1. {#1लेवी लोकांची नगरे [BR]1 इति. 6:54-81 } [PS]तेव्हा लेवी वंशातील वडिलांच्या घराण्याचे मुख्य एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएली वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे मुख्य त्यांच्याजवळ आले.
2. ते कनान देशातील शिलो येथे म्हणाले की, परमेश्वराने मोशेच्या द्वारे अशी आज्ञा दिली होती की “आम्हांला राहण्यासाठी नगरे आणि आमच्या पशूंसाठी त्यांची गायराने द्यावी.”
3. यास्तव इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपल्या वतनांतून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली.
4. तेव्हा कहाथीच्या कुळांसाठी चिठ्ठी निघाली तेव्हा लेव्यांतल्या अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा व शिमोनी, बन्यामीन या वंशांच्या वाट्यातून तेरा नगरे मिळाली.
5. कहाथीच्या राहिलेल्या वंशजांना एफ्राइमाच्या वंशांतल्या कुळाच्या वाट्यातून व दानाच्या वंशांच्या वाट्यातून व मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यातून दहा नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली.
6. आणि गेर्षोनाच्या वंशजांना इस्साखार वंशातील कुळांच्या व आशेर, नफताली, बाशानात मनश्शेच्या अर्ध्या वंशांच्या नगरांपैकी तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून मिळाली.
7. मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, व गाद व जबुलून याच्या वंशांतून बारा नगरे मिळाली.
8. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी चिठ्ठ्या टाकून ही नगरे आणि त्यांची गायराने लेव्यांना दिली.
9. त्यांनी यहूदा व शिमोन यांच्या वंशाच्या विभागातली नगरे दिली, त्यांची नावे सांगितलेली आहेत,
10. लेवी वंशातील कहाथीच्या कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी ही नगरे होती, कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली.
11. त्यांना त्यांनी यहूदाच्या डोंगराळ प्रदेशातले अनाक्याचा पिता याचे नगर किर्याथ-आर्बा म्हणजेच हेब्रोन आणि त्याची चहुकडली गायराने त्यांना दिली.
12. परंतु नगराची शेतभूमी व त्याकडली खेडी यफुन्नेचा पुत्र. कालेब याला वतन करून दिली होती.
13. त्यांनी अहरोन याजकाच्या वंशजाला हत्या करणाऱ्यासाठी आश्रयाचे म्हणून हेब्रोन नगर व त्याचे गायरान दिले, आणि लिब्ना व त्याचे गायरान;
14. आणि यत्तीर व त्याचे गायरान, आणि एष्टमोवा व त्याचे गायरान;
15. होलोन व त्याचे गायरान आणि दबीर व त्याचे गायरान;
16. अईन व त्याचे गायरान, आणि युट्टा व त्याचे गायरान, बेथ-शेमेश व त्याचे गायरान; अशी त्या दोन वंशांतली नऊ नगरे दिली;
17. बन्यामीन वंशातले गिबोन व त्याचे गायरान; गिबा व त्याचे गायरान;
18. अनाथोथ व त्याचे गायरान, आणि अलमोन व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली.
19. अहरोन वंशातील याजकांना त्यांची तेरा नगरे व त्यांची गायराने मिळाली.
20. राहिलेल्या कहाथी वंशातील लेव्यांना एफ्राइम वंशाच्या विभागापैकी चिठ्ठी टाकून नगरे दिली.
21. त्यांनी हत्या करणाऱ्याच्या आश्रयासाठी एफ्राइमाच्या डोंगरावरचे नगर शखेम व त्याचे गायराने त्यांना दिले; आणि गेजेर व त्याचे गायरान;
22. किबसाईम व त्याचे गायरान; आणि बेथ-होरोन तिचे गायरान अशी एकंदर चार नगरे दिली;
23. दानाच्या वंशातून एलतके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान;
24. अयालोन व त्याचे गायरान, गथ-रिम्मोन व त्यांचे गायरान अशी चार नगरे दिली;
25. मनश्शेच्या अर्ध्या वंशांतले तानख व गथ-रिम्मोन त्यांची गायराने, अशी दोन नगरे दिली;
26. बाकी राहिलेल्या कहाथाच्या वंशजांना एकंदर दहा नगरे व त्यांची गायराने दिली.
