मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1. {नाजीरांसंबंधी नियम} [PS] परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2. इस्राएल लोकांशी बोल. त्यांना सांग, जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री आपणास परमेश्वरासाठी वेगळे होऊन नाजीराचा [* वेगळा केलेला] विशेष नवस करील,
3. त्याने मद्य किंवा मादक द्रव्यापासून दूर रहावे. त्याने मद्यापासून केलेला शिरका किंवा मादक पेय पिऊ नये. त्याने द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये किंवा ताजी द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत.
4. तो माझ्यासाठी वेगळा झाला त्या सर्व दिवसात, त्याने द्राक्षापासून केलेली प्रत्येक गोष्ट, जी बियापासून ते सालपटापर्यंत समाविष्ट आहे काहीच खाऊ नये. [PE][PS]
5. त्याने परमेश्वरासाठी वेगळे राहण्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्याच्या नवसाच्या दिवसापर्यंत त्याच्या डोक्यावर वस्तऱ्याचा उपयोग करू नये. तो देवासाठी वेगळा केला आहे. त्याने आपल्या डोक्याचे केस लांब वाढू द्यावेत. [PE][PS]
6. त्याने आपल्या स्वतःला परमेश्वरासाठी वेगळे केलेल्या सर्व दिवसात, त्याने प्रेताजवळ जाऊ नये.
7. त्याच्या स्वत:चा बाप, आई, भाऊ किंवा बहीण जर कोणी मरण पावले तर त्यांच्याकरिता अशुद्ध होऊ नये. कारण तो देवासाठी वेगळा केलेला आहे, जसे प्रत्येकजण त्याच्या डोक्यावरील लांब केस पाहतील.
8. आपल्या वेगळे राहण्याच्या सर्व दिवसात तो परमेश्वरासाठी पवित्र, राखीव आहे. [PE][PS]
9. जर कोणी अचानक त्याच्याजवळ मरण पावला आणि त्याने वेगळा केलेला मनुष्य अशुद्ध झाला, तर त्याने आपल्या शुद्धीकरण्याच्या दिवशी डोक्याचे मुंडण करावे, म्हणजे ते सातव्या दिवसानंतर करावे. तेव्हा त्याने आपले डोके मुंडावे. [PE][PS]
10. आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी याजकाकडे आणावीत.
11. मग याजकाने एक पक्षी पापार्पण व दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे त्याच्यासाठी प्रायश्चित आहे कारण प्रेताजवळ जाऊन त्याने पाप केले. त्याने त्याच दिवशी आपल्या स्वतःला पुन्हा पवित्र करावे. [PE][PS]
12. त्याने परमेश्वरासाठी वेगळे होण्यासाठी स्वत:ला पुन्हा समर्पित करावे. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा. त्याने आपल्याला अशुद्ध करून घेण्याच्या पूर्वीचे दिवस मोजू नयेत. कारण तो देवासाठी वेगळा झाला तेव्हा तो अशुद्ध झाला होता. [PE][PS]
13. मग त्याच्या नाजीरपणाच्या नवसाचे दिवस पूर्ण झाल्यावर त्यास दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आणावे.
14. त्याने आपले अर्पण परमेश्वरास भेट द्यावे. त्याने होमबलि म्हणून एक वर्षाचा व दोषहीन मेंढा अर्पावा. त्याने पापबलि म्हणून एक वर्षाची व दोषहीन मेंढी अर्पावी, त्याने शांत्यर्पणासाठी एक दोषहीन मेंढा आणावा.
15. त्याने तेलात मळलेल्या मैद्याच्या एक टोपलीभर बेखमीर भाकरीसुद्धा आणाव्या व तेल लावलेले बेखमीर पापड त्याबरोबर त्यांचे अन्नार्पणे व पेयार्पणे आणावीत. [PE][PS]
16. याजकाने ती परमेश्वरापुढे सादर करावी. त्याने त्याचे पापार्पण व होमार्पण परमेश्वरास अर्पावेत;
17. त्याने बेखमीर भाकरीच्या टोपलीबरोबर, परमेश्वराकरता शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी मेंढा सादर करावा. याजकाने अन्नार्पण व पेयार्पणही सादर करावी. [PE][PS]
18. मग नाजीराने आपण देवासाठी वेगळे झालेल्याचे चिन्ह म्हणून दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आपल्या डोक्याचे मुंडण करावे. त्याने त्याच्या डोक्यापासूनचे केस घ्यावे आणि शांत्यर्पणाच्या यज्ञाखाली अग्नी आहे त्याच्यावर ठेवावेत. [PE][PS]
19. नाजीराने आपण वेगळेपणाचे असलेले चिन्ह म्हणजे त्याने डोक्याचे मुंडण केल्यावर याजकाने मेंढ्याचा शिजविलेला फरा, टोपलीतून एक बेखमीर भाकर व एक बेखमीर पापड घेऊन त्याच्या हातावर ठेवावी.
20. मग याजकाने ते अर्पणाप्रमाणे परमेश्वरासमोर उंच करून त्यास सादर करावे. जे मेंढ्याचे ऊर व मांडीसह एकत्रित परमेश्वरापुढे उंच केलेले हे याजकासाठी राखून ठेवलेले पवित्र अन्न आहे. त्यानंतर नाजीर मद्य पिऊ शकतो. [PE][PS]
21. “जो कोणी नाजीर आपल्या वेगळेपणाचा परमेश्वरास अर्पण करण्याचा नवस करतो त्याचा नियम हा आहे. जे काही तो देईल, त्याने आपण घेतलेल्या शपथेचे बंधन पाळावे, तो जो नवस करतो त्या त्याच्या नाजीरपणासाठी दर्शविलेल्या नियमाप्रमाणे केले पाहिजे.” [PS]
22. {याजकांनी द्यायचा आशीर्वाद} [PS] पुन्हा परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला,
23. अहरोन व त्याच्या मुलांशी बोल. म्हण, तू इस्राएल लोकांस ह्याप्रमाणे आशीर्वाद द्या. तुम्ही त्यांना म्हणावे. [PE][PS]
24. परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. [PE][PS]
25. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो, तुझ्याकडे पाहो व तुजवर दया करो. [PE][PS]
26. परमेश्वर आपल्या प्रसन्नमुखासह तुजकडे पाहो व तुला शांती देवो. [PE][PS]
27. याप्रमाणे त्यांनी माझे नाव इस्राएल लोकांस द्यावे. मग मी त्यांना आशीर्वाद देईन. [PE]

