1. [QS]सियोनात कर्णा फुंका, [QE][QS]आणि माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने गजर करा! [QE][QS]या देशात राहणाऱ्यांचा भीतीने थरकाप उडू द्या, [QE][QS]कारण परमेश्वराचा दिवस येत आहे; [QE][QS]खरोखर, तो जवळ आहे. [QE]
2. [QS]तो काळोखाचा आणि अंधाराचा प्रकाशाचा, [QE][QS]तो ढगाळ व दाट अंधकाराचा दिवस आहे. [QE][QS]तो पर्वतावर पसरलेल्या पहाटेसारखा, [QE][QS]त्याचे प्रचंड व शक्तीशाली सैन्य जवळ येत आहे. [QE][QS]त्यांच्यासारखे सैन्य कधी झाले नाही, [QE][QS]आणि त्यानंतरही अनेक पिढ्या, [QE][QS]पुन्हा कधीच होणार नाही. [QE]
3. [QS]त्यांच्यासमोर अग्नी प्रत्येक वस्तू नाश करत आहे, [QE][QS]आणि त्याच्यामागे ज्वाला जाळीत चालली आहे, [QE][QS]त्यांच्यासमोरची भूमी एदेनाच्या बागेसारखी आहे, [QE][QS]पण त्यांच्यामागे निर्जन वाळवंट आहे. [QE][QS]खरोखर, त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही. [QE]
4. [QS]सैन्याचे स्वरूप घोड्यांप्रमाणे आहे [QE][QS]आणि घोडस्वाराप्रमाणे ते धावतात. [QE]
5. [QS]त्यांच्या उड्या मारण्याचा आवाज, पर्वतावरून जाणाऱ्या रथांसारखा, [QE][QS]धसकट जाळणाऱ्या आग्नीसारखा, [QE][QS]युध्दासाठी सज्ज झालेल्या बलवानासारखा आहे. [QE]
6. [QS]त्यांच्यापुढे लोक व्यथित होतात [QE][QS]आणि त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडतात. [QE]
7. [QS]ते वीरासारखे धावतात, [QE][QS]ते सैनिकासारखे तटांवर चढतात, [QE][QS]ते प्रत्येक आपल्या मार्गात चालत जातात, [QE][QS]आणि आपली रांग तोडीत नाहीत. [QE]
8. [QS]ते एकमेकांना रेटीत नाहीत. [QE][QS]प्रत्येकजण आपल्या वाटेने जातात. [QE][QS]ते संरक्षणातून जातात [QE][QS]आणि ते रेषेबाहेर जात नाहीत. [QE]
9. [QS]ते नगरातून धावत फिरतात. [QE][QS]ते तटावर धावतात. [QE][QS]ते चढून घरात शिरतात. [QE][QS]चोराप्रमाणे ते खिडक्यांतून आत जातात. [QE]
10. [QS]त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, [QE][QS]आकाश थरथरते, [QE][QS]सूर्य आणि चंद्र काळे पडतात [QE][QS]आणि तारे तळपण्याचे थांबतात. [QE]
11. [QS]परमेश्वर आपल्या सैन्यापुढे आपला आवाज उंचावतो, [QE][QS]त्याचे योद्धे खूप असंख्य आहेत, [QE][QS]कारण जो कोणी त्याची आज्ञा आमलात आणतो तो बलशाली आहे. [QE][QS]कारण परमेश्वराचा दिवस हा मोठा आणि फार भयंकर आहे. [QE][QS]त्यामध्ये कोण टिकू शकेल? [QE]
12. {#1परमेश्वराची दया } [QS]“तरी आताही” परमेश्वर म्हणतो, [QE][QS]“तुम्ही आपल्या सर्व मनापासून माझ्याकडे परत या. [QE][QS]रडा, शोक करा आणि उपवास करा.” [QE]
13. [QS]आणि तुम्ही आपले कपडेच फाडू नका, तर आपले हृदय फाडा [QE][QS]आणि परमेश्वर तुमचा देव याकडे वळा, [QE][QS]कारण तो कृपाळू व दयाळू आहे, [QE][QS]तो रागावण्यास मंद आणि विपुल प्रेम करणारा आहे, [QE][QS]आणि त्याने लादलेल्या शिक्षेपासून तो मागे फिरेल. [QE]
14. [QS]परमेश्वर तुमचा देव याला कळवळा येऊन आणि कदाचित तो मागे वळेल, [QE][QS]आणि त्याच्यामागे आपल्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल की, काय कोण जाणे? [QE][QS]त्यास अन्नार्पण व पेयार्पण ही देता येतील? [QE]
15. [QS]सियोनात कर्णा फुंका. [QE][QS]एक पवित्र उपास नेमा, [QE][QS]आणि पवित्र मंडळीला बोलवा. [QE]
16. [QS]लोकांस एकत्र जमवा, [QE][QS]मंडळीला पवित्र करा. [QE][QS]वडिलांना एकत्र करा, [QE][QS]मुलांना आणि अंगावर दूध पिणाऱ्या अर्भकाना एकत्र जमवा. [QE][QS]वर आपल्या खोलीतून [QE][QS]आणि वधूही आपल्या मंडपातून बाहेर येवो. [QE]
