1. {अरण्यात येशूची परिक्षा} PS मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांस अरण्यात नेले.
|
3. तेव्हा परीक्षक येशूंची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर.” PEPS
|
4. परंतु येशूंनी उत्तर दिले, “कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’ ” PEPS |
6. आणि त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी घे, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की;
‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय दगडावर आपटू नयेत म्हणून ते तुला आपल्या तळहातावर झेलून घेतील.’ ” PEPS |
8. मग सैतानाने त्यांस एका अतिशय उंच पर्वतावर नेले व त्याने त्यांस जगाची सर्व राज्ये, त्यांतील सर्व ऐश्वर्यासहीत दाखवली.
|
10. येशूंनी त्यास म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर.’ ” PEPS |
11. मग सैतान येशुंना सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन येशुंची सेवा करू लागले. मार्क 1:14, 15; लूक 4:14, 15 PEPS
|
12. {येशुंची गालील प्रांतातील सेवाकार्ये} PS योहानाला तुरूंगात टाकले आहे हे जेव्हा येशूने ऐकले तेव्हा तो गालील प्रांतात निघून गेला.
|
13. नासरेथ सोडून जबुलून व नफताली यांच्या सीमेतील, गालीलच्या सरोवराच्या कफर्णहूमात तो जाऊन राहिला. PEPS
|
15. “जबुलून आणि नफताली हा प्रांत,
सरोवराच्या किनाऱ्यावरील, यार्देनेच्या पलीकडील प्रदेश व परराष्ट्रीय गालील |
16. जे लोक काळोखांत बसत होते त्यांनी,
मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर, ज्योति उदय पावली आहे.” |
17. तेव्हापासून येशूने उपदेश करणे सुरु केले व तो म्हणू लागला की; “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे.” PS
|
18. {प्रथम शिष्यांना पाचारण} (मार्क 1:16-20; लूक 5:1-11) PS नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते.
|
21. येशू तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ; जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर होडीत पाहीले. ते जाळे नीट करत होते. त्याने त्यांना बोलावले,
|
23. {गालील प्रांतातील फेरी व कार्य} (मार्क 1:35-39; लूक 4:44; 6:17-19) PS गालील प्रांतात सगळीकडे फिरत, येशूने त्यांच्या सभास्थानात जाऊन शिकविले, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे विकार बरे केले.
|
24. येशूविषयीची बातमी सर्व सिरीया प्रांतभर पसरली; मग जे आजारांनी व अनेक प्रकारच्या रोगांनी पीडीत होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षघात झाला होता अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि येशूने त्यांना बरे केले.
|
25. मग गालील प्रांत, दकापलीस नगर, यरूशलेम शहर, यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्यामागे चालू लागले. PE
|