1. {मवाब देशात इस्त्राएल लोकांची शिरगणती} PS मरी येऊन गेल्यानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनाचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला. तो म्हणाला,
|
2. “इस्राएलात, वीस वर्षाचे आणि वीस वर्षांवरील अधिक वयाचे असून युध्दास जाण्याच्या लायकीचे असतील त्या सगळ्या मंडळीची त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे मोजणी करा.”
|
3. तेव्हा मोशे आणि याजक एलाजार त्याच्याशी बोलले यरीहोपाशी यार्देन नदीतीरी मवाबाच्या मैदानात त्यांना बोलले, ते म्हणाले,
|
4. मोशे आणि जे इस्राएल लोक, मिसर देशातून बाहेर आले होते त्यांना परमेश्वराने ही आज्ञा दिल्याप्रमाणे, वीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची तुम्ही मोजणी करा.
|
5. रऊबेन हा इस्राएलाचा पहिला जन्मलेला मुलगा होता. रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे आली ती कुळे म्हणजे: हनोखाचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ.
|
9. अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहरोनाच्या विरूद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरूद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहाला पाठींबा दिला.
|
10. त्यावेळी ती अडीचशे माणसे अग्नीने खाऊन टाकली, त्याचे सर्व अनुयायी मरण पावले तेव्हा धरतीने आपले तोंड उघडले आणि तिने कोरहासह त्यांना गिळून टाकले. ते इशाऱ्याचे चिन्ह असे झाले.
|
12. शिमोनाच्या कुळातलीही काही कुळेः
नमुवेलाचे नमुवेली कूळ, यामीनाचे यामीनी कूळ, याकीनाचे याकीनी कूळ, |
20. यहूदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशीः
शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ |
29. मनश्शेच्या कुळातील कुळेः
माखीराचे, माखीरी कूळ (माखीर गिलादाचा बाप होता), गिलादाचे गिलादी कूळ. PEPS |
33. हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
|
35. एफ्राइमाच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती, शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.
|
37. ही एफ्राइमाच्या कुळातील कुळे: त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते. PEPS
|
54. मोठ्या कुळाला जास्त वतन मिळेल आणि लहान कुळाला कमी वतन मिळेल. त्यांना जे वतन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या मनुष्यांच्या समप्रमाणात असेल.
|
55. देश चिठ्ठ्या टाकून वाटायचा आहे त्यांच्या वडिलांच्या वंशाच्या नावांप्रमाणे त्यांनी वतन करून घ्यावा.
|
57. {लेवी लोकांची कुळे} PS त्यांनी लेव्याच्या कुळातील, कुळांचीही गणती केली, ती ही होतीः
गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ, कहाथाचे कहाथी कूळ, मरारीचे मरारी कूळ. |
58. लेव्याची ही कूळे होतीः
लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, आणि कोरही कूळ. अम्राम कहाथाच्या कुळातील होता. |
59. अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम. PEPS
|
62. लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या तेवीस हजार होती. परंतु यांची गणती इस्राएलाच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांस वतन दिले त्यामध्ये यांना हिस्सा मिळाला नाही. PS
|
63. {पहिल्या शिरगणतीतले कालेब व यहोशवा मात्र हयात} PS मोशे आणि याजक एलाजार यांनी जे मोजले ते हेच आहेत. त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनवर इस्राएलाच्या वंशाची मोजणी केली.
|
64. खूप वर्षांपूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मरण पावले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते. PEPS
|
65. कारण इस्राएल लोकांस तुम्ही रानात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा होते. PE
|