17. [QS]याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना, [QE][QS]द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या. [QE][QS]त्यांनी म्हणावे, परमेश्वरा, आपल्या लोकांवर दया कर. [QE][QS]आणि आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. [QE][QS]म्हणून राष्ट्रांनी त्यांच्यावर अधिकार करावा. [QE][QS]राष्ट्रांनी आपसात असे कां म्हणावे त्यांचा देव कोठे आहे? [QE]
18. [QS]मग, तेव्हा परमेश्वराने देशासाठी, ईर्ष्या धरली, [QE][QS]आणि त्याने आपल्या लोकांवर दया केली. [QE]
19. [QS]परमेश्वराने आपल्या लोकांस उत्तर देऊन म्हटले, [QE][QS]“पाहा, मी तुमच्याकडे धान्य, नवा द्राक्षरस आणि तेल पाठवीन. [QE][QS]तुम्ही त्यांनी तृप्त व्हाल, [QE][QS]आणि ह्यापुढे, राष्ट्रात तुमची निंदा मी होऊ देणार नाही. [QE]
20. [QS]मी उत्तरेकडून हल्ला करणाऱ्यांना तुम्हापासून दूर करीन, [QE][QS]आणि मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात घालवून देईन. [QE][QS]त्यांची आघाडी पूर्व समुद्रात [QE][QS]आणि त्यांची पिछाडी पश्चिम समुद्रात जाईल. [QE][QS]त्यांचा दुर्गध चढेल. [QE][QS]आणि तेथे वाईट दुर्गंधी पसरेल. [QE][QS]मी महान गोष्टी करीन.” [QE]
21. [QS]हे भूमी, घाबरू नकोस. आनंद कर आणि उल्हसित हो, [QE][QS]कारण परमेश्वराने महान गोष्टी केल्या आहेत. [QE]
22. [QS]रानातल्या प्राण्यांनो, घाबरू नका. [QE][QS]कारण रानातील कुरणांत हिरवळ उगवेल, [QE][QS]झाडे त्यांचे फळे देतील, [QE][QS]आणि अंजिराची झाडे व द्राक्षवेली आपले पूर्ण पीक देतील. [QE]
23. [QS]म्हणून सियोनवासीयांनो, आनंदीत व्हा. [QE][QS]आणि परमेश्वर तुमच्या देवामध्ये उल्हासित व्हा. [QE][QS]कारण तुम्हास हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो, [QE][QS]तो पहिली पर्जन्यवृष्टी योग्य प्रमाणाने देतो, [QE][QS]आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो. [QE]
24. [QS]खळी गव्हाने भरून जातील, [QE][QS]आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतूनाच्या तेलाने भरून वाहतील. [QE]
25. [QS]मी, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठवले. [QE][QS]तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले. [QE][QS]मी, तुमच्या संकटाच्या वर्षाची भरपाई करीन. [QE]
26. [QS]मग तुम्हास भरपूर खायला मिळेल. तुम्ही तृप्त व्हाल. [QE][QS]आणि तुम्ही, तुमच्या परमेश्वर देवाची, स्तुती कराल. [QE][QS]त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत. [QE][QS]माझ्या लोकांस पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही. [QE]
27. [QS]मी इस्राएलाच्या बाजूने आहे हे तुम्हास समजेल. [QE][QS]आणि मी परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे, [QE][QS]आणि दुसरा कोणीच नाही. [QE][QS]माझ्या लोकांस पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही. [QE]
28. [QS]ह्यानंतर मी माझा आत्मा सर्व देहावर ओतीन, [QE][QS]आणि तुमची मुले आणि तुमच्या मुली भविष्य सांगतील. [QE][QS]तुमच्यातील वृद्धांना स्वप्न पडतील. [QE][QS]तुमच्यातील तरूणांना दृष्टांत होतील. [QE]
29. [QS]आणि त्या दिवसात मी माझा आत्मा [QE][QS]दासांवर व स्त्री दासीवरसुद्धा ओतीन. [QE]
30. [QS]मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक चिन्हे [QE][QS]आणि तेथे रक्त, अग्नी व दाट धुराचे खांब दाखवीन. [QE]
31. [QS]परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवण्यापूर्वी [QE][QS]सूर्य बदलून अंधकारमय [QE][QS]आणि चंद्र रक्तमय असा होईल. [QE]
32. [QS]जसे परमेश्वराने म्हटले, [QE][QS]जो कोणी परमेश्वराच्या नावाने हाक मारील तो प्रत्येकजण वाचेल. [QE][QS]जे कोणी बचावतील ते सियोन पर्वतावर व यरूशलेमेत राहतील, [QE][QS]आणि ज्यांना परमेश्वर बोलावतो, [QE][QS]ते बाकी वाचलेल्यात राहतील. [QE]