1. {सीयोनेचा शोक परमेश्वराकडून} [PS] परमेश्वराने सियोनकन्येला आपल्या क्रोधमय काळोख्या मेघाने कसे अच्छादीले आहे. [QBR] इस्राएलाचे सौंदर्य त्याने स्वर्गातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे. [QBR] त्याने आपल्या क्रोधासमयी न्यायासनाचे स्मरण केले नाही [QBR]
2. परमेश्वराने याकोबाची सर्व नगरे गिळंकृत केली आहेत. [QBR] त्यांच्यावर कसलीही दया केली नाही. [QBR] त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्ये दुर्गस्थानांना खाली ढकलून; त्याने ते धुळीला मिळविले आहेत. [QBR] त्याने तिचे राज्य व त्यातले सरदारास अप्रतिष्ठीत व कलंकित ठरविले आहे. [QBR]
3. त्याने आपल्या संतप्त क्रोधाने इस्राएलाचे सर्व बळ नष्ट केले आहे. [QBR] त्याने आपला उजवा हात शत्रूंपासून मागे घेतला आहे. [QBR] सर्वत्र पेट घेणाऱ्या अग्नीप्रमाणे त्याने याकोबाला जाळून टाकले आहे. [QBR]
4. त्याने शत्रूंप्रमाणे आमच्या दिशेने आपला धनुष्य वाकविला आहे. [QBR] त्याने युद्धासमान संघर्षाचा पवित्र घेऊन शत्रूप्रमाणे आम्हावर बाण चालविण्यास आपल्या हाताने नेम धरिला आहे. [QBR] त्याच्या दृष्टीस बहूमूल्य लोकांची त्याने हत्या केली. [QBR] सियोनकन्येच्या तंबूवर त्याने आपला क्रोध अग्नीसारखा ओतला आहे. [QBR]
5. परमेश्वर शत्रूसारखा झाला. त्याने इस्राएलांस गिळले. [QBR] त्याने तिच्या बलस्थानाचा नाश केला आहे. [QBR] त्याने यहूदाच्या कन्येमध्ये शोक व विलाप वाढवला आहे. [QBR]
6. एखाद्या बागेप्रमाणे त्याने निवासमंडपावर हल्ला केला आहे. [QBR] त्याने पवित्र सभास्थान उध्वस्त केले. [QBR] सियोनेत पवित्रसण व शब्बाथ याचा विसर परमेश्वराने घडवून आणिला आहे कारण त्याने आपला क्रोध राजे [QBR] आणि याजका यांवर प्रकट करून त्यांना तुच्छ लेखिले आहे [QBR]
7. परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे; त्याने आपल्या पवित्रस्थानाचा वीट मानला आहे. [QBR] त्याने तिच्या राजवाड्याच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत. [QBR] परमेश्वराच्या मंदिरात शत्रूने जयघोष केला. [QBR] सणाचा दिवस असल्याप्रमाणे त्यांनी गोंगाट केला. [QBR]
8. सियोनकन्येचा तट नाहीसा करण्याचे परमेश्वराने ठरविले आहे. [QBR] त्याने त्यावर दोरी ताणली आहे, आणि आपला हात संहार करण्यापासून आवरिला नाही. [QBR] म्हणून त्याने तट व कोट ह्यास शोक करायला लाविला आहे. [QBR] ते सर्वच व्याकूळ झाले आहेत. [QBR]
9. यरूशलेमेच्या वेशींची दरवाजे जमिनित खचल्या आहेत. त्याने वेशींचे अडसर तोडून नष्ट केले. [QBR] तिचे राजे आणि सरदार हे मोशेचा नियमशास्त्र नसलेल्या परराष्ट्राप्रमाणे आहेत. [QBR] तिच्या संदेष्टयांना परमेश्वराकडून दृष्टांत ही प्राप्त होत नाहीत [QBR]
10. सियोनेची वडीलधारी मंडळी भूमीवर बसून निमुटपणे आक्रंदन करीत आहे. [QBR] त्यांनी आपल्या डोक्यात धूळ उडवली आहे. त्यांनी गोणताटाचे कपडे नेसले आहेत. [QBR] यरूशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववित आहे. [QBR]
11. माझे डोळे आसवांनी जर्जर झाले आहेत. [QBR] माझ्या आतड्यांना पीळ पडत आहे. [QBR] माझे हृदय जमिनीवर टाकल्याप्रमाणे तळमळत आहे. कारण माझ्या लोकांचा नाश झाला आहे. [QBR] मुले आणि तान्ही चौकांत मूर्छित पडत आहेत. [QBR]
12. ती मुले त्यांच्या मातांना म्हणतात, “धान्य आणि द्राक्षरस कोठे आहेत” [QBR] घायाळ झालेल्यांप्रमाणे नगराच्या आळ्यात मूर्च्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडला. [QBR]
13. यरूशलेमकन्ये, मी तुझ्या संबधी काय बोलू? मी तुझे सांत्वन करावे म्हणून तुझी तुलना कोणाबरोबर करू, [QBR] सीयोनेच्या कुमारी कन्ये? तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे. तुला कोण बरे करू शकेल?
