1. [QS]सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो, [QE][QS]परंतु निंदक निषेध ऐकत नाही. [QE]
2. [QS]आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो, [QE][QS]पण अविश्वासणाऱ्याची भूक जुलूम आहे. [QE]
3. [QS]जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो, [QE][QS]परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो. [QE]
4. [QS]आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही, [QE][QS]पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते. [QE]
5. [QS]नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो, [QE][QS]पण दुर्जन जे लाजिरवाणे आहे ते करतो, आणि स्वतःला किळसवाणे करतो. [QE]
6. [QS]नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते, [QE][QS]पण पाप्याला त्याचे पाप उलथून टाकते. [QE]
7. [QS]जो कोणी आपणाला संपन्न करतो, पण त्यांच्याजवळ मात्र काहीच नसते, [QE][QS]आणि जो कोणी सर्वकाही देऊन टाकतो, खरोखर तो अजून श्रीमंत आहे. [QE]
8. [QS]श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे, [QE][QS]पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत. [QE]
9. [QS]नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो, [QE][QS]पण दुष्टाचा दीप मालवला जाईल. [QE]
10. [QS]गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात, [QE][QS]पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते. [QE]
11. [QS]वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते, [QE][QS]पण जो आपल्या हाताने काम करून पैसा कमावतो, त्याचा पैसा वाढत जातो. [QE]
12. [QS]जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते, [QE][QS]परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे. [QE]
13. [QS]जो कोणी शिक्षणाचा तिरस्कार करतो तो स्वतःवर अनर्थ आणतो, [QE][QS]पण जो कोणी आज्ञेचा आदर करतो त्यास प्रतिफळ मिळेल. [QE]
14. [QS]सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे, [QE][QS]ते तुम्हास मृत्युपाशापासून दूर वळविल. [QE]
15. [QS]सुबोध अनुग्रह मिळवून देतो, [QE][QS]पण विश्वासघातक्याचा मार्ग कधी न संपणारा आहे. [QE]
16. [QS]शहाणा मनुष्य कृती करण्याआधी विचार करतो. [QE][QS]परंतु मूर्ख मनुष्य त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो. [QE]
17. [QS]दुष्ट निरोप्या संकटात पडतो, [QE][QS]पण विश्वासू वकील समेट घडवून आणतो. [QE]
18. [QS]जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल, [QE][QS]पण जर एखादा त्याच्या शासनातून शिकला तर त्याचा सन्मान होईल. [QE]
19. [QS]इच्छातृप्ती जिवाला गोड लागते, [QE][QS]पण वाईटापासून दूर होणे याचा मूर्खांना द्वेष वाटतो. [QE]
20. [QS]शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल, [QE][QS]पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल. [QE]
21. [QS]आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते, [QE][QS]पण जे कोणी चांगले करतो त्यास प्रतिफळ मिळते. [QE]
22. [QS]चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो, [QE][QS]पण पाप्यांची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते. [QE]
23. [QS]गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते, [QE][QS]पण अन्यायामुळे अनेकांचा नाश होतो. [QE]
24. [QS]जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो, [QE][QS]पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो. [QE]
25. [QS]जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो, [QE][QS]पण दुष्टांचे पोट रिकामेच राहते. [QE]