4. त्या सर्वशक्तिमानाचे बाण माझ्यात आहेत.
माझ्या प्राण विषाला पिऊन घेत आहे, देवाने स्वतः त्याची दहशत माझ्या विरुध्द सज्ज केली आहे |
8. अहो, माझ्या विनंती प्रमाणे मला मिळाले आणि माझी आशा देव पूर्ण करील तर किती बरे!
ज्या गोष्टी हव्यात त्या देवाने मला दिल्या असत्या. |
9. जर देवाच्या ईच्छेत आले तर त्याने मला चिरडून टाकावे,
त्याने आपला हात मजवरून काढून घ्यावा आणि या जीवनातून मला मुक्त करावे. |
10. तशाने माझ्या दुःखाचा परीहार होईल,
जरी मी त्रासात असतो तरी मी दुःखात आनंद करीन, कारण जो पवित्र आहे त्याचे शब्द मी कधीही नाकारले नाही. |
13. माझ्यापासुन मला कोणतेही साहाय्य होत नाही हे सत्य नाही काय,
आणि ज्ञान माझ्यापासून हिरावून घेण्यात आले नाही काय? |
14. कमजोर व्यक्तीवर संकट आले,
त्याने सर्वशक्तिमान देवाचे भय धरणे सोडून दिले, तरी सुद्धा त्याच्या मित्राने विश्वासूपण दाखवावा. |
18. त्यांचा गट त्यांच्या मार्गाने प्रवास करीत असता ते पाण्यासाठी बाजूला वळतात
ते सुकलेल्या प्रदेशात भटकतात आणि नंतर नाश पावतात. |
20. त्याची अपेक्षाभंग झाली कारण त्यांना पाणी सापडण्याची खात्री होती,
ते तेथे गेले परंतु ते तेथे फसले. |
21. आता तुम्ही मित्र माझ्यासाठी काहीच नाही,
तुम्ही माझी भयानक परिस्थिती पाहीली आणि घाबरून गेला आहात. |
23. किंवा ‘माझ्याविरोधकाच्या हातून माझे रक्षण करा?
किंवा, क्रूर लोकांपासून खंडणी देऊन वाचवा!’ असे मी तुम्हास म्हटले का? |
26. तुम्ही माझे शब्द नाकारण्याची योजना केली आहे का?
निराश करणाऱ्या मनुष्याचे शब्द वाऱ्यासारखे आहेत का? |
29. मी तुम्हास विनंती करतो तुम्ही आता कडक धोरण सोडून द्या तुमच्याबरोबर अन्याय होणार नाही.
खरोखर, कडक धोरण सोडून द्या, कारण माझे ध्येय नितीचे आहे. |