14. तुझ्या संदेष्ट्यांनी पाहिलेले दृष्टांत तुझ्यासाठी कपटी व मुर्खपणाचे होते. [QBR] त्यांनी तुझे अपराध तुझे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रकट केले नाही, [QBR] तर तूझ्यासाठी फसवे दैवी संकेत आणि पाशाचे दृष्टांत निर्माण केले. [QBR]
15. रस्त्याच्या बाजूने जाणारे सुध्दा तुझ्याकडे पाहून टाळ्या वाजवतात. [QBR] यरूशलेमेच्या कन्येकडे पाहून ते शिळ घालतात आणि आपल्या मस्तकाने इशारा करून म्हणतात, [QBR] “हिच ती नगरी आहे का जिला ‘सौंदर्यपूर्ण’ किंवा ‘आखिल पृथ्वीस आनंदमय करणारी नगरी’ असे म्हणत?” [QBR]
16. तुझे सर्व शत्रू तुझ्याविरुध्द मोठे तोंड वासून तुझी थट्टा करतात. [QBR] ते शिळ घालून दात-ओठ खातात व म्हणतात, “आम्ही तिचे प्राशन केले आहे. [QBR] खात्रीने आम्ही याच दिवसाची वाट पाहत होतो. [QBR] आम्ही तो दिवस शोधला! आणि तो पहिला आहे!” [QBR]
17. परमेश्वराने सिद्ध केल्याप्रमाणे सर्व केले आहे. त्याने फार पूर्वी जाहीर केलेले आपले अभिवचन पूर्ण केले आहे. [QBR] त्याने चिरडून टाकले आणि त्यांच्यावर त्याने दया दाखविली नाही. [QBR] त्याने तुझ्या शत्रूंना प्रबळ केले आहे. [QBR]
18. “त्यांचे हृदय परमेश्वराचा धावा करत आहे. [QBR] हे सियोनकन्येच्या तटा, तुझे अश्रू नदीच्या प्रवाहाप्रमाणे रात्रंदिवस वाहत राहो. [QBR] त्यास अटकाव करू नको. तुझ्या डोळ्यातील बाहुलीस विसावा देऊ नको. [QBR]
19. रात्रीच उठून मोठ्याने आक्रोश कर. [QBR] परमेश्वराच्या मुखापुढे आपले मन पाण्यासारखे ओता. [QBR] जी तुझी मुले उपासमारीने नगराच्या रस्त्या-रस्त्यावर बेशूध्द होत आहेत, त्यांच्या जीवा करता तू आपले हात वर कर. [QBR]
20. परमेश्वरा, पाहा, जिच्याशी तू कठोरपणाने असे केले, तिच्या कडे लक्ष लाव. [QBR] स्त्रियांनी आपल्या पोटच्या फळास, आपल्या मुलांना त्यांच्या बालपणातच, खावे काय? [QBR] परमेश्वराच्या मंदिरात याजक व संदेष्टे मारले जावेत काय? [QBR]
21. तरुण आणि वृध्द असे दोघेही रस्त्यात भूमीवर कसे पडले आहेत. [QBR] माझे तरुण व तरुणी तलवारीने पडले आहेत; [QBR] तू आपल्या क्रोधाच्या दिवशी त्यांच्यावर कसलिही दया केली नाही तर त्यांना निर्दयपणे मारलेस. [QBR]
22. पवित्र सभेच्या दिवसातील दहशतीप्रमाणे चोहोबाजूने तू माझ्याविषयी भय निर्माण केले आहेस. [QBR] परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी कोणीही सुटला नाही, व वाचला नाही. [QBR] मी ज्यांचे लालनपालन केले व वाढवले, त्यांना माझ्या शत्रूने नष्ट केले.” [PE]