Notes

No Verse Added

Total 36 Chapters, Current Chapter 6 of Total Chapters 36
गणना 6
1. {नाजीरांसंबंधी नियम} PS परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2. इस्राएल लोकांशी बोल. त्यांना सांग, जेव्हा कोणी पुरुष किंवा स्त्री आपणास परमेश्वरासाठी वेगळे होऊन नाजीराचा * वेगळा केलेला विशेष नवस करील,
3. त्याने मद्य किंवा मादक द्रव्यापासून दूर रहावे. त्याने मद्यापासून केलेला शिरका किंवा मादक पेय पिऊ नये. त्याने द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये किंवा ताजी द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत.
4. तो माझ्यासाठी वेगळा झाला त्या सर्व दिवसात, त्याने द्राक्षापासून केलेली प्रत्येक गोष्ट, जी बियापासून ते सालपटापर्यंत समाविष्ट आहे काहीच खाऊ नये. PEPS
5. त्याने परमेश्वरासाठी वेगळे राहण्याचा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्याच्या नवसाच्या दिवसापर्यंत त्याच्या डोक्यावर वस्तऱ्याचा उपयोग करू नये. तो देवासाठी वेगळा केला आहे. त्याने आपल्या डोक्याचे केस लांब वाढू द्यावेत. PEPS
6. त्याने आपल्या स्वतःला परमेश्वरासाठी वेगळे केलेल्या सर्व दिवसात, त्याने प्रेताजवळ जाऊ नये.
7. त्याच्या स्वत:चा बाप, आई, भाऊ किंवा बहीण जर कोणी मरण पावले तर त्यांच्याकरिता अशुद्ध होऊ नये. कारण तो देवासाठी वेगळा केलेला आहे, जसे प्रत्येकजण त्याच्या डोक्यावरील लांब केस पाहतील.
8. आपल्या वेगळे राहण्याच्या सर्व दिवसात तो परमेश्वरासाठी पवित्र, राखीव आहे. PEPS
9. जर कोणी अचानक त्याच्याजवळ मरण पावला आणि त्याने वेगळा केलेला मनुष्य अशुद्ध झाला, तर त्याने आपल्या शुद्धीकरण्याच्या दिवशी डोक्याचे मुंडण करावे, म्हणजे ते सातव्या दिवसानंतर करावे. तेव्हा त्याने आपले डोके मुंडावे. PEPS
10. आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी याजकाकडे आणावीत.
11. मग याजकाने एक पक्षी पापार्पण दुसऱ्याचा होमार्पण करावा. हे त्याच्यासाठी प्रायश्चित आहे कारण प्रेताजवळ जाऊन त्याने पाप केले. त्याने त्याच दिवशी आपल्या स्वतःला पुन्हा पवित्र करावे. PEPS
12. त्याने परमेश्वरासाठी वेगळे होण्यासाठी स्वत:ला पुन्हा समर्पित करावे. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा. त्याने आपल्याला अशुद्ध करून घेण्याच्या पूर्वीचे दिवस मोजू नयेत. कारण तो देवासाठी वेगळा झाला तेव्हा तो अशुद्ध झाला होता. PEPS
13. मग त्याच्या नाजीरपणाच्या नवसाचे दिवस पूर्ण झाल्यावर त्यास दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आणावे.
