मराठी बायबल

इंडियन रिवाइज्ड वर्शन (ISV)
मत्तय
1. {#1अरण्यात येशूची परिक्षा [BR]मार्क 1:12, 13; लूक 4:1-13 } [PS]मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांस अरण्यात नेले.
2. चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली.
3. तेव्हा परीक्षक येशूंची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर.” [PE]
4. [PS]परंतु येशूंनी उत्तर दिले, [SCJ]“कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, [SCJ.] [PE][QS][SCJ]‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर, [SCJ.] [QE][QS2][SCJ]देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’ ”[SCJ.] [QE]
5.
6. [PS]मग सैतानाने त्यांस यरूशलेम या पवित्र शहरात नेले व परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर उभे केले. [PE][PS]आणि त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी घे, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की; [PE][QS]‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि [QE][QS]तुझे पाय दगडावर आपटू नयेत म्हणून [QE][QS2]ते तुला आपल्या तळहातावर झेलून घेतील.’ ” [QE]
7. [PS]येशूंनी त्यास म्हटले, [SCJ]“असेही लिहिले आहे की, ‘तुझा देव, जो प्रभू, याची परीक्षा पाहू नको.’ ”[SCJ.]
8. मग सैतानाने त्यांस एका अतिशय उंच पर्वतावर नेले व त्याने त्यांस जगाची सर्व राज्ये, त्यांतील सर्व ऐश्वर्यासहीत दाखवली.
9. आणि तो त्यांस म्हणाला, “जर तू मला नमन करशील व माझी उपासना करशील तर हे सर्व काही मी तुला देईन.”
10. येशूंनी त्यास म्हटले, [SCJ]“अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, [SCJ.] [PE][QS][SCJ]‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर[SCJ.] [QE][QS][SCJ]आणि त्यालाच नमन कर.’ ”[SCJ.] [QE]
11.
12. [PS]मग सैतान येशुंना सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन येशुंची सेवा करू लागले. [PE]{#1येशुंची गालील प्रांतातील सेवाकार्ये [BR]मार्क 1:14, 15; लूक 4:14, 15 } [PS]योहानाला तुरूंगात टाकले आहे हे जेव्हा येशूने ऐकले तेव्हा तो गालील प्रांतात निघून गेला.
13. नासरेथ सोडून जबुलून व नफताली यांच्या सीमेतील, गालीलच्या सरोवराच्या कफर्णहूमात तो जाऊन राहिला. [PE]
14.
15. [PS]यशया संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. ते असे होते की, [PE][QS]“जबुलून आणि नफताली हा प्रांत, [QE][QS]सरोवराच्या किनाऱ्यावरील, यार्देनेच्या पलीकडील प्रदेश व [QE][QS]परराष्ट्रीय गालील [QE]
16. [QS]जे लोक काळोखांत बसत होते त्यांनी, [QE][QS]मोठा प्रकाश पाहिला. [QE][QS]मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर, [QE][QS]ज्योति उदय पावली आहे.” [QE]
17. [MS] तेव्हापासून येशूने उपदेश करणे सुरु केले व तो म्हणू लागला की; [SCJ]“पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे.”[SCJ.] [ME]
18. {#1प्रथम शिष्यांना पाचारण [BR]मार्क 1:16-20; लूक 5:1-11 } [PS]नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते.
19. येशू त्यांना म्हणाला, [SCJ]“माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.”[SCJ.]
20. मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले. [PE]
21. [PS]येशू तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ; जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर होडीत पाहीले. ते जाळे नीट करत होते. त्याने त्यांना बोलावले,
22. तेव्हा ते दोघेही लगेचच आपली होडी व आपले वडील यांना सोडून त्याच्यामागे गेले. [PE]
23. {#1गालील प्रांतातील फेरी व कार्य [BR]मार्क 1:35-39; लूक 4:44; 6:17-19 } [PS]गालील प्रांतात सगळीकडे फिरत, येशूने त्यांच्या सभास्थानात जाऊन शिकविले, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे विकार बरे केले.
24. येशूविषयीची बातमी सर्व सिरीया प्रांतभर पसरली; मग जे आजारांनी व अनेक प्रकारच्या रोगांनी पीडीत होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षघात झाला होता अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि येशूने त्यांना बरे केले.
25. मग गालील प्रांत, दकापलीस नगर, यरूशलेम शहर, यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्यामागे चालू लागले. [PE]
Total 28 अध्याय, Selected धडा 4 / 28
अरण्यात येशूची परिक्षा
मार्क 1:12, 13; लूक 4:1-13

