1. {#1नीतिसूत्रांचे मोल }
2. [PS]इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे. [PE][QS]ज्ञान व शिक्षण शिकावे, [QE][QS]बुद्धीच्या वचनाचे ज्ञान मिळवावे, [QE]
3. [QS]सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे, [QE]
4. [QS]भोळ्यांना शहाणपण [QE][QS]आणि तरुणांना ज्ञान व दूरदर्शीपणा द्यावे, [QE]
5. [QS]ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे, [QE][QS]बुद्धीमान व्यक्तीला मार्गदर्शन मिळावे, [QE]
6. [QS]ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी, [QE][QS]म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत. [QE]
7. [QS]परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे, [QE][QS]मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात. [QE]
8. {#1आदेश आणि ताकीद } [QS]माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक, [QE][QS]आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस; [QE]
9. [QS]ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन [QE][QS]आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे. [QE]
10. [QS]माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो, [QE][QS]तर त्याच्यामागे जाण्यास नकार दे; [QE]
11. [QS]जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू; [QE][QS]आपण लपू व निष्कारण निष्पाप व्यक्तीवर हल्ला करू. [QE]
12. [QS]जसे अधोलोक निरोग्यांना गिळून [QE][QS]गर्तेत पडणाऱ्यांसारखे करतो तसे आपण त्यांना जिवंतपणीच गिळून टाकू. [QE]
13. [QS]आपणांस सर्व प्रकारच्या मौलवान वस्तू मिळतील; [QE][QS]आपण इतरांकडून जे चोरून त्याने आपण आपली घरे भरू. [QE]
14. [QS]तू आपला वाटा आम्हाबरोबर टाक, [QE][QS]आपण सर्व मिळून एकच पिशवी घेऊ.” [QE]
15. [QS]माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस; [QE][QS]ते जेथून चालतात त्याचा स्पर्शही तुझ्या पावलांना होऊ देऊ नकोस; [QE]
16. [QS]त्यांचे पाय दुष्कृत्ये करायला धावतात, [QE][QS]आणि ते रक्त पाडायला घाई करतात. [QE]
17. [QS]एखादा पक्षी पाहत असतांना, [QE][QS]त्यास फसवण्यासाठी जाळे पसरणे व्यर्थ आहे. [QE]
18. [QS]ही माणसे तर आपल्या स्वतःचा घात करण्यासाठी टपतात. [QE][QS]ते आपल्या स्वतःसाठी सापळा रचतात. [QE]
19. [QS]जो अन्यायाने संपत्ती मिळवतो त्या प्रत्येकाचे मार्ग असेच आहेत; [QE][QS]अन्यायी धन ज्यांनी धरून ठेवले आहे ते त्यांचाही जीव घेते. [QE]
20. {#1ज्ञानाची विनंती } [QS]ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, [QE][QS]ते उघड्या जागेवर आपली वाणी उच्चारते; [QE]
21. [QS]ती गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावरून घोषणा करते, [QE][QS]शहराच्या प्रवेशद्वारापाशी घोषणा करते, [QE]
22. [QS]“अहो भोळ्यांनो, जे काही तुम्हास समजत नाही त्याची किती वेळ आवड धरणार? [QE][QS]तुम्ही चेष्टा करणारे, किती वेळ चेष्टा करण्यात आनंद पावणार, [QE][QS]आणि मूर्ख किती वेळ ज्ञानाचा तिरस्कार करणार? [QE]
23. [QS]तुम्ही माझ्या निषेधाकडे लक्ष द्या; [QE][QS]मी आपले विचार तुम्हावर ओतीन; [QE][QS]मी आपली वचने तुम्हास कळवीन. [QE]
24. [QS]मी बोलावले पण तुम्ही ऐकायला नकार दिला; [QE][QS]मी आपला हात पुढे केला, पण कोणीही लक्ष दिले नाही. [QE]
25. [QS]परंतु तुम्ही माझ्या सर्व शिक्षणाचा अव्हेर केला [QE][QS]आणि माझ्या दोषारोपाकडे दुर्लक्ष केले. [QE]
26. [QS]म्हणून मीही तुमच्या संकटाना हसेन, [QE][QS]तुमच्यावर संकटे आलेली पाहून मी थट्टा करीन. [QE]
27. [QS]जेव्हा वादळांप्रमाणे तुमच्यावर भितीदायक दहशत येईल, [QE][QS]आणि तुफानाप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील; [QE][QS]जेव्हा संकटे आणि दु:ख तुम्हावर येतील. [QE]
28. [QS]ते मला हाका मारतील आणि मी त्यांना उत्तर देणार नाही; [QE][QS]ते माझा झटून शोध करतील, पण मी त्यांना सापडणार नाही. [QE]
29. [QS]कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला; [QE][QS]आणि परमेश्वराचे भय निवडून घेतले नाही, [QE]
30. [QS]त्यांनी माझ्या शिक्षणास नकार दिला, [QE][QS]आणि त्यांनी माझी तोंडची शिक्षा अवमानली. [QE]
31. [QS]म्हणून ते आपल्या वर्तणुकीचे फळ खातील [QE][QS]आणि आपल्याच योजनांच्या फळाने भरले जातील. [QE]
32. [QS]कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल; [QE][QS]आणि मूर्खाचे स्वस्थपण त्याचा नाश करील. [QE]
33. [QS]परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. [QE][QS]आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.” [QE]