1. {प्रायश्चित्ताचा दिवस} PS अहरोनाचे दोन पुत्र परमेश्वरासमोर गेले असताना मरण पावले त्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला.
|
2. परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याच्याशी बोल व त्यास सांग की: त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल, कारण तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो. PEPS
|
4. त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कंबर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत.
|
6. अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोऱ्हा अर्पण करून स्वत:साठी व आपल्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे.
|
8. अहरोनाने त्या दोन बकऱ्यावर चिठ्ठ्या टाकाव्या; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेणाऱ्या बकऱ्यासाठी
|
10. पाप वाहून नेण्यासाठी अशी चिठ्ठी निघालेला बकरा परमेश्वरासमोर जिवंत उभा करावा व त्याच्याद्वारे प्रायश्चित व्हावे म्हणून पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा. PEPS
|
11. अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे अर्पण करून स्वत:साठी व स्वत:च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याने स्वत:साठी गोऱ्हा पापार्पण म्हणून वधावा. PEPS
|
12. नंतर अहरोनाने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा.
|
13. त्याने तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर, असा घालावा की त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासन व्यापून टाकावे, म्हणजे तो मरणार नाही.
|
14. त्याचप्रमाणे त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनावर पूर्वेस बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे. PEPS
|
15. मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि त्याने गोऱ्ह्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.
|
16. आणखी त्याने इस्राएली लोकांची अशुद्धतेची कामे, त्यांची बंडखोरी व त्यांची सर्व पापे या सर्वांबद्दल परमपवित्रस्थानासाठी प्रायश्चित करावे; परमेश्वर त्यांच्यामध्ये जेथे वस्ती करतो त्या, लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने तसेच करावे. PEPS
|
17. अहरोन प्रायश्चित करण्यासाठी परमपवित्रस्थानात प्रवेशकरण्यासाठी जाईल तेव्हा, तो स्वतःसाठी व स्वत:च्या घराण्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्चित करून बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपामध्ये कोणीही नसावे व कोणीही तेथे जाऊ नये.
|
18. मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.
|
19. मग त्याने काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते सात वेळा तिच्यावर शिंपडावे; अशा प्रकारे त्याने इस्राएली लोकांच्या अशुद्धतेपासून ती शुद्ध व पवित्र करावी. PEPS
|
20. जेव्हा परमपवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्याकरता तो प्रायश्चित करणे संपवतो त्यानंतर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा.
|
21. अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएली लोकांची सर्व पापे व अपराध ह्यांचा अंगिकार करावा; व ती त्या बकऱ्याच्या डोक्यावर ठेवून त्यास घेऊन जाण्यासाठी तयार असलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे.
|
22. तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे. PEPS
|
23. मग अहरोनाने पुन्हा दर्शनमंडपामध्ये जावे आणि परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे काढावी आणि त्याने ती तेथेच ठेवावीत.
|
24. मग त्याने एखाद्या पवित्र ठिकाणी पाण्याने आंघोळ करावी, आपली वस्त्रे घालावी व तेथून बाहेर येऊन स्वत:साठी होमार्पण करावे तसेच लोकांसाठीही होमार्पण करावे आणि स्वत:साठी व लोकांसाठी प्रायश्चित करावे. PEPS
|
26. ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर तो छावणीत प्रवेश करु शकतो. PEPS
|
27. पापार्पणाच्या ज्या गोऱ्ह्याचे व बकऱ्याचे रक्त प्रायश्चितासाठी पवित्रस्थानात नेले होते त्या दोन्ही पशूंना छावणीच्या बाहेर न्यावे. तेथे त्यांचे कातडे, मांस व शेण ही अग्नीत जाळून टाकावीत.
|
28. ज्या मनुष्याने ती जाळून टाकली त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी; त्यानंतर तो छावणीत येऊ शकतो. PEPS
|
29. तुमच्यासाठी हा एक कायमचा विधी असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता उपास करावा आणि त्या दिवशी कोणीही कोणतेही काम करू नये, मग तो तुमच्यात जन्मलेल्यांपैकी असो किंवा तुमच्यात राहणारा परदेशी असो;
|
30. हे यासाठी की या दिवशी तुमच्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हावे म्हणून प्रायश्चित करण्यात येईल, जेणेकरून तुम्ही परमेश्वरासमोर शुद्ध व्हाल.
|
31. तुमच्यासाठी हा पूर्ण विश्रामाचा शब्बाथ आहे; तुम्ही उपवास करावा व कसलेही काम करु नये; हा तुमच्यामध्ये कायमचा विधी असणार आहे. PEPS
|
32. तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे.
|
33. त्याने परमपवित्रस्थान, दर्शनमंडप व वेदी तसेच याजकवर्ग आणि सर्व इस्राएल लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित करावे.” PEPS
|
34. इस्राएल लोकांसाठी त्यांच्या सर्व पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता हा कायमचा विधी होय; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले. PE
|