मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
योहान
1. {#1येशूला अटक [BR]मत्त. 26:47-56; मार्क 14:43-52; लूक 22:47-53 } [PS]हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले.
2. ही जागा त्यास धरून देणाऱ्या यहूदालाही माहीत होती कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे.
3. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक लोक व परूशी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर, दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन यहूदा तेथे आला.
4. येशू आपणावर जे काही येणार हे सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, [SCJ]“तुम्ही कोणाला शोधत आहात?”[SCJ.]
5. त्यांनी त्यास उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” तो त्यांना म्हणाला, [SCJ]“तो मी आहे.”[SCJ.] आणि ज्या यहूदाने त्यास धरून दिले देखील त्यांच्याबरोबर उभा होता,
6. [SCJ]“तो मीच आहे,”[SCJ.] असे म्हणताच ते मागे सरकून जाऊन जमिनीवर पडले.
7. मग त्याने त्यांना पुन्हा विचारले, [SCJ]“तुम्ही कोणाला शोधता?”[SCJ.] आणि ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.”
8. येशूने उत्तर दिले, [SCJ]“मीच तो आहे; असे मी तुम्हास सांगितले, तुम्ही मला शोधीत असला तर यांना जाऊ द्या.”[SCJ.]
9. [SCJ]“जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरविला नाही,”[SCJ.] असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले.
10. तेव्हा शिमोन पेत्राजवळ तलवार असल्याने त्याने ती उपसली व महायाजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते.
11. तेव्हा येशू पेत्राला म्हणाला, [SCJ]“तरवार म्यानात घाल. पित्याने मला जो प्याला दिला आहे तो मी पिऊ नये काय?”[SCJ.] [PE]
12. [PS]मग सैनिकांची तुकडी व हजारांचा सरदार आणि यहूद्यांचे अधिकारी हे येशूला धरून बांधले.
13. आणि त्यास प्रथम हन्नाकडे नेले कारण, त्या वर्षी महायाजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता,
14. एका मनुष्याने लोकांसाठी मरावे हे फायद्याचे आहे. अशी मसलत यहूद्यास याच कयफाने दिली होती. [PE]
15. {#1पेत्र येशूला नाकारतो [BR]मत्त. 26:69-75; मार्क 14:66-72; लूक 22:54-62 } [PS]शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे मागे चालले; तो शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता आणि येशूबरोबर महायाजकाच्या वाड्यात गेला.
16. पण पेत्र बाहेर, दाराशी उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले.
17. यावरुन ती तरूण द्वारपालिका होती ती पेत्राला म्हणाली, “तूही या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय?” तो म्हणाला, “मी नाही.”
18. थंडी असल्यामुळे दास व कामदार कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि पेत्र पण त्यांच्याबरोबर शेकत उभा होता. [PE]
19. [PS]तेव्हा महायाजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिक्षणाविषयी प्रश्न केले.
20. येशूने त्यास उत्तर दिले, [SCJ]“मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानात आणि परमेश्वराच्या भवनात, सर्व यहूदी जमतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले आणि गुप्तपणे मी काही बोललो नाही.[SCJ.]
21. [SCJ]मला का विचारता? मी काय बोलतो ते. ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा. पाहा, मी जे बोललो ते त्यांना माहीत आहे.”[SCJ.]
22. त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चापट मारून म्हणाला, “तू महायाजकाला असे उत्तर देतोस काय?”
23. येशूने त्यास उत्तर दिले, [SCJ]“मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर; योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस?”[SCJ.]
24. तेव्हा हन्नाने त्यास महायाजक कयफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले. [PE]
25. [PS]शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता; त्यास इतर म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” त्याने नाकारले व म्हटले, “मी नाही.”
26. पेत्राने ज्याचा कान कापला होता त्याचा नातलग असलेला, महायाजकाच्या दासांपैकी एक होता, तो त्यास म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?”
27. पेत्राने पुन्हा नाकारले आणि, लागलाच, कोंबडा आरवला. [PE]
28. [PS]तेव्हा त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यांत नेले; तेव्हा सकाळ होती आणि आपण अशुद्ध होऊ नये, पण वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकारवाड्यांत गेले नाहीत.
29. यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही या मनुष्यावर काय आरोप ठेवता?”
30. त्यांनी त्यास उत्तर दिले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्यास आपल्या हाती दिले नसते.”
31. पिलाताने त्यांना म्हटले, “त्याला तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहूदी अधिकारी त्यास म्हणाले, “आम्हास कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.”
32. आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवितांना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. [PE]
33. [PS]म्हणून पिलात पुन्हा सरकारवाड्यांत गेला; आणि त्याने येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
34. येशूने उत्तर दिले, [SCJ]“आपण स्वतः हे म्हणता किंवा दुसर्‍यांनी आपणाला माझ्याविषयी हे सांगितले?”[SCJ.]
35. पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले; तू काय केले.”
36. येशूने उत्तर दिले, [SCJ]“माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर यहूद्यांच्या हाती मी दिला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; पण माझे राज्य येथले नाही.”[SCJ.]
37. म्हणून पिलात त्यास म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, [SCJ]“मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे. मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”[SCJ.] [PE]
38. [PS]पिलात त्यास म्हणाला, “सत्य काय आहे?” आणि हे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.
39. पण तुमच्यासाठी वल्हांडण सणांत मी एकाला सोडावे अशी तुमच्यात रीत आहे; तर तुमच्यासाठी मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?”
40. तेव्हा पुन्हा ते ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा” आता बरब्बा हा एक लुटारू होता. [PE]
Total 21 अध्याय, Selected धडा 18 / 21
1 2 3 4 5 6 7 8 9
10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21
येशूला अटक
मत्त. 26:47-56; मार्क 14:43-52; लूक 22:47-53