27. लेवी वंशातील गेर्षोनाच्या कुळाला मनश्शेच्या दुस-या अर्ध्या वंशांतून हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर बाशानातले गोलान व त्यांचे गायरान, आणि बैश्तरा व त्यांचे गायरान अशी दोन नगरे दिली;
28. इस्साखार वंशातले किश्शोन व त्याचे गायरान, दाबरथ व त्याचे गायरान;
29. यर्मूथ व त्याचे गायरान, एन-गन्नीम व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली;
30. आणि आशेराच्या वंशातली मिशाल व त्यांचे गायरान, अब्दोन व त्यांचे गायरान,
31. हेलकथ व त्यांचे गायरान, आणि रहोब व त्यांचे गायरान, अशी चार नगरे दिली;
32. नफतालीच्या वंशातले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गालीलातले केदेश व त्यांचे गायरान, आणि हम्मोथ-दोर व त्यांचे गायरान, आणि कार्तान व त्यांचे गायरान, अशी तीन नगरे दिली.
33. गेर्षोन्याची सर्व नगरे त्याच्या कुळांप्रमाणे तेरा नगरे व त्यांची गायराने,
34. आणि राहिलेले लेवी मरारी वंशजाच्या कुळाला जबुलूनाच्या वंशातले यकनाम व त्याचे गायरान, कर्ता व त्याचे गायरान;
35. दिम्रा व त्याचे गायरान, नहलाल व त्याचे गायरान, अशी चार नगरे दिली;
36. आणि रऊबेन वंशातले बेजेर व त्यांचे गायरान, आणि याहस व त्यांचे गायरान;
37. कदेमोथ व त्यांचे गायरान, आणि मेफाथ व त्यांचे गायरान, अशी चार नगरे दिली;
38. आणि गादाच्या वंशांतले हत्या करणाऱ्याच्या आश्रयाचे नगर गिलादातले रामोथ व त्यांचे गायरान, महनाईम व त्यांचे गायरान
39. हेशबोन व त्याचे गायरान, याजेर व त्यांचे गायरान, अशी एकंदर चार नगरे दिली.
40. लेव्यांच्या कुळातली राहिलेल्या मरारीच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे एकंदर बारा नगरे चिठ्ठ्या टाकून त्यांना दिली.
41. इस्राएल लोकांच्या वतनातून लेव्यांना एकंदर अठ्ठेचाळीस नगरे, त्यांच्या गायरानासह दिली.
42. ती नगरे अशी होती की त्या प्रत्येक नगरास त्याच्या सभोवार गायराने होती, असे त्या सर्व नगरांना होते. [PE]
43. {#1इस्त्राएल लोक देशाचा ताबा घेतात } [PS]याप्रमाणे परमेश्वराने इस्राएलाला जो देश त्यांच्या पूर्वजांना देण्याची शपथ वाहिली होती तो अवघा दिला; आणि ते तो वतन करून घेऊन त्यामध्ये राहिले.
44. याप्रकारे परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांजवळ जशी शपथ वाहिली होती, तसा त्याप्रमाणेच त्यास चहूंकडून विसावा दिला, त्याच्या सर्व शत्रूंतला कोणी त्यांच्यापुढे टिकला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.
45. परमेश्वराने इस्राएलाच्या घराण्याला दिलेल्या प्रत्येक उत्तम अभिवचनापैकी एकही पूर्ण झाल्यावाचून राहिले नाही. त्याने दिलेले प्रत्येक अभिवचन घडून आले. [PE]