागले. [QE]
7. [QS]ईयोबासारखा आणखी कोणी आहे का? [QE][QS]जो निंदा पाण्याप्रमाणे प्राशन करतो. [QE]
8. [QS]तो जे वाईट करतात त्यांच्याशी मैत्री करतो, [QE][QS]आणि त्यास दुष्टांबरोबर राहायला आवडते, [QE]
9. [QS]तो असे म्हणतो, ते मनुष्याच्या कामाचे नाही, [QE][QS]जर देवाला खुश करायला लागला तर त्यास त्यापासून काहीही मिळणार नाही. [QE]
10. [QS]तुम्हास समजू शकते, म्हणून तुम्ही माझे ऐका. [QE][QS]देव कधीही दुष्टाई करणार नाही. [QE][QS]तो सर्वशक्तिमान कधीच पाप करणार नाही. [QE]
11. [QS]एखादा मनुष्य जे काही करतो त्याबद्दल देव त्याची परतफेड करीतो. [QE][QS]देव लोकांस त्यांच्या लायकीप्रमाणे देतो [QE]
12. [QS]खरोखर, हे देव कधीच वाईट करीत नाही, [QE][QS]तो सर्वशक्तिमान कधीच न्यायाला विरोध करीत नाही. [QE]
13. [QS]देवाला कोणीही पृथ्वीवरचा अधिकारी म्हणून निवडले नाही. [QE][QS]सगळ्या जगाची काळजी देवावर कोणी सोपवली नाही. [QE]
14. [QS]त्याचे चित्त स्वतःकडेच असते, [QE][QS]आणि त्याने आपला आत्मा आणि श्वास स्वतःच्या ठायी परत घेतला [QE]
15. [QS]नंतर सर्व शरीरे एकत्रीत नाश पावतील [QE][QS]मनुष्य परत मातीस मिळेल. [QE]
16. [QS]जर तुम्ही शहाणे असाल तर मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्याल [QE][QS]माझ्या तोंडच्या शब्दाकडे कान दे [QE]
17. [QS]जो मनुष्य न्यायी होण्यासंबंधी तिरस्कार करतो तो कधीच राज्यकर्ता होऊ शकत नाही. [QE][QS]ईयोब, देव शक्तीमान आणि चांगला आहे. तू त्यास अपराधी ठरवू शकशील असे तुला वाटते का? [QE]
18. [QS]एक देवच असा आहे जो राजांना तुम्ही कवडीमोलाचे आहात. [QE][QS]आणि ‘तुम्ही दुष्ट आहात.’ असे ज्ञान्यांना म्हणतो. [QE]
19. [QS]देव इतरांपेक्षा पुढाऱ्यांवर अधिक प्रेम करीत नाही. [QE][QS]देव गरीब मनुष्यापेक्षा श्रीमंतांवर अधिक प्रेम करत नाही? [QE][QS]कारण ते सर्व त्याच्या हाताची कृती आहेत. [QE]
20. [QS]माणसे अर्ध्यारात्री एकाएकी मरुन जातात. [QE][QS]ते आजारी पडतात आणि मरतात. [QE][QS]अगदी शक्तीशाली लोकसुध्दा, कारण नसताना मरतात. [QE]
21. [QS]लोक जे करतात ते देव बघतो [QE][QS]देव मनुष्याची प्रत्येक हालचाल बघत असतो. [QE]
22. [QS]जगात कुठेही अशी अंधारी जागा नाही जिथे वाईट माणसे देवापासून लपून बसू शकतील. [QE]
23. [QS]देवाला लोकांची अधिक परीक्षा घेण्यासाठी वेळ ठरवण्याची गरज नसते [QE][QS]लोकांचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांना समोर आणण्याची गरजही देवाला भासत नाही. [QE]
24. [QS]शक्तीशाली लोकांचा तो चुराडा करतो, आणि त्यांच्या स्थानी दुसरा स्थापीतो, [QE][QS]त्यास त्यांना प्रश्न विचारण्याची गरज वाटत नाही. [QE]
25. [QS]तेव्हा लोक काय करतात ते देवाला माहीत असते. [QE][QS]म्हणूनच देव रात्रीतून दुष्टांना पराभव करतो आणि त्यांचा नि:पात करतो. [QE]
26. [QS]वाईट मनुष्यांनी जी दुष्कृत्ये केली असतील त्याबद्दल त्यांना शिक्षा करतो. [QE][QS]आणि जिथे इतर त्यांना पाहू शकतील अशा ठिकाणी देव त्यांना शिक्षा करतो. [QE]
27. [QS]कारण वाईट मनुष्यांनी देवाची आज्ञा पाळायचे थांबवले [QE][QS]आणि देवाला हवे ते करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. [QE]
28. [QS]हे दुष्ट लोक गरीबांना कष्ट देतात, आणि मदतीसाठी देवाकडे याचना करायला भाग पाडतात. [QE][QS]दिनांची आरोळी त्याच्या कानी गेली. [QE]
29. [QS]देव गरीबांची मदतीसाठी हाक ऐकतो. परंतु गरीबांना मदत करायची नाही असे देवाने ठरवले तरी देवाला कोणी अपराधी ठरवू शकणार नाही. [QE][QS]देवाने जर लोकांपासून लपून राहायचे असे ठरवले तर कोणालाही तो सापडू शकणार नाही [QE][QS]म्हणजे कोणीही लोकांस पिजंऱ्यात पकडू शकणार नाही. [QE]
30. [QS]अशासाठी की, अधर्म्याचे राज्य येवू नये, [QE][QS]म्हणजे लोकांस कोणी जाळ्यात अडकवू नये. [QE]
31. [QS]जर तो मनुष्य देवाला म्हणेल की. [QE]
32. [PS]मी अपराधी आहे. यापुढे मी पाप करणार नाही. [PE][QS]जे मी बघू शकत नाही ते मला दाखव. [QE]
33. [PS]मी जरी पाप केले असेल तरी मी ते पुन्हा करणार नाही. [PE][QS]तुला असे वाटते का देव त्या मनुष्याचा पापाला शिक्षा करील, देवाने आतापर्यंत केलेले तुला आवडले नाही? [QE][QS]हा तुझा निर्णय आहे. माझा नाही. [QE][QS]तुला काय वाटते ते मला सांग. [QE]
34. [QS]शहाणा मनुष्य मला म्हणेल [QE][QS]खरोखर, प्रत्येक शहाणा मनुष्य जो माझे ऐकतो तो म्हणेल, [QE]
35. [QS]‘ईयोब एखाद्या अज्ञानी मनुष्यासारखे बोलत आहे. [QE][QS]तो जे काही बोलतो ते अर्थहीन आहे.’ [QE]
36. [QS]जर फक्त ईयोबालाच त्याच्या वादाबद्दल कसोटीस लावत असू [QE][QS]कारण तो एखाद्या दुष्ट मनुष्यासारखे बोलत आहे. [QE]
37. [QS]त्याच्या पापात त्याने आणखी बंडाची भर घातली आहे. [QE][QS]तो टाळी वाजवितो आमच्या मध्ये थट्टा करतो [QE][QS]देवाविरूद्ध अनेक शब्द बोलतो.” [QE]