मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
योएल
1. {परमेश्वराने केलेला राष्ट्रांचा न्याय} [PS] पाहा, त्यादिवसामध्ये आणि त्यावेळी, [QBR] जेव्हा मी यहूदाचे व यरूशलेमेचे बंदीवान परत आणीन, [QBR]
2. मी, सर्व राष्ट्रांना गोळा करून, [QBR] खाली यहोशाफाटाच्या दरीत आणीन. [QBR] कारण माझ्या लोकांकरता आणि माझे वतन इस्राएल [QBR] ज्यांना त्यांनी इतर राष्ट्रात पांगविले. [QBR] आणि त्या राष्ट्रांनी माझा देश वाटून घेतला. [QBR] तेथे मी त्यांचा न्यायनिवाडा करीन.
3. त्यांनी माझ्या लोकांकरता चिठ्ठ्या टाकल्या. [QBR] त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली [QBR] आणि मद्यासाठी म्हणून मुलगी विकली. [QBR]
4. सोर, सीदोन व पलिष्टीच्या सर्व प्रांतानो, आता तुम्ही माझ्यावर का रागावता? [QBR] तुम्ही माझी परत फेड कराल का? [QBR] जरी तुम्ही माझी परत फेड केली तरी, [QBR] मी त्वरेने तुमचा सूड तुमच्याच मस्तकावर फिरवीन. [QBR]
5. तुम्ही माझे चांदी आणि सोने घेतले आहे, [QBR] आणि तुम्ही माझा अमूल्य खजिना आपल्या मंदिरात नेला आहे. [QBR]
6. तुम्ही यहूदाच्या व यरूशलेमेच्या लोकांस [QBR] त्यांच्या देशातून सीमेपासून दूर न्यावे म्हणून यावान लोकांस विकले. [QBR]
7. पाहा, तुम्ही त्यांना ज्या जागी विकले त्यातून मी त्यांना सोडून आणीन, [QBR] आणि तुमच्या मस्तकावर त्याचे प्रतिफळ फिरवीन. [QBR]
8. मी तुमच्या मुलांना आणि मुलींना [QBR] यहूदी लोकांच्या हाती विकीन. [QBR] मग ते त्यांना शबाच्या लोकांस [QBR] दूरच्या राष्ट्रांस विकतील. [QBR] कारण परमेश्वर हे बोलला आहे. [QBR]
9. राष्ट्रांमध्ये ही घोषणा कराः [QBR] युध्दाला सज्ज व्हा, [QBR] बलवान मनुष्यांना उठवा, [QBR] त्यांना जवळ येऊ द्या, [QBR] सर्व लढवय्ये मनुष्ये पुढे येवोत. [QBR]
10. तुमचे फाळ मोडून त्यांच्या तलवारी करा. [QBR] आणि कोयत्यांपासून भाले करा. [QBR] दुर्बल म्हणो की, [QBR] मी बलवान आहे. [QBR]
11. तुमच्या जवळच्या सर्व राष्ट्रांनो, [QBR] त्वरा करा व या! तुम्ही स्वतः एकत्र या. [QBR] हे परमेश्वरा, [QBR] तुझे बलवान योध्दे उतरून येतील असे कर. [QBR]
12. राष्ट्रे स्वतःउठून जागी होवोत, [QBR] आणि यहोशाफाटाच्या दरीत येवोत. [QBR] तेथे मी सभोवतालच्या [QBR] सर्व राष्ट्रांचा न्याय करायला बसेन. [QBR]
13. विळा आणा, [QBR] कारण पीक तयार झाले आहे. [QBR] म्हणून तुम्ही विळा घाला, [QBR] या, द्राक्षे तुडवा, [QBR] कारण त्यांचे द्राक्षकुंड भरून गेले आहे. [QBR] पिंप भरून वाहत आहेत. [QBR] कारण त्यांची दुष्टाई मोठी आहे. [QBR]
14. तेथे गलबला आहे, न्यायाच्या दरीत गलबला आहे. [QBR] कारण न्यायाच्या दरीत परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे. [QBR]
15. चंद्र आणि सूर्य काळवंडतील, [QBR] तारे त्यांचा प्रकाश देण्याचे थांबतील.
16. {यहूदाची सुटका} [PS] परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील, [QBR] आणि आपला आवाज यरूशलेमेतून उंचावील. [QBR] आकाश व पृथ्वी कापतील [QBR] पण परमेश्वर आपल्या लोकांस सुरक्षित स्थान, [QBR] आणि इस्राएलाच्या लोकांस तो दुर्ग होईल. [QBR]
17. मग तुम्हास कळेल की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. [QBR] माझ्या पवित्र पर्वतावर, म्हणजे सियोनात मी राहतो. [QBR] तेव्हा यरूशलेम पवित्र होईल. [QBR] आणि त्या नगरीतून पुन्हा कधीही परके येणार जाणार नाहीत. [QBR]
18. त्यादिवशी, असे होईल की, पर्वतावरून गोड द्राक्षरस पाझरेल, [QBR] टेकड्यांवरून दूध वाहील, [QBR] यहूदाच्या सर्व कोरडे पडलेल्या ओढ्यामधून पाणी वाहील, [QBR] आणि परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील [QBR] आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील. [QBR]
19. मिसराची नासाडी होऊन तो उजाड होईल, [QBR] कारण त्यांनी यहूदी लोकांवर जुलूम केला [QBR] अदोम ओसाड रान होईल, [QBR] कारण त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांचे रक्त पाडले. [QBR]
20. परंतु, यहूदा सर्वकाळ वसेल, [QBR] आणि यरूशलेम पिढ्यानपिढ्या राहील. [QBR]
21. मी त्यांच्या रक्ताचा सूड अजून घेतला नाही तो सूड मी घेईन. [QBR] कारण परमेश्वर सियोनात वस्ती करतो. [PE]

