मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
गणना
1. {याजक आणि वेली ह्यांच्यासाठी तरतूद} [PS] परमेश्वर अहरोनास म्हणाला, या पवित्र स्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबरच्या तुझ्या घराण्यास वाहावा लागेल. त्याच प्रमाणे याजक पदासंबंधीचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहवा लागेल.
2. तुझ्या वंशातील इतर लेवी लोकांस आण. तुझ्याबरोबर आणि साक्षपटाच्या तंबूत काम करण्यासाठी ते तुला आणि तुझ्या मुलांना मदत करतील. [PE][PS]
3. लेवी वंशातील लोक तुझ्या सत्तेखाली आहेत. मंडपात जे जे काम करायचे आहे ते ते लोक करतील. परंतु त्यांनी पवित्र स्थानाजवळ आणि वेदीजवळ जाता काम नये. जर ते गेले तर ते मरतील आणि तू सुद्धा मरशील.
4. ते तुझ्याबरोबर असतील आणि तुला मदत करतील. ते दर्शनमंडपाची काळजी घ्यायला जबाबदार असतील. मंडपात जे काही काम करायचे असेल ते सर्व ते करतील. तू जेथे असशील तेथे दुसरा कोणीही येऊ नये.
5. पवित्र जागेची आणि वेदीची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. इस्राएल लोकांवर मला पुन्हा रागवायचे नाही. [PE][PS]
6. इस्राएल मधल्या सर्व लोकांतून मीच लेवी वंशाच्या लोकांस निवडले. ते तुझ्यासाठी एक भेट आहे. त्या लोकांस मी तुला दिले. ते परमेश्वराची सेवा करतील आणि दर्शनमंडपामध्ये काम करतील.
7. पण अहरोन फक्त तू आणि तुझ्या मुलांनीच याजकाचे काम केले पाहिजे. वेदीजवळ फक्त तुम्हीच जाऊ शकता. पवित्रस्थानाच्या पडद्याआड फक्त तुम्हीच जाऊ शकता. मी तुला एक भेट देत आहे याजक म्हणून तू करावयाची सेवा. माझ्या पवित्र स्थानाजवळ दुसरा कोणी आला तर त्यास मारुन टाकले जाईल. [PE][PS]
8. नंतर परमेश्वर अहरोनास म्हणाला, पाहा मला केलेली समर्पणे इस्राएलाच्या ज्या पवित्र भेटी मला देतात त्या सर्व मी तुला दिल्या आहेत. तू आणि तुझी मुले त्या वाटून घेऊ शकता. तो नेहमीच तुमचा हक्क होय.
9. लोक होमार्पण, अन्नार्पण, पापार्पणे आणि अपराधासाठी करावयाची अर्पणे इत्यादी बऱ्याच गोष्टी आणतील. ती अर्पणे पवित्र आहेत. सर्वात पवित्र अर्पणातला जळलेला भाग तुझा असेल. त्या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी असतील.
10. त्या गोष्टी फक्त पवित्र जागेतच खा. तुझ्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष ते खाऊ शकतो. पण ती अर्पणे पवित्र आहेत हे तू लक्षात ठेव.
11. आणि इस्राएलचे लोक ओवाळणीची अर्पणे म्हणून जी अर्पणे देतील ती सुद्धा तुझीच असतील. मी ती तुला, तुझ्या मुलांना आणि मुलींना देत आहे. तुझ्या घरातल्या शुद्ध असलेल्या सर्व मनुष्यांनी ती खावी.
12. आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षरस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वरास देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात.
13. लोक जेव्हा कापणीच्या वेळी धान्य गोळा करतात तेव्हा प्रथम गोळा केलेले धान्य ते परमेश्वराकडे आणतात. म्हणून मी या गोष्टी तुला देतो आणि तुझ्या कुटुंबातील शुद्ध माणसे ते खाऊ शकतात. [PE][PS]
14. इस्राएलात अर्पिलेले सर्व तुझे होईल.
15. स्त्रीचे पहिले मूल आणि जनावराचे पहिले पाडस परमेश्वरास अर्पण केलेच पाहिजे. ते मूल तुझे असेल. जन्माला आलेले पहिले पाडस जर अशुद्ध असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. जर ते मूल असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. ते मूल परत त्या कुटुंबाचे होईल.
