मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
लेवीय
1. {#1होमार्पणे } [PS]परमेश्वराने दर्शनमंडपातून मोशेला हाक मारली आणि त्यास म्हटले,
2. इस्राएली लोकांस असे सांग की, जेव्हा तुम्ही परमेश्वरास पशूबली अर्पण करता तेव्हा त्यांनी तो गुराढोरांपैकी किंवा शेरडामेढरांपैकी अर्पावा. [PE]
3. [PS]जेव्हा एखाद्या मनुष्यास गुरांढोरातले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वरासमोर तो मान्य होईल.
4. त्या मनुष्याने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून मान्य होईल. [PE]
5. [PS]त्यानंतर त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा. दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर अर्पण करून अहरोनाचे पुत्र, जे याजक, त्यांनी त्याचे रक्त सादर करावे आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोरील वेदीवर सभोवती शिंपडावे.
6. याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व त्याचे तुकडे करावे. [PE]
7. [PS]नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी;
8. अहरोनाचे मुले जे याजक होते, त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्याचे तुकडे, डोके, व चरबी रचावी;
9. त्याचे पाय व आतडी ही पाण्याने धुवावी, मग याजकाने त्या सर्वांचा वेदीवर होम करून तो अर्पावा, हे होमार्पण आहे; हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय. [PE]
10. [PS]जर कोणाला शेरडाचे किंवा मेंढराचे होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा.
11. त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोवती शिंपाडावे. [PE]
12. [PS]मग याजकाने त्या पशूचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके, व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी,
13. त्याचे पाय व आतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. [PE]
14. [PS]जर कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असेल तेव्हा त्याने त्याचे अर्पण होले किंवा पारव्याची पिल्ले अर्पावी.
15. याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे. [PE]
16. [PS]त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी.
17. त्याने तो पक्षी पंखाच्या मधोमध फाडावा, परंतू त्याचे दोन वेगळे भाग करू नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. हे परमेश्वरासाठी केलेले सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय. [PE]
Total 27 अध्याय, Selected धडा 1 / 27
होमार्पणे 1 परमेश्वराने दर्शनमंडपातून मोशेला हाक मारली आणि त्यास म्हटले, 2 इस्राएली लोकांस असे सांग की, जेव्हा तुम्ही परमेश्वरास पशूबली अर्पण करता तेव्हा त्यांनी तो गुराढोरांपैकी किंवा शेरडामेढरांपैकी अर्पावा. 3 जेव्हा एखाद्या मनुष्यास गुरांढोरातले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वरासमोर तो मान्य होईल. 4 त्या मनुष्याने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून मान्य होईल. 5 त्यानंतर त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा. दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर अर्पण करून अहरोनाचे पुत्र, जे याजक, त्यांनी त्याचे रक्त सादर करावे आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोरील वेदीवर सभोवती शिंपडावे. 6 याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व त्याचे तुकडे करावे. 7 नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी; 8 अहरोनाचे मुले जे याजक होते, त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्याचे तुकडे, डोके, व चरबी रचावी; 9 त्याचे पाय व आतडी ही पाण्याने धुवावी, मग याजकाने त्या सर्वांचा वेदीवर होम करून तो अर्पावा, हे होमार्पण आहे; हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय. 10 जर कोणाला शेरडाचे किंवा मेंढराचे होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. 11 त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोवती शिंपाडावे. 12 मग याजकाने त्या पशूचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके, व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी, 13 त्याचे पाय व आतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. 14 जर कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असेल तेव्हा त्याने त्याचे अर्पण होले किंवा पारव्याची पिल्ले अर्पावी. 15 याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे. 16 त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी. 17 त्याने तो पक्षी पंखाच्या मधोमध फाडावा, परंतू त्याचे दोन वेगळे भाग करू नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. हे परमेश्वरासाठी केलेले सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.
Total 27 अध्याय, Selected धडा 1 / 27
×

Alert

×

Marathi Letters Keypad References