1. {चार हजारांना भोजन} PS त्या दिवसात पुन्हा लोकांचा मोठा समुदाय जमला व त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. येशूने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांना म्हणाला,
|
2. “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही.
|
3. मी जर त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते रस्त्यातच कासावीस होऊन पडतील आणि त्यांच्यातील काही तर दुरून आले आहेत.”
|
6. त्याने लोकांस जमिनीवर बसण्याची आज्ञा केली. त्याने सात भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या आणि त्यांनी त्या लोकांस वाढल्या.
|
11. {असमंजसपणाबद्दल शिष्यांचा निषेध} PS मग काही परूशी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्यास स्वर्गातून चिन्ह मागितले.
|
12. आपल्या आत्म्यात दीर्घ उसासा टाकून तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खरे सांगतो की, या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही.”
|
17. ते काय बोलत होते हे ओळखून येशू त्यास म्हणाला, “आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हास समजूनही समजत नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय?
|
19. मी पाच हजार लोकांस पाच भाकरी वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांमधून किती टोपल्या गोळा केल्या.” शिष्यांनी उत्तर दिले, “बारा.”
|
20. “आणि चार हजारांसाठी मी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळा केल्या?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात.”
|
22. {येशू बेथसैदा येथील आंधळ्याला दृष्टी देतो} PS ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्यास स्पर्श करावा अशी विनंती केली.
|
23. मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्यास गावाबाहेर नेले मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यांवर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्यास विचारले, “तुला काही दिसते काय?”
|
24. त्याने वर पाहिले आणि म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीही ती चालत आहेत.”
|
25. नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या मनुष्याच्या डोळ्यावर ठेवले. त्याने डोळे उघडले तेव्हा त्यास दृष्टी आली आणि त्यास सर्वकाही स्पष्ट दिसू लागले.
|
26. येशूने त्याला, “त्या गावात पाऊल देखील टाकू नको” असे सांगून घरी पाठवून दिले. मत्त. 16:13-20; लूक 9:18-20 PEPS
|
27. {येशू हा ख्रिस्त आहे अशी पेत्राने दिलेली कबुली} PS मग येशू व त्याचे शिष्य फिलीप्पा कैसरीया नामक प्रदेशास जाण्यास निघाले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून ओळखतात?”
|
28. त्यांनी त्यास उत्तर दिले, “काहीजण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान, तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहात असे म्हणतात.” PEPS
|
29. मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हास मी कोण आहे असे वाटते?” पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त आहेस.”
|
31. {स्वतःचे मरण व पुनरुत्थान याविषयीचे येशूचे भविष्य} PS तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी. वडील, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्यास जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे.
|
33. परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! कारण तू देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावीत नाहीस, तर मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावतोस.” मत्त. 16:24; लूक 9:23-26 PEPS
|
34. {आत्मत्यागाचे आमंत्रण} PS नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांस बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्यामागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारावे. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
|
35. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.
|
38. देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.” PE
|