1. [QS]यथार्थ नसलेल्या तराजूचा परमेश्वरास वीट आहे, [QE][QS]पण तंतोतंत वजनात त्यास आनंद आहे. [QE]
2. [QS]जेव्हा गर्व येतो नंतर अप्रतिष्ठा येते, [QE][QS]पण विनम्रते बरोबर ज्ञान येते. [QE]
3. [QS]सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो, [QE][QS]पण विश्वासघातक्यांचा वाकडा मार्ग त्यांचा नाश करतो. [QE]
4. [QS]क्रोधाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी आहे, [QE][QS]परंतु नीतिमत्ता तुम्हास मरणापासून वाचवते. [QE]
5. [QS]निर्दोष व्यक्तीची सात्विक वागणूक त्याचे मार्ग सरळ करते, [QE][QS]परंतु दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावतो. [QE]
6. [QS]जे देवाला प्रसन्न करतात त्यांचा सात्विकपणा त्यांना सुरक्षित ठेविल, [QE][QS]पण फसवणारा आपल्या दुष्कृतीनेच सापळ्यात अडकतो. [QE]
7. [QS]जेव्हा दुष्ट मनुष्य मरतो, त्याची आशा नष्ट होते; [QE][QS]आणि त्याचा भरवसा त्याच्या शक्तीत होता तो निष्फळ होतो. [QE]
8. [QS]नीतिमान संकटापासून दूर राहतो; [QE][QS]आणि त्याच्याऐवजी ती दुष्टांवर येतात. [QE]
9. [QS]अधर्मी आपल्या तोंडाने शेजाऱ्याचा नाश करतो, [QE][QS]पण नीतिमान आपल्या ज्ञानाने सुरक्षित राहतो. [QE]
10. [QS]जेव्हा नीतिमानाची उन्नती होते तेव्हा नगर आनंदित होते; [QE][QS]जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा तेथे आनंदाचा जयघोष होतो. [QE]
11. [QS]जो कोणी आपल्या चांगल्या दानांनी देवाला संतोषवितो, तेव्हा नगर मोठे होते; [QE][QS]दुष्टांच्या तोंडामुळे नगर उद्ध्वस्त होते. [QE]
12. [QS]जो मनुष्य आपल्या मित्राला तुच्छ लेखतो तो बुद्धिहीन आहे, [QE][QS]परंतु समजदार मनुष्य शांत राहतो. [QE]
13. [QS]जो कोणी निंदा करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, [QE][QS]परंतु जो विश्वासू व्यक्ती असतो तो त्यावर झाकण घालतो. [QE]
14. [QS]जेथे कोठे शहाण्याचे मार्गदर्शन नसते, राष्ट्र पडते, [QE][QS]पण पुष्कळ सल्लागार असल्याने विजय मिळतो. [QE]
15. [QS]जो कोणी अपरिचिताला जामीन राहील, त्याची खात्रीने हानी होईल, [QE][QS]परंतु जो कोणी त्याप्रकारची शपथ देण्याचे वचन देतो, तो त्याचा द्वेष करतो, तो सुरक्षित राहतो. [QE]
16. [QS]कृपाळू स्त्रीस आदर मिळतो, [QE][QS]परंतु निर्दयी लोक संपत्ती घट्ट पकडतात. [QE]
17. [QS]दयाळू मनुष्य आपले हित करतो, [QE][QS]पण जो क्रूर असतो तो स्वत:ला इजा करून घेतो. [QE]
18. [QS]दुष्ट मनुष्य त्याचे वेतन मिळविण्यासाठी लबाड बोलतो, [QE][QS]परंतु जो नीतीने पेरतो त्याचे वेतन सत्याची कापणी असते. [QE]
19. [QS]जो प्रामाणिक व्यक्ती नीतीने राहतो त्यास जीवन मिळेल, [QE][QS]पण जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्त्यू आणतो. [QE]
20. [QS]जे मनाचे कुटिल असतात त्यांचा परमेश्वरास वीट आहे, [QE][QS]पण ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत त्यांच्याविषयी त्यास आनंद वाटतो. [QE]
21. [QS]दुष्टांना शासन झाल्यावाचून राहणार नाही याची खात्री बाळगा, [QE][QS]परंतु नीतिमानांच्या वंशजांना सुरक्षित ठेवले जाईल. [QE]
22. [QS]डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, [QE][QS]तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी. [QE]
23. [QS]जे चांगले करतात त्यांच्या इच्छेचे परिणाम चांगलेच असतात; [QE][QS]पण दुष्टांची आशा फक्त क्रोधच असते. [QE]
24. [QS]तेथे कोणी एकजन बी पेरतो तो अधिक गोळा करतो; [QE][QS]दुसरा पेरीत नाही तो दरिद्री होईल. [QE]
25. [QS]उदार मनाचा इसम समृद्ध होतो, [QE][QS]आणि जो दुसऱ्याला पाणी पाजतो त्यास स्वतःला ते पाजण्यात येईल. [QE]
26. [QS]जो मनुष्य त्याचे धान्य विकायला नकार देतो त्यास लोक शाप देतात, [QE][QS]पण जो ते विकतो त्याच्या मस्तकी चांगल्या दानाचा मुकुट प्राप्त होईल. [QE]
27. [QS]जो कोणी परिश्रमाने चांगल्याचा शोध घेतो तो अनुग्रहाचा शोध करतो, [QE][QS]पण जो कोणी वाईटाचा शोध घेतो त्यास तेच प्राप्त होईल. [QE]
28. [QS]जो कोणी आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पडेल, [QE][QS]परंतु नीतिमान पानाप्रमाणे झपाट्याने वाढेल. [QE]
29. [QS]जो कोणी आपल्या स्वतःच्या घरावर संकटे आणतो त्याचे वतन वारा होईल, [QE][QS]आणि मूर्ख मनुष्य शहाण्याच्या हृदयाचा सेवक होईल. [QE]
30. [QS]नीतिमानाचे जीवन वृक्षासारखे आहे, [QE][QS]पण हिंसाचार जीवन दूर नेतो. [QE]
31. [QS]जर नीतिमानाला त्याच्या लायकीप्रमाणे फळ मिळते; [QE][QS]तर दुर्जनाला व पाप्याला किती अधिक मिळेल! [QE]