1. [QS]“आता आरोळी मार, तुला उत्तर देईल असा कोण आहे? असा कोण एक धार्मिक आहे का ज्याच्याकडे तू जावे? [QE]
2. [QS]मूर्ख मनुष्याचा राग त्यास मारुन टाकतो, [QE][QS]जळफळाट मुर्खाला ठार मारतो. [QE]
3. [QS]मी मूर्ख व्यक्तीस मुळावलेले पाहीले, परंतु [QE][QS]अचानक मी त्याच्या घराचा तिरस्कार केला. [QE]
4. [QS]त्याची मुले सुरक्षिततेपासून फार दूर आहेत, ते शहराच्या वेशीत चिरडले जातील. [QE][QS]त्यांना तारणारा कोणीही राहणार नाही [QE]
5. [QS]भुकेल्या मनुष्यांनी त्याची उभी पिके खाऊन टाकली, [QE][QS]काट्याकुटयात वाढलेले धान्यही लोकांनी सोडले नाही, लोभी मनुष्यांनी सर्वकाही नेले. [QE]
6. [QS]अडचणी मातीतून येत नाहीत, [QE][QS]किंवा संकटे रानातून उगवत नाहीत. [QE]
7. [QS]परंतू जशा ठिणग्या वर उडतात, तसा मनुष्य स्वतःहा विघ्न निर्माण करतो. [QE]
8. [QS]परंतू माझ्यासाठी, मी स्वतःह देवाकडेच वळलो असतो, [QE][QS]त्याच्याकडे मी माझे गाऱ्हाने कबूल केले असते. [QE]
9. [QS]तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो, [QE][QS]त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही. [QE]
10. [QS]तो पृथ्वीवर पाऊस देतो. [QE][QS]आणि शेतांवर पाणी पाठवतो. [QE]
11. [QS]तो नम्र लोकांस उच्चस्थानी बसवतो [QE][QS]आणि जे राखेत बसून शोक करतात त्यांना तो सुरक्षीत उठवतो. [QE]
12. [QS]तो धूर्तांचे कार्य निष्फळ करतो, [QE][QS]म्हणजे त्यांच्या हांताचे कट सिध्दीस जाणार नाहीत. [QE]
13. [QS]तो शहाण्यास त्याच्याच धुर्ततेच्या जाळ्यात अडकवितो, [QE][QS]तो हूशार लोंकाच्या मसलती लवकर संपुष्टात आणतो. [QE]
14. [QS]त्यांचा भर दिवसाच अंधराशी सामना होतो, [QE][QS]दिवसा मध्यान्ह्यात ते रात्र असल्यासारखे चाचपडतात. [QE]
15. [QS]त्यांच्या मुखांतील तलवारीपासून तो दरीद्री मनुष्यास, [QE][QS]आणि बलंवताच्या हातातून गरजवंत मनुष्यास सोडवतो [QE]
16. [QS]म्हणून दरिद्री मनुष्यास आशा आहे, [QE][QS]आणि अन्याय आपले तोंड बंद करते. [QE]
17. [QS]पाहा, ज्या मनुष्याला देव दुरूस्त करतो तो सुखी आहे, [QE][QS]म्हणून सर्वशक्तिमानाच्या शिक्षेचा अवमान करु नकोस. [QE]
18. [QS]तोच जखम करतो आणि नंतर तोच पट्टी बांधतो. [QE][QS]तो जखमा करतो आणि नंतर त्याच्याच हाताने बरे करतो. [QE]
19. [QS]सहा संकटामधून तो तुझा बचाव करील, [QE][QS]खरोखर, सातही संकटात, दुष्ट तुला स्पर्श करणार नाही. [QE]
20. [QS]दुष्काळात (अवर्षण) तो तुला मृत्यूपासून आणि [QE][QS]लढाईत तलवारीपासून वाचवेल. [QE]
21. [QS]जिभेच्या दुःखदायी वाऱ्यापासून तू झाकला जाशील, [QE][QS]आणि विनाश तूझ्यावर येईल तेव्हा तू त्यास भिणार नाहीस. [QE]
22. [QS]तू विनाशात व दुष्काळात (अवर्षण) हसशील. [QE][QS]आणि तुला रानपशूंची भीती वाटणार नाही. [QE]
23. [QS]तुझ्या भूमीतील पाषाणाशीही तुझा करार होईल, [QE][QS]जंगली पशूशीही तू शांतीने राहशील [QE]
24. [QS]तुला समजेल तुझा तंबू त्याच्यामध्ये सुरक्षित आहे, [QE][QS]तू तुझ्या कळपाची पाहणी करशील आणि तुला काही कमतरता आढळणार नाही. [QE]
25. [QS]तुझे घराणे समृध्द होईल. वनातील कुरणासारखी तुझी संतती वाढेल असे तू पाहाशील. [QE]
26. [QS]जशी कापणीच्या वेळी वाळलेली गव्हाची पेंढी मळणीसाठी आणतात तसा तू वयोवृध्द होऊन कबरेत येशील. [QE]
27. [QS]पाहा, आम्ही या साऱ्यांचा अभ्यास केला आहे आणि ते सर्व खरे आहे. [QE][QS]म्हणून तू आमचे ऐक. आणि त्यातून स्वत:साठी काही शिक.” [QE]