मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
योना
1. {ययोनाची उपकारस्तुतीची प्रार्थना} [PS] नंतर माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली
2. तो म्हणाला, [QBR] “मी आपल्या आपत्तीमध्ये परमेश्वरास हाक मारली, [QBR] आणि त्याने मला उत्तर दिले; [QBR] मी मृत्यूलोकाच्या पोटातून मदतीकरता हाक मारली! [QBR] तू माझा आवाज ऐकलास. [QBR]
3. तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले, [QBR] आणि प्रवाहाने मला वेढले, [QBR] तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ [QBR] माझ्यावरून गेला. [QBR]
4. आणि मी म्हणालो, ‘मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे; [QBR] तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन?’ [QBR]
5. जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले; [QBR] आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले, [QBR] समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले. [QBR]
6. मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो; [QBR] पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले; [QBR] तथापि माझ्या देवा परमेश्वरा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे. [QBR]
7. जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले, [QBR] आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहंचली. [QBR]
8. जे निरर्थक मूर्तींकडे आपले चित्त लावतात, [QBR] ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात. [QBR]
9. परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन; [QBR] जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन, [QBR] तारण परमेश्वराकडूनच आहे.”
10. मग परमेश्वराने त्या मोठ्या माश्याला आज्ञा केली; तेव्हा त्याने योनाला कोरडया भूमीवर ओकून टाकले. [PE]

Notes

No Verse Added

Total 4 अध्याय, Selected धडा 2 / 4
1 2 3 4
योना 2:7
ययोनाची उपकारस्तुतीची प्रार्थना 1 नंतर माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली 2 तो म्हणाला, “मी आपल्या आपत्तीमध्ये परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने मला उत्तर दिले; मी मृत्यूलोकाच्या पोटातून मदतीकरता हाक मारली! तू माझा आवाज ऐकलास. 3 तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले, आणि प्रवाहाने मला वेढले, तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ माझ्यावरून गेला. 4 आणि मी म्हणालो, ‘मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन?’ 5 जलांनी प्राण जाईपर्यंत मला झाकले; आणि डोहाने सर्वबाजूनी मला घेरले, समुद्रातील शेवाळाने माझ्या डोक्याला लपेटले. 6 मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले; तथापि माझ्या देवा परमेश्वरा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे. 7 जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहंचली. 8 जे निरर्थक मूर्तींकडे आपले चित्त लावतात, ते स्वतः आपल्या दयानिधीला नाकारतात. 9 परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन; जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन, तारण परमेश्वराकडूनच आहे.” 10 मग परमेश्वराने त्या मोठ्या माश्याला आज्ञा केली; तेव्हा त्याने योनाला कोरडया भूमीवर ओकून टाकले.
Total 4 अध्याय, Selected धडा 2 / 4
1 2 3 4
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References