16. ज्यांना खंडणी भरून सोडवायचे ते मूल एक महिन्याचे झाल्यानंतर तुझ्या ठरावाप्रमाणे पवित्रस्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे पाच शेकेल रुपे म्हणजे वीस गेरा [* वीस गेरा ] घेऊन त्यांना सोडून द्यावे. [PE][PS]
17. परंतु तू गाईचे प्रथम जन्मलेले, मेंढीचे प्रथम जन्मलेले आणि बकरीचे प्रथम जन्मलेले यांची खंडणी भरून सोडू नकोस. ते प्राणी पवित्र आहेत, ते माझ्यासाठी राखीव आहेत. त्यांचे रक्त वेदीवर शिंपड आणि त्यांची चरबी जाळून टाक. ही अग्नीत दिलेली अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वरास संतोष देतो.
18. पण या प्राण्यांचे मांस तुझे असेल. ओवाळणीचा ऊर तुझा असेल आणि इतर अर्पणातली उजवी मांडी तुझीच असेल. [PE][PS]
19. “इस्राएली लोक ज्या पवित्र गोष्टी मला अर्पण करतात त्या मी परमेश्वर तुला देतो. तो तुझा वाटा आहे. मी तो तुला, तुझ्या मुलांना व मुलींना देत आहे. हा नियम सदैव अस्तित्वात राहील. तो परमेश्वराबरोबर केलेला निरंतरचा मिठाचा करार आहे. तो मोडता येणार नाही. मी तुला आणि तुझ्या वंशजांना असे वचन देतो.”
20. परमेश्वर अहरोनाला आणखी म्हणाला, तुला जमीनीपैकी काहीही वतन मिळणार नाही आणि जे दुसऱ्या लोकांचे आहे ते तुला मिळणार नाही. मी परमेश्वर तुझा हिस्सा आहे. इस्राएल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे. [PE][PS]
21. लेवीचे वंशज दर्शनमंडपाची सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सर्व दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहे.
22. यापुढे इस्राएल लोकांनी कधीही दर्शनमंडपाजवळ जाता कामा नये. ते जर गेले त्यांना पाप लागेल व ते मरतील. [PE][PS]
23. लेवीचे जे वंशज दर्शनमंडपामध्ये काम करतात ते त्याच्याविरुध्द केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. लेव्यांना इस्राएल लोकांमध्ये वतन नसावे.
24. परंतु इस्राएल लोक जे समर्पित अंश म्हणून परमेश्वरास अर्पण करतात ते लेव्याची वतनभाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहेत म्हणूनच मी लेवी लोकांबद्दल असे बोललो, इस्राएल लोकांमध्ये त्यांना वतन मिळावयाचे नाही. [PE][PS]
25. परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
26. तू लेवी लोकांशी बोल आणि त्यांना सांग: इस्राएल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हास नेमून दिले आहेत, तो दहावा भाग लेवी लोकांचा असेल. पण त्याचा दहावा भाग तू परमेश्वरास अर्पण केला पाहिजेस.
27. हा तुमचा समर्पित अंश खळ्यातल्या धान्यासारखा व रसकुंडातल्या द्राक्षरसासारखा तुमच्या हिशोबी गणिला जाईल. [PE][PS]
28. याप्रमाणे तू सुद्धा इस्राएलाचे लोक देतात तशी परमेश्वरास अर्पणे देशील. इस्राएलचे लोक परमेश्वरास जे देतात त्याच्या दहावा भाग ते तुला देतील आणि त्यातला दहावा भाग तू याजक अहरोनाला देशील.
29. इस्राएलचे लोक जेव्हा त्यांच्याकडे असलेल्या गोष्टीतील दहावा भाग तुला देतील तेव्हा तू त्यातला सर्वात चांगला आणि पवित्र भाग निवडायला पाहिजेस आणि तो दहावा भाग तू परमेश्वरास अर्पण केला पाहिजेस. [PE][PS]
30. “मोशे लेवी लोकांस सांग, तुम्ही त्यातून जे उत्तम त्याची उचलणी करता तेव्हा ते लेव्यांकडे, खळ्यातले उत्पन्न आणि द्राक्षरसाच्या कुंडातले उत्पन्न यासारखे मोजले जाईल.
31. उरलेले तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्यानी खावा. तुम्ही दर्शनमंडपामध्ये जे काम करता त्याबद्दलची ही मजुरी आहे.
