1. इस्राएलाला आशीर्वाद द्यायची परमेश्वराची इच्छा आहे हे बलामाने पाहिले. म्हणून त्याने ते कोणत्याही प्रकारचे मंत्रतंत्र वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने रानाकडे पाहिले.
2. बलामाने रानाकडे पाहिले आणि त्यास इस्राएलाचे सगळे वंश दिसले. त्यांनी आपापल्या भागात आपापल्या गटासह तळ दिला होता. नंतर देवाचा आत्मा बलामावर आला.
3. त्याने हा संदेश स्विकारला आणि म्हणाला, [QBR] बौराचा मुलगा बलाम, [QBR] ज्या मनुष्याचे डोळे स्पष्ट उघडे आहेत त्याविषयी बोलत आहे. [QBR]
4. जो देवाचे शब्द ऐकतो आणि बोलतो, [QBR] जो सर्वसमर्थापासून दृष्टांत पाहतो, [QBR] जो त्याच्यापुढे डोळे उघडे ठेवून नतमस्तक होतो. [QBR]
5. हे याकोबा तुझे तंबू, [QBR] हे इस्राएला, जिथे तू राहतो ते किती सुंदर आहे! [QBR]
6. खोऱ्यासारखे विस्तृत पसरलेले, [QBR] नदीकाठी लावलेल्या बागेसारखे, [QBR] परमेश्वराने लावलेल्या कोरफडीप्रमाणे आहे, [QBR] पाण्याजवळच्या गंधसरूसारखे ते आहेत. [QBR]
7. पाणी त्यांच्या बादलीतून वाहील, [QBR] आणि त्यांच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल. [QBR] त्यांचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल [QBR] व त्यांच्या राजाचा गौरव होईल. [QBR]
8. देवाने त्यांना मिसरामधून बाहेर आणले. [QBR] त्यांना रानटी बैलासारखी शक्ती आहे. [QBR] तो आपल्याविरूद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना खाऊन टाकील. [QBR] तो त्यांच्या हाडांचे तुकडे तुकडे करील. [QBR] तो आपल्या बाणांनी त्यांना मारील. [QBR]
9. तो सिंहासारखा, [QBR] सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे. त्यास उठवण्याची कोण हिंम्मत करील? [QBR] जो तुला आशीर्वाद देईल तो प्रत्येकजण आशीर्वाद देईल; [QBR] तुला शाप देणारा प्रत्येकजण शापित होईल. [PS]
10. {बलामाचा संदेश} [PS] बलामाविरूद्ध बालाकाचा राग भडकला आणि त्याने रागाने आपले हात एकत्रीत आपटले. बालाक बलामास म्हणाला, “मी तुला माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी बोलावले, पण पाहा, तू त्यांना तीन वेळा आशीर्वाद दिलास.
11. तर आता मला सोडून घरी जा. मी तुला चांगला मोबदला देईन असे म्हटले होते, परंतु परमेश्वराने तुला कोणतेही इनाम मिळण्यापासून दूर ठेवले आहे.” [PE][PS]
12. बलाम बालाकाला म्हणाला, तूच माझ्याकडे माणसे पाठवलीस. त्या मनुष्यांनी मला येण्याबद्दल विचारले. पण मी त्यांना म्हणालो,
13. बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वत: काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेवढीच मी बोलतो. तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या मनुष्यांना सांगितले होते.
14. तर आता पाहा. मी माझ्या मनुष्यांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलाचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांस काय करतील ते सांगतो. [PE][PS]
15. बलामाने हा संदेश सांगण्यास सुरवात केली. तो म्हणाला, [QBR] बौराचा मुलगा बलाम बोलतो, [QBR] ज्या मनुष्याचे डोळे सताड उघडे आहेत. [QBR]
16. हा संदेश जो कोणी देवाकडून ऐकतो, [QBR] ज्याला परात्परापासूनचे ज्ञान आहे, [QBR] ज्याला सर्वसमर्थापासून दर्शन आहे, [QBR] जो डोळे उघडे ठेवून दंडवत घालतो. [QBR]
17. मी त्यास पाहीन, पण तो आता इथे नाही. [QBR] मी त्याच्याकडे पाहीन, पण तो जवळ नाही. [QBR] याकोबातून एक तारा बाहेर येईल, [QBR] आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल. [QBR] तो मवाबाच्या नेत्यांना चिरडून टाकील [QBR] आणि शेथाच्या सर्व मुलांचा तो नाश करील. [QBR]
18. नंतर अदोम इस्राएलाचे वतन होईल, [QBR] आणि सेईरही आपल्या इस्राएली [QBR] शत्रूंचे वतन होईल, [QBR] ज्याला इस्राएल आपल्या पराक्रमाने जिंकेल. [QBR]
19. याकोबाच्या घराण्यातून एक राजा येईल तो त्यांच्यावर राज्य करील, [QBR] आणि तो त्यांच्या शहरातील उरलेल्यांचा नाश करील.
20. नंतर बलामाने अमालेकाकडे पाहिले आणि त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, [QBR] “अमालेकी एकदा राष्ट्रांत महान होता, [QBR] पण त्याचा अंतीम शेवट नाश होईल.”
21. नंतर बलामने केनीकडे पाहिले आणि त्याने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, [QBR] “तू जेथे राहतोस ती जागा बळकट आहे, [QBR] आणि तुझे घरटे खडकात आहे.” [QBR]
22. “तरीसुद्धा केनी राष्ट्रांचा नाश होईल, [QBR] जेव्हा अश्शूर तुला बंदिवान करून नेईल.” [PE][PS]
23. नंतर बलामाने अंतीम संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, देव जेव्हा असे करतो “हायहाय! जेव्हा देव हे करीत असता कोण जिवंत राहील?” [QBR]
24. कित्तीमाच्या किनाऱ्यापासून जहाजे येतील; [QBR] ते अश्शूरावर हल्ला करतील आणि एबर जिंकून घेतील. [QBR] पण त्यांचासुद्धा नाश होईल.
25. नंतर बलाम उठला आणि गेला. तो आपल्या घरी परत गेला आणि बालाकही आपल्या वाटेने गेला. [PE]