1. {#1ययोनाची उपकारस्तुतीची प्रार्थना } [PS]नंतर माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली
2. तो म्हणाला, [PE][QS]“मी आपल्या आपत्तीमध्ये परमेश्वरास हाक मारली, [QE][QS]आणि त्याने मला उत्तर दिले; [QE][QS]मी मृत्यूलोकाच्या पोटातून मदतीकरता हाक मारली! [QE][QS]तू माझा आवाज ऐकलास. [QE]
3. [QS]तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले, [QE][QS]आणि प्रवाहाने मला वेढले, [QE][QS]तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ [QE][QS]माझ्यावरून गेला. [QE]
4. [QS]आणि मी म्हणालो, ‘मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे; [QE][QS]तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन?’ [QE]
5. [QS]जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले; [QE][QS]आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले, [QE][QS]समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले. [QE]
6. [QS]मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो; [QE][QS]पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले; [QE][QS]तथापि माझ्या देवा परमेश्वरा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे. [QE]
7. [QS]जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले, [QE][QS]आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहंचली. [QE]
8. [QS]जे निरर्थक मूर्तींकडे आपले चित्त लावतात, [QE][QS]ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात. [QE]
9. [QS]परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन; [QE][QS]जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन, [QE][QS]तारण परमेश्वराकडूनच आहे.” [QE]
10. [MS] मग परमेश्वराने त्या मोठ्या माश्याला आज्ञा केली; तेव्हा त्याने योनाला कोरडया भूमीवर ओकून टाकले. [ME]