32. आणि जर तुम्ही सर्वांत चांगला भाग समर्पित अंश म्हणून अर्पण केल्यामुळे तुम्हास पाप लागणार नाही. इस्राएल लोकांच्या पवित्र वस्तू भ्रष्ट करू नये म्हणजे तुम्ही मरणार नाही.” [PE]

Notes

No Verse Added

Total 36 अध्याय, Selected धडा 18 / 36
गणना 18:36
याजक आणि वेली ह्यांच्यासाठी तरतूद 1 परमेश्वर अहरोनास म्हणाला, या पवित्र स्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबरच्या तुझ्या घराण्यास वाहावा लागेल. त्याच प्रमाणे याजक पदासंबंधीचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहवा लागेल. 2 तुझ्या वंशातील इतर लेवी लोकांस आण. तुझ्याबरोबर आणि साक्षपटाच्या तंबूत काम करण्यासाठी ते तुला आणि तुझ्या मुलांना मदत करतील. 3 लेवी वंशातील लोक तुझ्या सत्तेखाली आहेत. मंडपात जे जे काम करायचे आहे ते ते लोक करतील. परंतु त्यांनी पवित्र स्थानाजवळ आणि वेदीजवळ जाता काम नये. जर ते गेले तर ते मरतील आणि तू सुद्धा मरशील. 4 ते तुझ्याबरोबर असतील आणि तुला मदत करतील. ते दर्शनमंडपाची काळजी घ्यायला जबाबदार असतील. मंडपात जे काही काम करायचे असेल ते सर्व ते करतील. तू जेथे असशील तेथे दुसरा कोणीही येऊ नये. 5 पवित्र जागेची आणि वेदीची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. इस्राएल लोकांवर मला पुन्हा रागवायचे नाही. 6 इस्राएल मधल्या सर्व लोकांतून मीच लेवी वंशाच्या लोकांस निवडले. ते तुझ्यासाठी एक भेट आहे. त्या लोकांस मी तुला दिले. ते परमेश्वराची सेवा करतील आणि दर्शनमंडपामध्ये काम करतील. 7 पण अहरोन फक्त तू आणि तुझ्या मुलांनीच याजकाचे काम केले पाहिजे. वेदीजवळ फक्त तुम्हीच जाऊ शकता. पवित्रस्थानाच्या पडद्याआड फक्त तुम्हीच जाऊ शकता. मी तुला एक भेट देत आहे याजक म्हणून तू करावयाची सेवा. माझ्या पवित्र स्थानाजवळ दुसरा कोणी आला तर त्यास मारुन टाकले जाईल. 8 नंतर परमेश्वर अहरोनास म्हणाला, पाहा मला केलेली समर्पणे इस्राएलाच्या ज्या पवित्र भेटी मला देतात त्या सर्व मी तुला दिल्या आहेत. तू आणि तुझी मुले त्या वाटून घेऊ शकता. तो नेहमीच तुमचा हक्क होय. 9 लोक होमार्पण, अन्नार्पण, पापार्पणे आणि अपराधासाठी करावयाची अर्पणे इत्यादी बऱ्याच गोष्टी आणतील. ती अर्पणे पवित्र आहेत. सर्वात पवित्र अर्पणातला जळलेला भाग तुझा असेल. त्या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलांसाठी असतील. 10 त्या गोष्टी फक्त पवित्र जागेतच खा. तुझ्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष ते खाऊ शकतो. पण ती अर्पणे पवित्र आहेत हे तू लक्षात ठेव. 11 आणि इस्राएलचे लोक ओवाळणीची अर्पणे म्हणून जी अर्पणे देतील ती सुद्धा तुझीच असतील. मी ती तुला, तुझ्या मुलांना आणि मुलींना देत आहे. तुझ्या घरातल्या शुद्ध असलेल्या सर्व मनुष्यांनी ती खावी. 12 आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षरस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वरास देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात. 13 लोक जेव्हा कापणीच्या वेळी धान्य गोळा करतात तेव्हा प्रथम गोळा केलेले धान्य ते परमेश्वराकडे आणतात. म्हणून मी या गोष्टी तुला देतो आणि तुझ्या कुटुंबातील शुद्ध माणसे ते खाऊ शकतात. 14 इस्राएलात अर्पिलेले सर्व तुझे होईल. 15 स्त्रीचे पहिले मूल आणि जनावराचे पहिले पाडस परमेश्वरास अर्पण केलेच पाहिजे. ते मूल तुझे असेल. जन्माला आलेले पहिले पाडस जर अशुद्ध असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. जर ते मूल असेल तर ते परत मागे विकत घेतले पाहिजे. ते मूल परत त्या कुटुंबाचे होईल. 16 ज्यांना खंडणी भरून सोडवायचे ते मूल एक महिन्याचे झाल्यानंतर तुझ्या ठरावाप्रमाणे पवित्रस्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे पाच शेकेल रुपे म्हणजे वीस गेरा * वीस गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे. 