14. त्याने आपले अर्पण परमेश्वरास भेट द्यावे. त्याने होमबलि म्हणून एक वर्षाचा दोषहीन मेंढा अर्पावा. त्याने पापबलि म्हणून एक वर्षाची दोषहीन मेंढी अर्पावी, त्याने शांत्यर्पणासाठी एक दोषहीन मेंढा आणावा.
15. त्याने तेलात मळलेल्या मैद्याच्या एक टोपलीभर बेखमीर भाकरीसुद्धा आणाव्या तेल लावलेले बेखमीर पापड त्याबरोबर त्यांचे अन्नार्पणे पेयार्पणे आणावीत. PEPS
16. याजकाने ती परमेश्वरापुढे सादर करावी. त्याने त्याचे पापार्पण होमार्पण परमेश्वरास अर्पावेत;
17. त्याने बेखमीर भाकरीच्या टोपलीबरोबर, परमेश्वराकरता शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी मेंढा सादर करावा. याजकाने अन्नार्पण पेयार्पणही सादर करावी. PEPS
18. मग नाजीराने आपण देवासाठी वेगळे झालेल्याचे चिन्ह म्हणून दर्शनमंडपाच्या प्रवेशदारापाशी आपल्या डोक्याचे मुंडण करावे. त्याने त्याच्या डोक्यापासूनचे केस घ्यावे आणि शांत्यर्पणाच्या यज्ञाखाली अग्नी आहे त्याच्यावर ठेवावेत. PEPS
19. नाजीराने आपण वेगळेपणाचे असलेले चिन्ह म्हणजे त्याने डोक्याचे मुंडण केल्यावर याजकाने मेंढ्याचा शिजविलेला फरा, टोपलीतून एक बेखमीर भाकर एक बेखमीर पापड घेऊन त्याच्या हातावर ठेवावी.
20. मग याजकाने ते अर्पणाप्रमाणे परमेश्वरासमोर उंच करून त्यास सादर करावे. जे मेंढ्याचे ऊर मांडीसह एकत्रित परमेश्वरापुढे उंच केलेले हे याजकासाठी राखून ठेवलेले पवित्र अन्न आहे. त्यानंतर नाजीर मद्य पिऊ शकतो. PEPS
21. “जो कोणी नाजीर आपल्या वेगळेपणाचा परमेश्वरास अर्पण करण्याचा नवस करतो त्याचा नियम हा आहे. जे काही तो देईल, त्याने आपण घेतलेल्या शपथेचे बंधन पाळावे, तो जो नवस करतो त्या त्याच्या नाजीरपणासाठी दर्शविलेल्या नियमाप्रमाणे केले पाहिजे.” PS
22. {याजकांनी द्यायचा आशीर्वाद} PS पुन्हा परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला,
23. अहरोन त्याच्या मुलांशी बोल. म्हण, तू इस्राएल लोकांस ह्याप्रमाणे आशीर्वाद द्या. तुम्ही त्यांना म्हणावे. PEPS
24. परमेश्वर तुला आशीर्वाद देवो तुझे संरक्षण करो. PEPS
25. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो, तुझ्याकडे पाहो तुजवर दया करो. PEPS
26. परमेश्वर आपल्या प्रसन्नमुखासह तुजकडे पाहो तुला शांती देवो. PEPS
27. याप्रमाणे त्यांनी माझे नाव इस्राएल लोकांस द्यावे. मग मी त्यांना आशीर्वाद देईन. PE
Total 36 Chapters, Current Chapter 6 of Total Chapters 36
×

Alert

×

marathi Letters Keypad References