मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1. {अशुद्ध झालेल्या मनुष्यास छावणीबाहेर काढणे} [PS] परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2. “इस्राएल लोकांस अशी आज्ञा कर की, प्रत्येक महारोगी, व कोणाला कसल्याही प्रकारचा स्त्राव होत असेल व कोणी प्रेताला शिवल्यामुळे अशुद्ध झालेला असल्यास अशा लोकांस त्यांनी छावणीच्या बाहेर घालवून द्यावे;
3. मग तो पुरुष असो किंवा ती स्त्री असो त्यांना छावणीच्या बाहेर काढावे म्हणजे मग छावणी आजार व विटाळापासून शुद्ध स्वच्छ राहील; कारण मी छावणीत तुमच्याबरोबर राहत आहे.”
4. तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मानून त्या लोकांस छावणीबाहेर काढून टाकले. लेवी. 6:1-7 [PE][PS]
5. {अपराधाबद्दल होणारा दंड} [PS] परमेश्वर पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
6. इस्राएल लोकांस हे सांग की एखादा पुरुष वा स्त्री दुसऱ्याचा अपराध करील तर खरे पाहता तो परमेश्वराविरूद्धच पाप करील व म्हणून तो दोषी ठरेल.
7. तेव्हा त्या मनुष्याने आपला अपराध कबूल करावा. मग ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याची त्याने पूर्णपणे भरपाई करावी व त्या भरपाईत आणखी एक पंचमांशाची भर घालून ज्याचा त्याने अपराध केला आहे त्यास ती सर्व द्यावी. [PE][PS]
8. पण ज्याच्यावर अपराध घडला आहे तो मेला आणि अपराधाबद्दलची भरपाई घेण्यास त्याचे जवळचे कोणी नातलग नसतील तर त्या अपराधी मनुष्याने ती भरपाई परमेश्वरास अर्पण करावी. त्याने ती पूर्ण भरपाई याजकाकडे द्यावी. याजकाने त्या अपराध्याच्या प्रायश्चितासाठी प्रायश्चिताचा मेंढा अर्पण करावा परंतु राहिलेली भरपाई याजकाने ठेवावी.
9. “जर कोणी इस्राएली लोकांमधून परमेश्वरास समर्पित करण्याकरिता काही विशेष देणगी याजकाकडे देईल तर ती याजकाने ठेवून घ्यावी; ती त्याचीच होईल.
10. प्रत्येक मनुष्याने पवित्र केलेल्या वस्तू त्या याजकाच्याच होत. याजकाला कोणी काही दिले तर ते त्याचेच होईल.” [PS]
11. {प्रेमशंकेविषयी नियम} [PS] मग परमेश्वर पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
12. इस्राएल लोकांस असे सांग की एखाद्या मनुष्याच्या पत्नीने त्याचा विश्वासघात केला. [PE][PS]
13. म्हणजे तिने दुसऱ्या मनुष्याशी कुकर्म केले व ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेवली तर कोणी साक्षीदार नसल्यामुळे हे कुकर्म तिच्या नवऱ्याला कधीच कळणार नाही; ती स्वत: तर आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगणारच नाही;
14. आणि तिच्या पतीच्या मनात प्रेमशंका उदभवली आणि आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्यास संशय येऊन ती जर खरोखर भ्रष्ट झालेली असली अथवा तिच्या पतीच्या मनात प्रेमशंका उदभवून आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्यास संशय आला आणि ती वास्तविक भ्रष्ट झालेली नसली. [PE][PS]
15. जर असे झाले, तर त्या मनुष्याने आपल्या पत्नीला याजकाकडे घेऊन जावे. तसेच त्याने अर्पण म्हणून एक दशमांश एफा जवाचे पीठ अर्पावे; त्याच्यावर त्याने तेल ओतू नये किंवा धूप ठेवू नये; कारण परप्रेमशंकेमुळे केलेले म्हणजे अनीतीचे स्मरण करून देणारे हे अन्नार्पण होय. [PE][PS]
16. याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे.
17. मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे व पवित्र निवासमंडपाच्या जमिनीवरील थोडीशी धूळ त्यामध्ये टाकावी. [PE][PS]
18. याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे रहावयास सांगावे. मग त्याने तिच्या डोक्याचे केस सोडावे, आणि द्वेषामुळे अर्पण करण्यासाठी आणिलेले जवाचे पीठ तिच्या हातावर ठेवावे. त्याचवेळी याजकाने शाप आणणारे जे कडू पाणी आपल्या हातात घ्यावे;
19. मग त्या याजकाने त्या स्त्रीला खोटे न बोलण्याबद्दल सूचना द्यावी. तसेच तिने खरे सांगण्याचे वचन द्यावे. याजकाने तिला म्हणावे; तू लग्न झालेल्या तुझ्या नवऱ्याविरूद्ध पाप करून दुसऱ्या पुरुषाबरोबर कुकर्म केले नसेल तर मग या शाप देणाऱ्या कडू पाण्यापासून मुक्त हो. [PE][PS]
20. परंतु तू जर तुझ्या नवऱ्या विरूद्ध पाप केले असेल, तू दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध केला असशील तर मग तू भ्रष्ट झाली आहेस.
21. मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरापुढे शापाची शपथ घ्यावयास सांगावे; परमेश्वर तुझी मांडी सडवील व तुझे पोट फुगविल तेव्हा परमेश्वर तुला लोकांच्या शापाला व तिरस्काराला पात्र करो.
22. याजकाने म्हणावे, म्हणजे तुझे पोट फुगविण्यासाठी [* तुला वांझ करण्यासाठी] व मांडी सडविण्यासाठी हे शापजनक पाणी तुझ्या आतड्यात शिरेल. मग त्या स्त्रीने आमेन, आमेन असे म्हणावे. [PE][PS]
23. मग याजकाने हे शापशब्द पुस्तकात लिहून ते कडू पाण्यात धुवावे. [PE][PS]
24. मग ते शापित कडू पाणी त्या स्त्रीने प्यावे. हे पाणी तिच्या पोटात जाईल आणि तिच्या पोटात कडूपणा उत्पन्न करील.
25. नंतर याजकाने ते द्वेषाबद्दलचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदीजवळ घेऊन जावे.
26. मग त्यातील मूठभर अन्नार्पण घेऊन त्याचे स्मारक म्हणून ते वेदीवर जाळावे. त्यानंतर याजकाने त्या स्त्रीला हे पाणी पिण्यास सांगावे. [PE][PS]
27. जर त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध अपराध केला असेल तर शापजनक पाणी पाजल्यावर ते तिच्या पोटात जाईल व कडूपणा उत्पन्न करील. तिचे पोट फुगेल, तिची मांडी सडेल तिच्या लोकात तिचे नाव शापित होईल.
28. परंतु त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध पाप केले नसेल व ती शुद्ध असेल तर ती स्त्री अपराधी नाही असे याजकाने तिला सांगावे. मग ती मुक्त होईल व गर्भधारणेस पात्र ठरेल. [PE][PS]
29. तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी.
30. किंवा एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीने आपल्या विरूद्ध पाप केले आहे असा संशय व द्वेष, धरला तर त्या मनुष्याने अशी कारवाई करावी; त्या मनुष्याने [† याजकाने] स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे व सांगितलेल्या नियमाप्रमाणे तिच्याविरूद्ध कारवाई करावी. [PE][PS]
31. मग पती अधर्म करण्यापासून मुक्त होईल परंतु जर स्त्रीने पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल. [PE]

