1. {#1देवाच्या माहात्म्याचे अलीहू वर्णन करतो }
2. [PS]अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला, [PE][QS]“तू मला आणखी थोडे बोलण्याची परवानगी दे [QE][QS]कारण मला देवाच्या बाजूने आणखी बोलायचे आहे. [QE]
3. [QS]मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो [QE][QS]देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन. [QE]
4. [QS]खरोखर, माझे शब्द खोटे असणार नाहीत, [QE][QS]कोणीतरी ज्ञानाने समजूतदार असा तुम्हाबरोबर आहे. [QE]
5. [QS]देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही [QE][QS]तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे. [QE]
6. [QS]तो दुष्टांना वाचवीत नाही, [QE][QS]तर तो त्याऐवजी जे दुःखात आहेत त्यांच्यासाठी चांगले ते करतो. [QE]
7. [QS]जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. [QE][QS]तो चांगल्या लोकांस राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव उंच करतो. [QE]
8. [QS]जर, साखळदंडानी ठेवले, [QE][QS]जर त्यांना त्रासाच्या दोऱ्यांनी बांधून ठेवले [QE]
9. [QS]आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल. [QE][QS]देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे. देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल. [QE]
10. [QS]तो त्यांचे कान त्याच्या सूचना ऐकण्यास उघडतो, [QE][QS]तो त्यांना अन्यायापासून मागे वळवतो. [QE]
11. [QS]जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची उपासना करतील, [QE][QS]तर ते त्यांचे दिवस सुखाने घालतील. [QE]
12. [QS]परंतु जर त्यांनी ऐकले नाही तर ते तलवारीने नाश पावतील, [QE][QS]त्यांना ज्ञान न होता मरण येईल. [QE]
13. [QS]जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात. [QE][QS]देवाने जरी त्यांना बांधले तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात. [QE]
14. [QS]ते अगदी तरुणपणी मरतील, [QE][QS]त्यांचे जीवन कंलकीत होऊन संपेल. [QE]
15. [QS]परंतु देव दु:खी लोकांस त्यांच्या दु:खातून सोडवील [QE][QS]विपत्तीच्या द्वारे कानउघडणी करतो. [QE]
16. [QS]खरोखर, त्यास तुला दुःखातून काढायला आवडते [QE][QS]व अडचण नसलेल्या मोकळ्या जागी नेतो, [QE][QS]आणि तुझ्या जेवणाच्या टेबलावर भरपूर पौष्टीक अन्न ठेवले असते. [QE]
17. [QS]परंतु आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे, [QE][QS]दोषारोप व न्याय तुलाच धरतात. [QE]
18. [QS]तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस. [QE][QS]लाच तुला न पकडो आणि न्यायापासून दूर घेवून जावो. [QE]
19. [QS]आता तुझ्या सपंत्तीचा तुला काही नफा होईल काय, म्हणजे तू दुःखी होणार नाहीस [QE][QS]किंवा तुझ्या सर्व सामर्थ्याचा तुला काही उपयोग होईल काय? [QE]
20. [QS]दुसऱ्या विरूद्ध पाप करण्यास तू रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस, [QE][QS]लोक रात्री पसार होण्याची वेळ प्रयत्न करतात. [QE]
21. [QS]काळजीपूर्वक रहा पापाकडे वळू नकोस. [QE][QS]कारण तुझी त्रासातून परीक्षा झाली आहे, म्हणून तू पापापासुन दूर रहा. [QE]
22. [QS]पाहा, देव त्याच्या सामर्थ्याने सर्वोच्च आहे. [QE][QS]त्याच्या समान कोण शिक्षक आहे? [QE]
23. [QS]त्याच्या मार्गाबद्दल त्यास कोण सुचीत करील? [QE]
24. [PS]‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कोणी त्यास म्हणू शकत नाही. [PE][QS]त्याने जे काही केले त्याबद्दल [QE][QS]लोकांनी त्याच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत. [QE]
25. [QS]त्याने कार्य केले ते प्रत्येक मनुष्याला दिसते. [QE][QS]दूरदूरच्या देशांतील लोकांसही देवाचे महान कार्य दिसतात. [QE]
26. [QS]होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही. [QE][QS]आम्ही त्याच्या वर्षाची संख्या पाहाणे अशक्य आहे. [QE]
27. [QS]तो पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके [QE][QS]आणि पाऊस यामध्ये रुपांतर करतो. [QE]
28. [QS]अशा रीतीने ढग पाऊस पाडतात [QE][QS]आणि तो खूप लोकांवर पडतो. [QE]
29. [QS]खरोखर, तू समजो शकतो का तो ढगांची पाखरण कशी करतो [QE][QS]आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो? [QE]
30. [QS]बघ, तो विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो [QE][QS]आणि समुद्राचा खोल भागही त्यामध्ये येतो. [QE]
31. [QS]तो त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो [QE][QS]आणि त्यांना भरपूर अन्न देतो. [QE]
32. [QS]तो आपल्या हातांनी विजेला पकडतो [QE][QS]आणि त्यास हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो. [QE]
33. [QS]मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.” [QE]