1. {शिलो येथील प्रदेशाची वाटणी} PS मग इस्राएलाची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली, आणि तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला, आणि त्यांच्यापुढे सर्व देश जिंकलेला होता.
|
3. यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या लोकांस म्हटले, “जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिला, तो आपल्या ताब्यात घेण्यासाठी किती उशीर करणार आहात?”
|
4. तुम्ही आपल्यासाठी प्रत्येक वंशातली तीन माणसे नेमा; म्हणजे मी त्यांना पाठवीन, आणि त्यांनी देशात जाऊन चोहोकडे फिरून त्यांच्या वतनाच्या विभागाप्रमाणे, वर्णन लिहून माझ्याजवळ आणावे.
|
5. म्हणजे त्यांनी त्याचे सात वाटे करावे; यहूदाने दक्षिणेस आपल्या सीमेत रहावे, आणि योसेफाच्या घराण्याने उत्तरेस आपल्या सीमेत रहावे.
|
6. तसे तुम्ही देशाच्या वेगवेगळ्या सात वाट्यांचे वर्णन लिहा आणि ते वर्णन इकडे माझ्याजवळ आणा; मग येथे आपला देव परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.
|
7. लेव्यांना तर तुमच्यामध्ये वाटा नाही; कारण की परमेश्वराचे याजकपण तेच त्यांचे वतन आहे; आणि गाद व रऊबेन व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना, यार्देनेच्या पलीकडे पूर्वेला, वतन मिळाले आहे परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना ते दिले आहे.
|
8. तेव्हा ती माणसे तेथून निघून देशभर फिरली आणि यहोशवाने देशाचे वर्णन करणाऱ्यांना आज्ञा दिली; तो म्हणाला, “देशात चोहोकडे फिरून त्याचे वर्णन लिहा आणि माझ्याकडे परत या. मी येथे शिलोत परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.”
|
9. याप्रमाणे ती माणसे जाऊन देशभर फिरली, आणि त्यातील नगरांप्रमाणे त्यांच्या सात विभागाचे वर्णन वहीत लिहून त्यांनी शिलोतल्या छावणीत यहोशवाजवळ आणले.
|
10. मग यहोशवाने त्यांच्यासाठी शिलोमध्ये परमेश्वरासमोर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या; असा यहोशवाने तेथे तो देश इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या त्यांच्या वतन भागाप्रमाणे वाटून दिला. PS
|
11. {बन्यामिनाला देण्यात आलेला प्रदेश} PS तेव्हा बन्यामिनाच्या वंशजांना नेमून दिलेला प्रदेश त्यांच्या कुळांप्रमाणे चिठ्ठी टाकून जो वाटा मिळाला तो असा; त्यांच्या वाट्याची सीमा यहूदाचे वंशज व योसेफाचे वंशज यांच्या मध्यभागी निघाली.
|
12. म्हणजे उत्तर बाजूला त्यांची सीमा यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तरेकडून वर जाऊन, पश्चिमेकडे डोंगरावरून बेथ-आवेनापर्यंत रानात निघते.
|
13. मग तेथून ती लूज तेच बेथेल येथे पोहचते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस जो डोंगर त्याकडे अटारोथ-अद्दार येथे निघते
|
14. तेथून मग पश्चिम सीमा वळसा घेऊन बाजूस बेथ-होरोनाच्या समोरून त्याच्या दक्षिणेस जो डोंगर तेथून यहूदाचे नगर आणि किर्याथ-बाल तोच किर्याथ-यारीम येथे निघते. याची पश्चिम सीमा हीच.
|
15. दक्षिणेकडील सीमा पश्चिमेला सुरू होऊन बाजू किर्याथ-यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नेफ्तोहा झऱ्याकडे जाते.
|
16. मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीसमोरला डोंगर, जो रेफाईमाच्या तळवटीच्या उत्तरेला, त्याच्या काठी उतरली, आणि यबूसी यांच्या दक्षिण भागी हिन्नोम खिंडीत उतरून खाली एन-रोगेलास गेली.
|
17. मग उत्तरेकडे वळून एन-शेमेशाकडे गेली, आणि अदुम्मीम येथील चढणीच्या समोरल्या गलीलोथाकडे गेली; मग रऊबेनाचा मुलगा बोहन याच्या खडकाकडे जाते.
|
19. मग ती सीमा बेथ-होग्लाच्या उत्तर दिशेस जाऊन गेली, आणि सीमेचा शेवट क्षारसमुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेकडे यार्देनेच्या मुखापाशी झाला; ही दक्षिण सीमा झाली.
|
20. आणि पूर्वबाजूला त्याची सीमा यार्देन नदी झाली; बन्यामिनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळाप्रमाणे, त्यांच्या चहुकडल्या सीमांप्रमाणे, हे होते.
|
21. आणि बन्यामीन वंशाला त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही नगरे मिळाली; यरीहो व बेथ-होग्ला व एमेक-केसीस
|
28. सेला, एलेफ व यबूसी म्हणजेच यरूशलेम, गिबाथ, किर्याथ; अशी चवदा नगरे, आणि त्यांची गावे; बन्यामिनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे आहे. PE
|