Notes

No Verse Added

Total 36 Chapters, Current Chapter 5 of Total Chapters 36
गणना 5:40
1. {अशुद्ध झालेल्या मनुष्यास छावणीबाहेर काढणे} PS परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2. “इस्राएल लोकांस अशी आज्ञा कर की, प्रत्येक महारोगी, कोणाला कसल्याही प्रकारचा स्त्राव होत असेल कोणी प्रेताला शिवल्यामुळे अशुद्ध झालेला असल्यास अशा लोकांस त्यांनी छावणीच्या बाहेर घालवून द्यावे;
3. मग तो पुरुष असो किंवा ती स्त्री असो त्यांना छावणीच्या बाहेर काढावे म्हणजे मग छावणी आजार विटाळापासून शुद्ध स्वच्छ राहील; कारण मी छावणीत तुमच्याबरोबर राहत आहे.”
4. तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मानून त्या लोकांस छावणीबाहेर काढून टाकले. लेवी. 6:1-7 PEPS
5. {अपराधाबद्दल होणारा दंड} PS परमेश्वर पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
6. इस्राएल लोकांस हे सांग की एखादा पुरुष वा स्त्री दुसऱ्याचा अपराध करील तर खरे पाहता तो परमेश्वराविरूद्धच पाप करील म्हणून तो दोषी ठरेल.
7. तेव्हा त्या मनुष्याने आपला अपराध कबूल करावा. मग ज्याचा त्याने अपराध केला आहे त्याची त्याने पूर्णपणे भरपाई करावी त्या भरपाईत आणखी एक पंचमांशाची भर घालून ज्याचा त्याने अपराध केला आहे त्यास ती सर्व द्यावी. PEPS
8. पण ज्याच्यावर अपराध घडला आहे तो मेला आणि अपराधाबद्दलची भरपाई घेण्यास त्याचे जवळचे कोणी नातलग नसतील तर त्या अपराधी मनुष्याने ती भरपाई परमेश्वरास अर्पण करावी. त्याने ती पूर्ण भरपाई याजकाकडे द्यावी. याजकाने त्या अपराध्याच्या प्रायश्चितासाठी प्रायश्चिताचा मेंढा अर्पण करावा परंतु राहिलेली भरपाई याजकाने ठेवावी.
9. “जर कोणी इस्राएली लोकांमधून परमेश्वरास समर्पित करण्याकरिता काही विशेष देणगी याजकाकडे देईल तर ती याजकाने ठेवून घ्यावी; ती त्याचीच होईल.
10. प्रत्येक मनुष्याने पवित्र केलेल्या वस्तू त्या याजकाच्याच होत. याजकाला कोणी काही दिले तर ते त्याचेच होईल.” PS
11. {प्रेमशंकेविषयी नियम} PS मग परमेश्वर पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
12. इस्राएल लोकांस असे सांग की एखाद्या मनुष्याच्या पत्नीने त्याचा विश्वासघात केला. PEPS
13. म्हणजे तिने दुसऱ्या मनुष्याशी कुकर्म केले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेवली तर कोणी साक्षीदार नसल्यामुळे हे कुकर्म तिच्या नवऱ्याला कधीच कळणार नाही; ती स्वत: तर आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगणारच नाही;
14. आणि तिच्या पतीच्या मनात प्रेमशंका उदभवली आणि आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्यास संशय येऊन ती जर खरोखर भ्रष्ट झालेली असली अथवा तिच्या पतीच्या मनात प्रेमशंका उदभवून आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्यास संशय आला आणि ती वास्तविक भ्रष्ट झालेली नसली. PEPS
15. जर असे झाले, तर त्या मनुष्याने आपल्या पत्नीला याजकाकडे घेऊन जावे. तसेच त्याने अर्पण म्हणून एक दशमांश एफा जवाचे पीठ अर्पावे; त्याच्यावर त्याने तेल ओतू नये किंवा धूप ठेवू नये; कारण परप्रेमशंकेमुळे केलेले म्हणजे अनीतीचे स्मरण करून देणारे हे अन्नार्पण होय. PEPS
16. याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे.
17. मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे पवित्र निवासमंडपाच्या जमिनीवरील थोडीशी धूळ त्यामध्ये टाकावी. PEPS
18. याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे रहावयास सांगावे. मग त्याने तिच्या डोक्याचे केस सोडावे, आणि द्वेषामुळे अर्पण करण्यासाठी आणिलेले जवाचे पीठ तिच्या हातावर ठेवावे. त्याचवेळी याजकाने शाप आणणारे जे कडू पाणी आपल्या हातात घ्यावे;
19. मग त्या याजकाने त्या स्त्रीला खोटे बोलण्याबद्दल सूचना द्यावी. तसेच तिने खरे सांगण्याचे वचन द्यावे. याजकाने तिला म्हणावे; तू लग्न झालेल्या तुझ्या नवऱ्याविरूद्ध पाप करून दुसऱ्या पुरुषाबरोबर कुकर्म केले नसेल तर मग या शाप देणाऱ्या कडू पाण्यापासून मुक्त हो. PEPS
20. परंतु तू जर तुझ्या नवऱ्या विरूद्ध पाप केले असेल, तू दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध केला असशील तर मग तू भ्रष्ट झाली आहेस.
21. मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरापुढे शापाची शपथ घ्यावयास सांगावे; परमेश्वर तुझी मांडी सडवील तुझे पोट फुगविल तेव्हा परमेश्वर तुला लोकांच्या शापाला तिरस्काराला पात्र करो.
22. याजकाने म्हणावे, म्हणजे तुझे पोट फुगविण्यासाठी * तुला वांझ करण्यासाठी मांडी सडविण्यासाठी हे शापजनक पाणी तुझ्या आतड्यात शिरेल. मग त्या स्त्रीने आमेन, आमेन असे म्हणावे. PEPS
23. मग याजकाने हे शापशब्द पुस्तकात लिहून ते कडू पाण्यात धुवावे. PEPS
24. मग ते शापित कडू पाणी त्या स्त्रीने प्यावे. हे पाणी तिच्या पोटात जाईल आणि तिच्या पोटात कडूपणा उत्पन्न करील.
25. नंतर याजकाने ते द्वेषाबद्दलचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदीजवळ घेऊन जावे.
26. मग त्यातील मूठभर अन्नार्पण घेऊन त्याचे स्मारक म्हणून ते वेदीवर जाळावे. त्यानंतर याजकाने त्या स्त्रीला हे पाणी पिण्यास सांगावे. PEPS
27. जर त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध अपराध केला असेल तर शापजनक पाणी पाजल्यावर ते तिच्या पोटात जाईल कडूपणा उत्पन्न करील. तिचे पोट फुगेल, तिची मांडी सडेल तिच्या लोकात तिचे नाव शापित होईल.
28. परंतु त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध पाप केले नसेल ती शुद्ध असेल तर ती स्त्री अपराधी नाही असे याजकाने तिला सांगावे. मग ती मुक्त होईल गर्भधारणेस पात्र ठरेल. PEPS
29. तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरूद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी.
30. किंवा एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीने आपल्या विरूद्ध पाप केले आहे असा संशय द्वेष, धरला तर त्या मनुष्याने अशी कारवाई करावी; त्या मनुष्याने याजकाने स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे सांगितलेल्या नियमाप्रमाणे तिच्याविरूद्ध कारवाई करावी. PEPS
31. मग पती अधर्म करण्यापासून मुक्त होईल परंतु जर स्त्रीने पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल. PE
Total 36 Chapters, Current Chapter 5 of Total Chapters 36
×

Alert

×

marathi Letters Keypad References