1. {बंदिवान सीयोनेचा शोक} [PS] यरूशलेम नगरी जी लोकांनी भरलेली असे, आता ती पूर्णपणे एकटी बसली आहे. [QBR] जी राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होती पण ती विधवा झाली आहे. [QBR] राष्ट्रांमध्ये जी राजकुमारी होती, पण आता तिला दासी केले गेले आहे. [QBR]
2. ती रात्री फार रडते व तिचे अश्रू तिच्या गालांवर असतात. [QBR] तिच्या सर्व प्रियकरांमध्ये तिला दिलासा देणारा कोणी नव्हता. [QBR] तिच्या सर्व मित्रांनी तिच्याशी विश्वासघात केला. ते तिचे शत्रू झाले आहेत. [QBR]
3. दारिद्र्य आणि जुलमामुळे यहूदा दास्यपनात बंदिवान झाली आहे. [QBR] ती राष्ट्रंमध्ये राहत आहे, पण तिला आराम मिळत नाही. [QBR] तिचा पाठलाग करणाऱ्या सर्वांनी तिला तिच्या अत्यंत निराशेच्या मनस्थितीत तिला संकटावस्थेत गाठले आहे. [QBR]
4. सियोनेचे मार्ग शोक करतात, कारण नेमलेल्या पवित्र सणाला कोणीही येत नाही. [QBR] तिच्या सर्व वेशी ओसाड झाल्या आहेत व तिचे याजक कण्हत आहेत. [QBR] तिच्या कुमारी दु:खात आहेत, व ती स्वत: निराशेत आहेत. [QBR]
5. तिचे शत्रू तिचे धनी झाले आहेत; तिच्या वैऱ्यांची उन्नती झाली आहे. [QBR] परमेश्वराने तिच्या पुष्कळ अपराधामुळे तिला दु:ख दिले आहे. [QBR] तिची मुले वैऱ्यांच्यापुढे पाडावपणांत गेली आहेत. [QBR]
6. सियोनकन्येचे सौंदर्य सरले आहे. [QBR] तिचे राजपुत्र चरण्यासाठी कुरण नसणाऱ्या हरीणासारखे ते झाले आहेत, [QBR] आणि पाठलाग करणाऱ्यांसमोर ते हतबल झाले आहेत. [QBR]
7. यरूशलेम आपल्या कष्टाच्या व बेघर होण्याच्या दिवसात, [QBR] पूर्वी तिच्याजवळ असलेल्या मौल्यवान गोष्टीं आठवते. [QBR] तिच्या लोकांस वैऱ्यांनी पकडले आणि तिला मदत करणारे कोणीही नव्हते. [QBR] तिच्या शत्रूंनी तिला पाहिले व तिच्या ओसाडपणात तिच्यावर हसले. [QBR]
8. यरूशलेमेने फार पाप केले आहेत; म्हणून ती अशुद्ध झाली आहे. [QBR] सर्व जे तिचा आदर करत असत, त्यांनी तिला आता तुच्छ मानले आहे. कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; [QBR] ती कण्हत आहे व ती तोंड फिरविते आहे. [QBR]
9. तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्राला लागला आहे, तिने आपल्या भविष्यातील शिक्षेचा नीट विचार केला नाही. [QBR] ती खूपच अधोगतीस गेली आहे. तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. [QBR] “हे परमेश्वरा, माझे दु:ख पाहा! कारण शत्रू त्याच्या मोठेपणाचा तोरा मिरवितो आहे ते पाहा.” [QBR]
10. तिच्या सर्व मौल्यवान खजिन्यावर शत्रूंनी आपला हात ठेवला आहे. [QBR] परकीय राष्ट्रांनी तुझ्या सभास्थानात येऊ नये अशी तू आज्ञा केली होतीस तरीही, [QBR] तिने त्यांना तिच्या पवित्रस्थानात जाताना पाहिले आहे. [QBR]
11. यरूशलेमेमधील सर्व लोक कण्हत आहेत, ते अन्न शोधत आहेत. [QBR] त्यांनी आपला जीव वाचावा म्हणून अन्नासाठी त्यांच्या जवळच्या मनोरम वस्तू दिल्या आहेत. [QBR] “परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! मी कशी कवडीमोलाची झाली आहे.” [QBR]
