1. {पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत} (मार्क 4:1-9; लूक 8:4-8) PS त्यादिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या किनार्याशी जाऊन बसला
|
2. तेव्हा लोकांचे समुदाय त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्यावर उभे राहिले.
|
3. मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला “पाहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला;
|
11. त्याने त्यास उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
|
12. कारण ज्या कोणाजवळ आहे त्यास दिले जाईल व त्यास भरपूर होईल; ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.
|
13. यास्तव मी त्याच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही.
|
14. यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की,
तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हास समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हास दिसणारच नाही; |
15. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे,
ते कानानी मंद ऐकतात आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत; यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजून नये आणि वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये. PEPS |
17. मी तुम्हास खरे सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.” PS
|
18. {पेरणाऱ्याच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण} (मार्क 4:13-20; लूक 8:11-15) PS आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या.
|
19. वाटेवर पेरलेला तो हा आहे की, कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्यास समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो;
|
21. परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो.
|
22. काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो.
|
23. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो. PS
|
24. {निदणाचा दृष्टांत} PS येशूने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. “कोणी एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे.
|
27. तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्यास म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यामध्ये निदण कोठून आले?
|
28. तो त्यांना म्हणाला हे काम कोणा शत्रूचे आहे. दासांनी त्यास म्हटले, तर आम्ही जाऊन ते काढून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय?
|
30. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.” मार्क 4:30-32; लूक 13:18, 19 PEPS
|
31. {मोहरीच्या दाण्याचा दृष्टांत} PS त्याने त्याच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणाएका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला;
|
32. तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाजीपाल्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखर त्याच्या फांद्यात वस्ती करतात.” लूक 13:20, 21 PEPS
|
33. {खमिराचा दृष्टांत} PS त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पीठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” PEPS
|
34. या सर्व गोष्टी येशूने दाखल्यानी लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्याच्याबरोबर काही बोलला नाही;
|
35. यासाठी की, संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की,
दाखले सांगायला मी आपले तोंड उघडीन; जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलून दाखवीन. PS |
36. {निदणाच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण} PS नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला; तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा.
|
41. मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्यांना जमा करील,
|
43. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको. ठेव, मोती व जाळे यांचे दृष्टांत PEPS
|
44. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे, ती कोणाएका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले. PEPS
|
47. आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्वप्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे;
|
48. ते भरलेल्या मनुष्यांनी ते किनार्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले.
|
52. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणार्या मनुष्यासारखा आहे.” PS
|
53. {नासरेथात येशूचा अव्हेर} (मार्क 6:1-6; लूक 4:16-30) PS नंतर असे झाले की, हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला.
|
54. आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भूत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य या मनुष्यास कोठून मिळते?
|
57. असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, “संदेष्ट्याला आपला देश व आपले घर यामध्ये मात्र सन्मान मिळत नाही.”
|