Notes

No Verse Added

Total 3 अध्याय, Selected धडा 3 / 3
1 2 3
योएल 3
परमेश्वराने केलेला राष्ट्रांचा न्याय 1 पाहा, त्यादिवसामध्ये आणि त्यावेळी, जेव्हा मी यहूदाचे व यरूशलेमेचे बंदीवान परत आणीन, 2 मी, सर्व राष्ट्रांना गोळा करून, खाली यहोशाफाटाच्या दरीत आणीन. कारण माझ्या लोकांकरता आणि माझे वतन इस्राएल ज्यांना त्यांनी इतर राष्ट्रात पांगविले. आणि त्या राष्ट्रांनी माझा देश वाटून घेतला. तेथे मी त्यांचा न्यायनिवाडा करीन. 3 त्यांनी माझ्या लोकांकरता चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली आणि मद्यासाठी म्हणून मुलगी विकली. 4 सोर, सीदोन व पलिष्टीच्या सर्व प्रांतानो, आता तुम्ही माझ्यावर का रागावता? तुम्ही माझी परत फेड कराल का? जरी तुम्ही माझी परत फेड केली तरी, मी त्वरेने तुमचा सूड तुमच्याच मस्तकावर फिरवीन. 5 तुम्ही माझे चांदी आणि सोने घेतले आहे, आणि तुम्ही माझा अमूल्य खजिना आपल्या मंदिरात नेला आहे. 6 तुम्ही यहूदाच्या व यरूशलेमेच्या लोकांस त्यांच्या देशातून सीमेपासून दूर न्यावे म्हणून यावान लोकांस विकले. 7 पाहा, तुम्ही त्यांना ज्या जागी विकले त्यातून मी त्यांना सोडून आणीन, आणि तुमच्या मस्तकावर त्याचे प्रतिफळ फिरवीन. 8 मी तुमच्या मुलांना आणि मुलींना यहूदी लोकांच्या हाती विकीन. मग ते त्यांना शबाच्या लोकांस दूरच्या राष्ट्रांस विकतील. कारण परमेश्वर हे बोलला आहे. 9 राष्ट्रांमध्ये ही घोषणा कराः युध्दाला सज्ज व्हा, बलवान मनुष्यांना उठवा, त्यांना जवळ येऊ द्या, सर्व लढवय्ये मनुष्ये पुढे येवोत. 10 तुमचे फाळ मोडून त्यांच्या तलवारी करा. आणि कोयत्यांपासून भाले करा. दुर्बल म्हणो की, मी बलवान आहे. 11 तुमच्या जवळच्या सर्व राष्ट्रांनो, त्वरा करा व या! तुम्ही स्वतः एकत्र या. हे परमेश्वरा, तुझे बलवान योध्दे उतरून येतील असे कर. 12 राष्ट्रे स्वतःउठून जागी होवोत, आणि यहोशाफाटाच्या दरीत येवोत. तेथे मी सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करायला बसेन. 13 विळा आणा, कारण पीक तयार झाले आहे. म्हणून तुम्ही विळा घाला, या, द्राक्षे तुडवा, कारण त्यांचे द्राक्षकुंड भरून गेले आहे. पिंप भरून वाहत आहेत. कारण त्यांची दुष्टाई मोठी आहे. 14 तेथे गलबला आहे, न्यायाच्या दरीत गलबला आहे. कारण न्यायाच्या दरीत परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे. 15 चंद्र आणि सूर्य काळवंडतील, तारे त्यांचा प्रकाश देण्याचे थांबतील. यहूदाची सुटका 16 परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील, आणि आपला आवाज यरूशलेमेतून उंचावील. आकाश व पृथ्वी कापतील पण परमेश्वर आपल्या लोकांस सुरक्षित स्थान, आणि इस्राएलाच्या लोकांस तो दुर्ग होईल. 17 मग तुम्हास कळेल की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. माझ्या पवित्र पर्वतावर, म्हणजे सियोनात मी राहतो. तेव्हा यरूशलेम पवित्र होईल. आणि त्या नगरीतून पुन्हा कधीही परके येणार जाणार नाहीत. 18 त्यादिवशी, असे होईल की, पर्वतावरून गोड द्राक्षरस पाझरेल, टेकड्यांवरून दूध वाहील, यहूदाच्या सर्व कोरडे पडलेल्या ओढ्यामधून पाणी वाहील, आणि परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील. 19 मिसराची नासाडी होऊन तो उजाड होईल, कारण त्यांनी यहूदी लोकांवर जुलूम केला अदोम ओसाड रान होईल, कारण त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांचे रक्त पाडले. 20 परंतु, यहूदा सर्वकाळ वसेल, आणि यरूशलेम पिढ्यानपिढ्या राहील. 21 मी त्यांच्या रक्ताचा सूड अजून घेतला नाही तो सूड मी घेईन. कारण परमेश्वर सियोनात वस्ती करतो.
Total 3 अध्याय, Selected धडा 3 / 3
1 2 3
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References