17 परंतु तू गाईचे प्रथम जन्मलेले, मेंढीचे प्रथम जन्मलेले आणि बकरीचे प्रथम जन्मलेले यांची खंडणी भरून सोडू नकोस. ते प्राणी पवित्र आहेत, ते माझ्यासाठी राखीव आहेत. त्यांचे रक्त वेदीवर शिंपड आणि त्यांची चरबी जाळून टाक. ही अग्नीत दिलेली अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वरास संतोष देतो. 18 पण या प्राण्यांचे मांस तुझे असेल. ओवाळणीचा ऊर तुझा असेल आणि इतर अर्पणातली उजवी मांडी तुझीच असेल. 19 “इस्राएली लोक ज्या पवित्र गोष्टी मला अर्पण करतात त्या मी परमेश्वर तुला देतो. तो तुझा वाटा आहे. मी तो तुला, तुझ्या मुलांना व मुलींना देत आहे. हा नियम सदैव अस्तित्वात राहील. तो परमेश्वराबरोबर केलेला निरंतरचा मिठाचा करार आहे. तो मोडता येणार नाही. मी तुला आणि तुझ्या वंशजांना असे वचन देतो.” 20 परमेश्वर अहरोनाला आणखी म्हणाला, तुला जमीनीपैकी काहीही वतन मिळणार नाही आणि जे दुसऱ्या लोकांचे आहे ते तुला मिळणार नाही. मी परमेश्वर तुझा हिस्सा आहे. इस्राएल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे. 21 लेवीचे वंशज दर्शनमंडपाची सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सर्व दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहे. 22 यापुढे इस्राएल लोकांनी कधीही दर्शनमंडपाजवळ जाता कामा नये. ते जर गेले त्यांना पाप लागेल व ते मरतील. 23 लेवीचे जे वंशज दर्शनमंडपामध्ये काम करतात ते त्याच्याविरुध्द केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. लेव्यांना इस्राएल लोकांमध्ये वतन नसावे. 24 परंतु इस्राएल लोक जे समर्पित अंश म्हणून परमेश्वरास अर्पण करतात ते लेव्याची वतनभाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहेत म्हणूनच मी लेवी लोकांबद्दल असे बोललो, इस्राएल लोकांमध्ये त्यांना वतन मिळावयाचे नाही. 25 परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, 26 तू लेवी लोकांशी बोल आणि त्यांना सांग: इस्राएल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हास नेमून दिले आहेत, तो दहावा भाग लेवी लोकांचा असेल. पण त्याचा दहावा भाग तू परमेश्वरास अर्पण केला पाहिजेस. 27 हा तुमचा समर्पित अंश खळ्यातल्या धान्यासारखा व रसकुंडातल्या द्राक्षरसासारखा तुमच्या हिशोबी गणिला जाईल. 28 याप्रमाणे तू सुद्धा इस्राएलाचे लोक देतात तशी परमेश्वरास अर्पणे देशील. इस्राएलचे लोक परमेश्वरास जे देतात त्याच्या दहावा भाग ते तुला देतील आणि त्यातला दहावा भाग तू याजक अहरोनाला देशील. 29 इस्राएलचे लोक जेव्हा त्यांच्याकडे असलेल्या गोष्टीतील दहावा भाग तुला देतील तेव्हा तू त्यातला सर्वात चांगला आणि पवित्र भाग निवडायला पाहिजेस आणि तो दहावा भाग तू परमेश्वरास अर्पण केला पाहिजेस. 30 “मोशे लेवी लोकांस सांग, तुम्ही त्यातून जे उत्तम त्याची उचलणी करता तेव्हा ते लेव्यांकडे, खळ्यातले उत्पन्न आणि द्राक्षरसाच्या कुंडातले उत्पन्न यासारखे मोजले जाईल. 31 उरलेले तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्यानी खावा. तुम्ही दर्शनमंडपामध्ये जे काम करता त्याबद्दलची ही मजुरी आहे. 32 आणि जर तुम्ही सर्वांत चांगला भाग समर्पित अंश म्हणून अर्पण केल्यामुळे तुम्हास पाप लागणार नाही. इस्राएल लोकांच्या पवित्र वस्तू भ्रष्ट करू नये म्हणजे तुम्ही मरणार नाही.”
Total 36 अध्याय, Selected धडा 18 / 36
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References