1 हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती; तेथे तो व त्याचे शिष्य गेले. 2 ही जागा त्यास धरून देणाऱ्या यहूदालाही माहीत होती कारण येशू पुष्कळ वेळा आपल्या शिष्यांबरोबर तेथे जात असे. 3 तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक लोक व परूशी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर, दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन यहूदा तेथे आला. 4 येशू आपणावर जे काही येणार हे सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधत आहात?” 5 त्यांनी त्यास उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” तो त्यांना म्हणाला, “तो मी आहे.” आणि ज्या यहूदाने त्यास धरून दिले देखील त्यांच्याबरोबर उभा होता, 6 “तो मीच आहे,” असे म्हणताच ते मागे सरकून जाऊन जमिनीवर पडले. 7 मग त्याने त्यांना पुन्हा विचारले, “तुम्ही कोणाला शोधता?” आणि ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.” 8 येशूने उत्तर दिले, “मीच तो आहे; असे मी तुम्हास सांगितले, तुम्ही मला शोधीत असला तर यांना जाऊ द्या.” 9 “जे तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरविला नाही,” असे जे वचन तो बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. 10 तेव्हा शिमोन पेत्राजवळ तलवार असल्याने त्याने ती उपसली व महायाजकाच्या दासावर चालविली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. 11 तेव्हा येशू पेत्राला म्हणाला, “तरवार म्यानात घाल. पित्याने मला जो प्याला दिला आहे तो मी पिऊ नये काय?” 12 मग सैनिकांची तुकडी व हजारांचा सरदार आणि यहूद्यांचे अधिकारी हे येशूला धरून बांधले. 13 आणि त्यास प्रथम हन्नाकडे नेले कारण, त्या वर्षी महायाजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता, 14 एका मनुष्याने लोकांसाठी मरावे हे फायद्याचे आहे. अशी मसलत यहूद्यास याच कयफाने दिली होती. पेत्र येशूला नाकारतो
मत्त. 26:69-75; मार्क 14:66-72; लूक 22:54-62

15 शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे मागे चालले; तो शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता आणि येशूबरोबर महायाजकाच्या वाड्यात गेला. 16 पण पेत्र बाहेर, दाराशी उभा राहिला होता, म्हणून जो दुसरा शिष्य महायाजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. 17 यावरुन ती तरूण द्वारपालिका होती ती पेत्राला म्हणाली, “तूही या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय?” तो म्हणाला, “मी नाही.” 18 थंडी असल्यामुळे दास व कामदार कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि पेत्र पण त्यांच्याबरोबर शेकत उभा होता. 19 तेव्हा महायाजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिक्षणाविषयी प्रश्न केले. 20 येशूने त्यास उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानात आणि परमेश्वराच्या भवनात, सर्व यहूदी जमतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले आणि गुप्तपणे मी काही बोललो नाही. 21 मला का विचारता? मी काय बोलतो ते. ज्यांनी ऐकले आहे त्यांना विचारा. पाहा, मी जे बोललो ते त्यांना माहीत आहे.” 22 त्याने असे म्हटल्याबरोबर जवळ उभा राहणारा एक कामदार येशूला चापट मारून म्हणाला, “तू महायाजकाला असे उत्तर देतोस काय?” 23 येशूने त्यास उत्तर दिले, “मी वाईट रीतीने बोललो असलो तर कसे वाईट बोललो ते सिद्ध कर; योग्य रीतीने बोललो असलो तर मला का मारतोस?” 24 तेव्हा हन्नाने त्यास महायाजक कयफा याच्याकडे बांधलेलेच पाठवले. 25 शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता; त्यास इतर म्हणाले, “तूही त्याच्या शिष्यांतला आहेस काय?” त्याने नाकारले व म्हटले, “मी नाही.” 26 पेत्राने ज्याचा कान कापला होता त्याचा नातलग असलेला, महायाजकाच्या दासांपैकी एक होता, तो त्यास म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोबर बागेत नाही का पाहिले?” 27 पेत्राने पुन्हा नाकारले आणि, लागलाच, कोंबडा आरवला. 28 तेव्हा त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यांत नेले; तेव्हा सकाळ होती आणि आपण अशुद्ध होऊ नये, पण वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकारवाड्यांत गेले नाहीत. 29 यास्तव पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही या मनुष्यावर काय आरोप ठेवता?” 30 त्यांनी त्यास उत्तर दिले, “तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्यास आपल्या हाती दिले नसते.” 31 पिलाताने त्यांना म्हटले, “त्याला तुम्हीच आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहूदी अधिकारी त्यास म्हणाले, “आम्हास कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” 32 आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवितांना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. 33 म्हणून पिलात पुन्हा सरकारवाड्यांत गेला; आणि त्याने येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” 34 येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः हे म्हणता किंवा दुसर्‍यांनी आपणाला माझ्याविषयी हे सांगितले?” 35 पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले; तू काय केले.” 36 येशूने उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर यहूद्यांच्या हाती मी दिला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; पण माझे राज्य येथले नाही.” 37 म्हणून पिलात त्यास म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे. मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” 38 पिलात त्यास म्हणाला, “सत्य काय आहे?” आणि हे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर गेला आणि त्यांना म्हणाला, “मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही. 39 पण तुमच्यासाठी वल्हांडण सणांत मी एकाला सोडावे अशी तुमच्यात रीत आहे; तर तुमच्यासाठी मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?” 40 तेव्हा पुन्हा ते ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा” आता बरब्बा हा एक लुटारू होता.
Total 21 अध्याय, Selected धडा 18 / 21
1 2 3 4 5 6 7 8 9
10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21
×

Alert

×

Marathi Letters Keypad References