1. {#1शोमरोन व यरूशलेमसाठी शोक }
2. [PS]परमेश्वराचे वचन जे मीखा मोरेष्टी याजकडे, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या दिवसात त्याच्याकडे आले, जे वचन शोमरोन व यरूशलेम यांच्याविषयी होते, ते असे. [PE][QS]सर्व लोकांनो ऐका, [QE][QS]पृथ्वी व ते सर्व जे तुझ्यात आहेत, तुम्ही ऐका! [QE][QS]प्रभू परमेश्वर, त्याच्या पवित्र मंदिरातून तुमच्याविरुध्द साक्षीदार होवो. [QE]
3. [QS]पाहा, परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे. [QE][QS]तो खाली येणार व पृथ्वीवरील उच्चस्थानावर चालणार.
4. विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते, [QE][QS]तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील, [QE][QS]दऱ्या दुभंगतील, [QE][QS]आणि उंच टेकड्यावरून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे ते वाहू लागतील. [QE]
5. [QS]ह्याला सर्वांचे कारण याकोबचे पाप, [QE][QS]तसेच इस्राएलाच्या घराण्याची दुष्कर्मे आहेत. [QE][QS]याकोबाच्या बंड खोरीचे कारण काय? [QE][QS]त्यास कारणीभूत शोमरोनच आहे की नाही? [QE][QS]यहूदाची उंचस्थाने कोणती आहेत? [QE][QS]ती यरूशलेमच आहेत की नाही? [QE]
6. [PS]“म्हणून मी शोमरोनला शेतातल्या ढिगाप्रमाणे करीन, [PE][QS]ती द्राक्षमळे लावण्याच्या जागेप्रमाणे होईल.” [QE][QS]मी तिचे दगड दरीत ढकलून देईन, [QE][QS]आणि तिचे पाये उघडे करीन. [QE]
7. [QS]तिच्या सर्व मूर्तीं ठेचून तुकडे तुकडे केले जातील. [QE][QS]तिच्या कोरीव मूर्ती आगीमध्ये भस्मसात केल्या जातील. [QE][QS]तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या मूर्तींचा मी नाश करीन, [QE][QS]कारण तिने वेश्येच्या कमाईने त्या मिळवल्या आहेत, [QE][QS]म्हणून वेश्येच्या वेतनास त्या परत जातील. [QE]
8. [QS]या कारणास्तव मी विलाप व आकांत करीन. [QE][QS]मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन. [QE][QS]मी कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन [QE][QS]आणि घुबडाप्रमाणे शोक करीन. [QE]
9. [QS]कारण तिच्या जखमा बऱ्या न होणाऱ्या आहेत. [QE][QS]कारण त्या यहूदापर्यंत आल्या आहेत, [QE][QS]आणि तो माझ्या मनुष्यांच्या वेशीपर्यंत, यरूशलेमपर्यंत पोहोचला आहे. [QE]
10. [QS]गथमध्ये हे सांगू नका; अजिबात रडू नका. [QE][QS]बेथ-ले-अफ्रामध्ये मी धुळीत लोळलो. [QE]
11. [QS]शाफीरमध्ये राहणारे लोकहो, [QE][QS]तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन निघून जा. [QE][QS]सनानिवासी बाहेर निघून येत नाही, [QE][QS]बेथ-एसलासचा शोक करेल, [QE][QS]कारण त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. [QE]
12. [QS]मारोथमधील लोक उत्सुकतेने चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत, [QE][QS]कारण परमेश्वराकडून संकट खाली यरूशलेमेच्या वेशीपर्यंत आले आहे. [QE]
13. [QS]लाखीशात राहणारे, रथाला चपळ घोडा जुंप, [QE][QS]लाखीश, तूच, सियोनेच्या कन्येला पापाची सुरूवात अशी होती. [QE][QS]कारण इस्राएलाचे अपराध तुझ्यांत सापडले होते. [QE]
14. [QS]म्हणून तू गथांतल्या मोरेश-गथला निरोपाचे नजराणे देशील; [QE][QS]अकजीबची घरे इस्राएलाच्या राजाला निराश करतील. [QE]
15. [QS]मारेशामध्ये राहणाऱ्या लोकांनो, [QE][QS]मी तुझा वारीस तुझ्याकडे आणीन, [QE][QS]जे तुमचा ताबा घेतील. [QE][QS]इस्राएलचे पुढारी [* वैभव ]अदुल्लामला येतील. [QE]
16. [QS]म्हणून तू आपले केस काप व मुंडन कर. [QE][QS]कारण तुम्हास प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. [QE][QS]गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:च्या डोक्याचे मुंडन करा. [QE][QS]कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल. [QE]