1. {#1पित्याकडे जाण्याचा मार्ग } [PS] [SCJ]“तुमचे अंतःकरण घाबरू देऊ नका; देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा.[SCJ.]
2. [SCJ]माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो[SCJ.]
3. [SCJ]आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन; यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.[SCJ.]
4. [SCJ]मी जातो तिकडचा मार्ग तुम्हास माहीत आहे.”[SCJ.]
5. थोमा त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हास माहीत नाही; मग मार्ग आम्हास कसा माहीत असणार?”
6. येशूने त्यास म्हटले, [SCJ]“मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.[SCJ.]
7. [SCJ]मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्यास ओळखता आणि तुम्ही त्यास पाहिलेही आहे.”[SCJ.] [PE]
8. [PS]फिलिप्प, त्यास म्हणाला, “प्रभूजी, आम्हास पिता दाखवा, म्हणजे आम्हास तेवढे पुरे आहे.”
9. येशूने त्यास म्हटलेः [SCJ]“फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हास पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस?[SCJ.]
10. [SCJ]मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हास सांगतो, त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो.[SCJ.]
11. [SCJ]मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा; नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा.[SCJ.] [PE]
12. [PS] [SCJ]मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.[SCJ.]
13. [SCJ]पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.[SCJ.]
14. [SCJ]तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.[SCJ.] [PE]
15. {#1पवित्र आत्मा मिळण्याबद्दल वचन } [PS] [SCJ]माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.[SCJ.]
16. [SCJ]मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ रहावे.[SCJ.]
17. [SCJ]तो सत्याचा आत्मा आहे, जग त्यास ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्यास पाहत नाही अथवा त्यास ओळखीत नाही; तुम्ही त्यास ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील.[SCJ.]
18. [SCJ]मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही; मी तुम्हाकडे येईन.[SCJ.]
19. [SCJ]आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही. पण तुम्ही मला पाहाल; मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत रहाल.[SCJ.]
20. [SCJ]त्यादिवशी तुम्हास समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे.[SCJ.]
21. [SCJ]ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्यास प्रकट होईन.”[SCJ.]
22. यहूदा (इस्कार्योत नव्हे) त्यास म्हणाला, “प्रभूजी, असे काय झाले की, आपण स्वतः आम्हास प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?”
23. येशूने त्यास उत्तर दिले, [SCJ]“ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील; माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू.[SCJ.]
24. [SCJ]जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही आणि तुम्ही जे वचन ऐकता ते माझे नाही तर ज्याने मला पाठवले त्या पित्याचे आहे.[SCJ.] [PE]
25. [PS] [SCJ]मी तुमच्याबरोबर राहत असतांना या गोष्टी तुम्हास सांगितल्या आहेत.[SCJ.]
26. [SCJ]तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.[SCJ.]
27. [SCJ]मी तुम्हास शांती देऊन ठेवितो; मी आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही; तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नये, [SCJ.]
28. [SCJ]‘मी जातो आणि तुम्हाकडे परत येईन.’ असे जे मी तुम्हास सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हास आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.[SCJ.]
29. [SCJ]ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्याअगोदर, आता मी तुम्हास सांगितले आहे, [SCJ.]
30. [SCJ]यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा शासक येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.[SCJ.]
31. [SCJ]परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ.”[SCJ.] [PE]