1. {येशूची काही वचने} PS मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “ज्यामुळे लोक पाप करतील त्या येतीलच पण ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार!
|
2. त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात टाकावे यामध्ये त्याचे हित आहे.
|
3. स्वतःकडे लक्ष द्या! जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्यास धमकावा आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्यास माफ करा.
|
4. जर तो दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप करतो आणि सात वेळा तुझ्याकडे येतो व म्हणतो, मी पश्चात्ताप करतो, तरीही तू त्यास माफ कर.” PEPS
|
6. प्रभू येशू म्हणाला, “जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता, मुळासकट उपटून समुद्रात लावली जा. तर ते झाड तुमचे ऐकेल. PEPS
|
7. तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्यास म्हणेल, ‘आत्ताच येऊन जेवायला बस.’
|
8. उलट माझे जेवण तयार कर, ‘माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी,’ असे तो त्यास म्हणणार नाही काय?
|
10. तुमच्या बाबतीतही तसेच आहे. जेव्हा तुम्हास करण्यास सांगितलेली सर्व कामे केल्यावर तुम्ही असे म्हणले पाहिजे, आम्ही कोणत्याही मानास लायक नसलेले नोकर आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे.” PS
|
11. {दहा कुष्ठरोगी} PS मग असे झाले की, तो यरूशलेम शहराकडे चालला असता, शोमरोन व गालील प्रांताच्या सीमा यांमधून गेला.
|
13. आणि ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले “येशू, स्वामी, आमच्यावर दया करा,” असे बोलून त्यांनी त्याच्याकडे आरोळी केली.
|
14. जेव्हा येशूने कुष्ठरोग्यांना * कुष्ठरोग्याला याजकांद्वारे निरीक्षण करून घेतल्यावर समाजात घेतले जात असत पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जा आणि स्वतःला याजकांना दाखवा.” ते याजकाकडे जात असतांनाच शुद्ध झाले,
|
15. जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला.
|
16. तो येशूच्या पायाजवळ खाली पडला व त्याने त्यास नमन केले. तसेच त्याने त्याचे उपकार मानले. तो एक शोमरोनी होता.
|
19. तो त्यास म्हणाला, “ऊठ आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” उत्प. 6:5-8, 22; 19:12-14 PEPS
|
20. {देवाच्या राज्याचे आगमन} PS परूश्यांनी येशूला विचारले, देवाचे राज्य केव्हा येईल, येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरुपात येत नाही.
|
21. पाहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे! असे म्हणणार नाहीत कारण देवाचे राज्य तर तुमच्यामध्ये आहे.” PEPS
|
22. शिष्यांना तो म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसापैकी एका दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहाल. पण तो दिवस तुम्ही पाहू शकणार नाही, असे दिवस येतील.
|
23. आणि लोक तुम्हास म्हणतील, पाहा, तो तर येथे आहे किंवा पाहा, तो तेथे आहे, तेव्हा तुम्ही मला पाहाण्यासाठी त्यांच्यामागे जाऊ नका.
|
24. कारण जशी वीज आकाशाच्या एका सिमेपासुन दुसऱ्या सिमेपर्यंत चमकते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे त्याच्या दिवसात होईल.
|
27. नोहाने तारवात प्रवेश केला आणि मग महापूर आला व त्या सर्वांचा नाश झाला त्या दिवसापर्यंत ते खात होते, पीत होते, लग्न करून घेत होते आणि लग्न करुनही देत होते.
|
28. त्याचप्रमाणे, लोटाच्या दिवसात झाले तसे होईलः ते खात होते, पीत होते. विकत घेत होते. विकत देत होते. लागवड करीत होते. बांधीत होते.
|
29. पण ज्या दिवशी लोट सदोम सोडून बाहेर निघाला त्यादिवशी आकाशातून आग व गंधक यांचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश केला.
|
31. त्यादिवशी जर एखादा छतावर असेल व त्याचे सामान घरात असेल, तर त्याने ते बाहेर काढण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये.
|
34. मी तुम्हास सांगतो, त्या रात्री बिछान्यावर दोघे असतील, त्यांच्यामधून एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल.
|