1. {#1डोंगरावरचे प्रवचन [BR]लूक 6:20-26 } [PS]जेव्हा येशूने त्या लोकसमुदायांना पाहीले तेव्हा तो डोंगरावर चढला, मग तो तेथे खाली बसला असता त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.
2. त्याने आपले तोंड उघडले व त्यांना शिकवले. तो म्हणाला; [PE]
3. [PS] [SCJ]“जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य आहेत, [SCJ.] [PE][QS2][SCJ]कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.[SCJ.] [QE]
4. [QS] [SCJ]‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, [SCJ.] [QE][QS2][SCJ]कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’[SCJ.] [QE]
5. [QS] [SCJ]‘जे सौम्य’ ते धन्य आहेत, [SCJ.] [QE][QS2][SCJ]कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’[SCJ.] [QE]
6. [QS] [SCJ]जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, [SCJ.] [QE][QS2][SCJ]कारण ते संतुष्ट होतील.[SCJ.] [QE]
7. [QS] [SCJ]जे दयाळू ते धन्य आहेत, [SCJ.] [QE][QS][SCJ]कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल.[SCJ.] [QE]
8. [QS] [SCJ]जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, [SCJ.] [QE][QS2][SCJ]कारण ते देवाला पाहतील.[SCJ.] [QE]
9. [QS] [SCJ]जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.[SCJ.] [QE]
10. [QS] [SCJ]न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, [SCJ.] [QE][QS][SCJ]कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.[SCJ.] [QE]
11. [PS] [SCJ]जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात.[SCJ.]
12. [SCJ]आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे, कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला.[SCJ.] [PE]
13. {#1मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे [BR]मार्क 9:50; लूक 14:34 } [PS] [SCJ]तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा कसे खारट बनवता येईल? ते तर पुढे कोणत्याही उपयोगाचे न राहता केवळ फेकून देण्याच्या व मनुष्यांच्या पायदळी तुडवले जाण्यापुरते उपयोगाचे राहील.[SCJ.]
14. [SCJ]तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपवता येत नाही.[SCJ.]
15. [SCJ]आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो.[SCJ.]
16. [SCJ]तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.[SCJ.] [PE]
17. {#1जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण } [PS] [SCJ]नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असा विचार करु नका; मी ते रद्द करावयास नव्हे तर ते पूर्ण करावयास आलो आहे.[SCJ.]
18. [SCJ]कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.[SCJ.]
19. [SCJ]यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील.[SCJ.]
20. [SCJ]म्हणून मी तुम्हास सांगतो, शास्त्री व परूशी यांच्या न्यायीपणापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाही.[SCJ.] [PE]
21. {#1राग व खून [BR]लूक 12:57-59 } [PS] [SCJ]‘खून करू नको आणि जो कोणी खून करतो तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.[SCJ.]
22. [SCJ]मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला, ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.[SCJ.]
23. [SCJ]यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरूद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली, [SCJ.]
24. [SCJ]तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर.[SCJ.]
25. [SCJ]तुझा फिर्यादी तुझ्याबरोबर वाटेवर आहे तोच त्याच्याशी समेट कर, नाही तर कदाचित फिर्यादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरूंगात पडशील.[SCJ.]
26. [SCJ]मी तुला खरे सांगतो शेवटची दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाहीस.[SCJ.] [PE]
27. {#1अशुद्धता } [PS] [SCJ]‘व्यभिचार करू नको,’ म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे, [SCJ.]
28. [SCJ]मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे;[SCJ.]
29. [SCJ]तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपट आणि फेकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.[SCJ.]
30. [SCJ]तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.[SCJ.] [PE]
31. [PS] [SCJ]‘कोणी आपली पत्नी सोडून देतो तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हे सांगितले होते.[SCJ.]
32. [SCJ]मी तर तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या पत्नीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो.[SCJ.] [PE]
33. {#1शपथ व खरेपणा } [PS] [SCJ]आणखी ‘खोटी शपथ वाहू नको’ तर ‘आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.[SCJ.]
34. [SCJ]मी तर तुम्हास सांगतो शपथ वाहूच नका; स्वर्गाची नका, कारण ते देवाचे आसन आहे;[SCJ.]
35. [SCJ]पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पादासन आहे; यरूशलेमेचीहि वाहू नका कारण ती थोर राजाची नगरी आहे.[SCJ.]
36. [SCJ]आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नको, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस.[SCJ.]
37. [SCJ]तर तुमचे बोलणे, होय तर होय आणि नाही तर नाही एवढेच असावे; याहून जे अधिक ते त्या दुष्टापासून आहे.[SCJ.] [PE]
38. {#1सूड [BR]लूक 6:29-31 } [PS] [SCJ]‘डोळ्याबद्दल डोळा’ व ‘दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.[SCJ.]
39. [SCJ]परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर;[SCJ.]
40. [SCJ]जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे;[SCJ.]
41. [SCJ]आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.[SCJ.]
42. [SCJ]जो कोणी तुझ्याजवळ काही मागतो त्यास दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्यास पाठमोरा होऊ नको.[SCJ.] [PE]
43. {#1प्रेम व सर्वांगपूर्ण शील [BR]लूक 6:27-28, 32-36 } [PS] [SCJ]‘आपल्या शेजार्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर’, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.[SCJ.]
44. [SCJ]मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.[SCJ.]
45. [SCJ]अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो दुष्टांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.[SCJ.]
46. [SCJ]कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हास काय प्रतिफळ मिळावे? जकातदारही तसेच करतात की नाही?[SCJ.]
47. [SCJ]आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र सलाम करीत असला तर त्यामध्ये विशेष ते काय करता? परराष्ट्रीय लोकही तसेच करीतात ना?[SCJ.]
48. [SCJ]यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा.[SCJ.] [PE]