1 मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांस अरण्यात नेले. 2 चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली. 3 तेव्हा परीक्षक येशूंची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर.” 4 परंतु येशूंनी उत्तर दिले, “कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’ ” 5 6 मग सैतानाने त्यांस यरूशलेम या पवित्र शहरात नेले व परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर उभे केले. आणि त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी घे, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की; ‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय दगडावर आपटू नयेत म्हणून ते तुला आपल्या तळहातावर झेलून घेतील.’ ” 7 येशूंनी त्यास म्हटले, “असेही लिहिले आहे की, ‘तुझा देव, जो प्रभू, याची परीक्षा पाहू नको.’ ” 8 मग सैतानाने त्यांस एका अतिशय उंच पर्वतावर नेले व त्याने त्यांस जगाची सर्व राज्ये, त्यांतील सर्व ऐश्वर्यासहीत दाखवली. 9 आणि तो त्यांस म्हणाला, “जर तू मला नमन करशील व माझी उपासना करशील तर हे सर्व काही मी तुला देईन.” 10 येशूंनी त्यास म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर.’ ” 11 12 मग सैतान येशुंना सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन येशुंची सेवा करू लागले. येशुंची गालील प्रांतातील सेवाकार्ये
मार्क 1:14, 15; लूक 4:14, 15
योहानाला तुरूंगात टाकले आहे हे जेव्हा येशूने ऐकले तेव्हा तो गालील प्रांतात निघून गेला. 13 नासरेथ सोडून जबुलून व नफताली यांच्या सीमेतील, गालीलच्या सरोवराच्या कफर्णहूमात तो जाऊन राहिला. 14 15 यशया संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. ते असे होते की, “जबुलून आणि नफताली हा प्रांत, सरोवराच्या किनाऱ्यावरील, यार्देनेच्या पलीकडील प्रदेश व परराष्ट्रीय गालील 16 जे लोक काळोखांत बसत होते त्यांनी, मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर, ज्योति उदय पावली आहे.” 17 तेव्हापासून येशूने उपदेश करणे सुरु केले व तो म्हणू लागला की; “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे.” प्रथम शिष्यांना पाचारण
मार्क 1:16-20; लूक 5:1-11

18 नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते. 19 येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.” 20 मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले. 21 येशू तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ; जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर होडीत पाहीले. ते जाळे नीट करत होते. त्याने त्यांना बोलावले, 22 तेव्हा ते दोघेही लगेचच आपली होडी व आपले वडील यांना सोडून त्याच्यामागे गेले. गालील प्रांतातील फेरी व कार्य
मार्क 1:35-39; लूक 4:44; 6:17-19

23 गालील प्रांतात सगळीकडे फिरत, येशूने त्यांच्या सभास्थानात जाऊन शिकविले, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे विकार बरे केले. 24 येशूविषयीची बातमी सर्व सिरीया प्रांतभर पसरली; मग जे आजारांनी व अनेक प्रकारच्या रोगांनी पीडीत होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षघात झाला होता अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि येशूने त्यांना बरे केले. 25 मग गालील प्रांत, दकापलीस नगर, यरूशलेम शहर, यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्यामागे चालू लागले.
Total 28 अध्याय, Selected धडा 4 / 28
×

Alert

×

Marathi Letters Keypad References