1.
2. [PS]अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले. तो म्हणाला, [PE][QS]“तू निष्पाप आहे असा तू विचार करतोस काय? [QE][QS]मी देवापेक्षा अधीक नितीमान आहे असा तू विचार करतोस काय? [QE]
3. [QS]तू देवाला विचारतोस ‘जर मी नितीमान असण्याचा मला काय लाभ मिळेल? [QE][QS]मी जर पाप केले नाहीतर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’ [QE]
4. [QS]मी तुला उत्तर देतो, [QE][QS]तू आणि तुझे मित्र यांना देखील. [QE]
5. [QS]वरती आकाशाकडे बघ, [QE][QS]तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या ढगांकडे बघ. [QE]
6. [QS]जर तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही? [QE][QS]तुझ्याकडे पापांच्या राशी असल्या तरी त्यामुळे देवाला काही होत नाही? [QE]
7. [QS]आणि तू खूप नितीमान असलास तरी तू देवाला काही देऊ शकत नाहीस? [QE][QS]तुझ्याहातून त्यास काहीच मिळत नाही? [QE]
8. [QS]तुझे दुष्टपण कदाचित मनुष्यास ईजा पोहचवेल, जसा तू मनुष्य आहेस, [QE][QS]आणि तुझे नितीमत्वाचा कदाचीत एखाद्या मनुष्याच्या पुत्राला लाभ होईल. [QE]
9. [QS]पुष्कळशा वाईट कृत्यामुळे लोकांस दु:ख झाले तर ते ओरडतील. [QE][QS]ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात. [QE]
10. [QS]परंतु कोणीही असे म्हणणार नाहीत, मला निर्माण करणारा देव कुठे आहे? [QE][QS]जो रात्रीला गीत देतो, [QE]
11. [QS]‘देवाने आम्हास आकाशातील पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’ [QE][QS]पृथ्वीवरील जंगली प्राण्यापेक्षा जो मला अधीक शिकवतो, [QE]
12. [QS]त्यामुळे त्यांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही [QE][QS]कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत. [QE]
13. [QS]देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही [QE][QS]सर्वशक्तिमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. [QE]
14. [QS]तेव्हा, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही [QE][QS]तर तू त्याची वाट पाहत रहा! [QE]
15. [QS]तो तुला किती थोडक्यात उत्तर देईल जर तू असे म्हणालास तो क्रोधाने कोणालाही शिक्षा करीत नाही, [QE][QS]आणि तो लोकांच्या गर्वीष्ठपणाकडे फारसे लक्ष देत नाही. [QE]
16. [QS]म्हणून ईयोब मुर्खपणाचे बोलण्यासाठी त्याचे मुख उघडतो. [QE][QS]तो ज्ञानाविना त्याचे शब्द बोलत राहतो.” [QE]