12. “जे तुम्ही जवळून जाता, तुम्हास काहीच वाटत नाही काय? [QBR] पण जरा माझ्याकडे निरखून पाहा. [QBR] परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु:ख दिले, [QBR] या माझ्या दु:खा सारखे दुसरे कोणतेही दु:ख आहे काय, हे लक्ष देऊन पाहा. [QBR]
13. त्याने वरून माझ्या हाडात अग्नी पाठवला आहे, आणि तो त्याजवर प्रबल होतो. [QBR] त्याने माझ्या पायांसाठी जाळे पसरवीले आहे आणि मला मागे वळवले आहे. [QBR] त्याने मला सतत ओसाड व दुर्बल केले आहे. [QBR]
14. माझ्या पुष्कळ अपराधांचे जू त्याने आपल्या हाताने जखडले आहे. [QBR] ते एकत्र गुंफले आहेत, आणि ते माझ्या मानेवर आले आहेत; त्यांनी माझी शक्ती निकामी केली आहे. [QBR] ज्यांच्या समोर मी उभी राहू शकणार नाही, अशांच्या हाती परमेश्वराने मला दिले आहे. [QBR]
15. माझ्या शूर सैनिकांना जे माझे रक्षण करतात, त्यांना परमेश्वराने दूर फेकले आहे. [QBR] त्याने माझ्या तरुण सैनिकांना चिरडण्यासाठी भारी सभा बोलावली आहे. [QBR] जसे द्राक्षकुंडात द्राक्षे तुडविली जातात तसे प्रभूने यहूदाच्या कुमारी कन्येला तुडवले आहे. [QBR]
16. या सगळयाबद्दल मी आक्रोश करते; माझ्या डोळयांतून अश्रू पाण्याप्रमाणे वाहात आहेत. [QBR] कारण माझे सांत्वन करणारा माझ्यापासून दूर आहे. [QBR] माझी मुले खिन्न झाली आहेत, कारण शत्रूचा विजय झाला आहे.” [QBR]
17. सियोनने तिचे हात पसरवले, पण तिचे सांत्वन करायला कोणी नाही. [QBR] परमेश्वराने याकोबाच्या शत्रूंना हुकूम केला आहे. परमेश्वराने याकोबासंबधाने आज्ञा केल्यावरून त्याच्या वैऱ्यांनी त्यास घेरले. [QBR] यरूशलेम त्यांच्याकरिता एका फाटलेल्या मासिकपाळीच्या अशुद्ध कपड्याप्रमाणे आहे [QBR]
18. “परमेश्वर न्यायीच आहे, कारण मी त्याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले आहे. [QBR] सर्व लोकांनो, ऐका! आणि माझे दु:ख पाहा! माझ्या कुमारी व माझे तरुण पाडावपणांत गेले आहेत. [QBR]
19. मी माझ्या प्रियकरांना हाका मारल्या, पण त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला. [QBR] माझे याजक आणि वडील आपला जीव वाचावा म्हणून, [QBR] स्वत:साठी अन्न शोधीत असता नगरात प्राण सोडले. [QBR]
20. हे परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! कारण मी दु:खी झाले आहे. माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे. [QBR] माझे मन माझ्यामध्ये उलटले आहे, कारण मी फार बंडखोर झाले होते. [QBR] बाहेर तलवार निर्वंश करते, तर घरांत मृत्यू आहे. [QBR]
21. मी कण्हत आहे हे त्यांनी ऐकले आहे. माझे सांत्वन करायला कोणी नाही. [QBR] माझ्या सर्व शत्रूंनी माझे अनिष्ट ऐकले आहे. तू असे केल्यामुळे त्यांना आनंद झाला आहे. [QBR] जो दिवस तू नेमला आहे तो तू आणशील तेव्हा ते माझ्यासारखे होतील. [QBR]
22. त्यांची सर्व दुष्टाई तुझ्यासमोर येवो, [QBR] माझ्या पापांमुळे तू माझ्याशी जसा वागलास तसाच तू त्यांच्याशी वाग. [QBR] कारण माझे कण्हणे पुष्कळ आहे आणि माझे हृदय दुर्बल झाले आहे.” [PE]