1. {येशूचे पुनरुत्थान} PS मग शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजडतांच पहाटेस मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया कबर पाहावयास तेथे गेल्या
|
2. त्यावेळी पाहा, तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला.
|
5. देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, कारण मी जाणतो की, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात.
|
6. पण तो इथे नाही कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पाहा.
|
7. आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, तो मरणातून उठला आहे आणि बघा, तो तुमच्यापुढे गालील प्रांतात जात आहे आणि तुम्ही त्यास तेथे पाहाल. पाहा, मी तुम्हास सांगितले आहे.”
|
8. तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरेजवळून घाईने निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या.
|
9. मग पाहा; येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो!” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्यास नमन केले.
|
10. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “भिऊ नका, जा, माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालील प्रांतात जावे. ते तिथे मला पाहतील.” PEPS
|
11. त्या स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायांतील काहीजण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले.
|
12. नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले आणि त्यांनी एक कट रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले.
|
13. ते म्हणाले, “लोकांस असे सांगा की, आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरुन नेले.
|
15. मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले आणि ही गोष्ट यहूदी लोकात आजवर बोलण्यात येते. मार्क 16:14-18; लूक 24:36-49; योहा. 20:19-23; प्रेषि. 1:6-8 PEPS
|
16. {येशूचे गालील प्रांतात प्रेषितांस दर्शन} PS पण अकरा शिष्य गालील प्रांतात येशूने त्यांना सांगितलेल्या डोंगरावर निघून गेले.
|
18. तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे.
|
19. म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
|
20. आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.” PE
|