1. [QS]सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, [QE][QS]पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते. [QE]
2. [QS]जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, [QE][QS]पण जो कोणी आपल्या मार्गात अप्रामाणिक आहे तो त्यास तुच्छ मानतो. [QE]
3. [QS]मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, [QE][QS]पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते. [QE]
4. [QS]गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो, [QE][QS]पण बैलाच्या बलाने विपुल पिक येऊ शकते. [QE]
5. [QS]विश्वासू साक्षीदार खोटे बोलत नाही, [QE][QS]पण खोटा साक्षीदार मुखाने लबाड्या करतो. [QE]
6. [QS]निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही, [QE][QS]पण जो कोणी बुद्धिमान आहे त्यास ज्ञान मिळवणे सोपे आहे. [QE]
7. [QS]मूर्ख मनुष्यापासून दूर जा, [QE][QS]कारण त्याच्या वाणीत तुला काही ज्ञान सापडणार नाही. [QE]
8. [QS]शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे, [QE][QS]परंतु मूर्खाचे मूर्खपण कपट आहे. [QE]
9. [QS]मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते, [QE][QS]पण सरळांमध्ये परस्पर कृपा असते. [QE]
10. [QS]हृदयाला आपल्या स्वतःच्या खेदाची जाणीव असते, [QE][QS]आणि त्याच्या आनंदात परक्याला भाग नाही. [QE]
11. [QS]दुष्टाच्या घराचा नाश होईल, [QE][QS]पण सरळांच्या तंबूची भरभराट होईल. [QE]
12. [QS]मनुष्यास एक मार्ग बरोबर आहे असे वाटते, [QE][QS]पण त्याचा शेवट फक्त मरणाकडे नेतो. [QE]
13. [QS]हृदय हसू शकते पण तरी त्यामध्ये वेदना असतात, [QE][QS]आणि आनंदाचा शेवट शोकात होतो. [QE]
14. [QS]जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल, [QE][QS]पण चांगल्या मनुष्यास जे काही त्याचे आहे तेच मिळेल. [QE]
15. [QS]भोळा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो, [QE][QS]पण शहाणा मनुष्य आपल्या पावलांविषयी विचार करतो. [QE]
16. [QS]शहाणा मनुष्य भय धरतो आणि वाईटापासून दूर राहतो, [QE][QS]पण मूर्ख धिटाईने इशारा विचारात घेत नाही. [QE]
17. [QS]शीघ्रकोपी मूर्खासारख्या गोष्टी करतो, [QE][QS]आणि जो वाईट योजना करतो त्या मनुष्याचा द्वेष होतो. [QE]
18. [QS]भोळ्यांना मूर्खपणाचे वतन मिळते, [QE][QS]पण शहाणे ज्ञानाने वेढलेले असतात. [QE]
19. [QS]दुर्जन सज्जनापुढे नमतात, [QE][QS]आणि नीतिमानाच्या दारापुढे दुष्ट नमतील. [QE]
20. [QS]गरीब मनुष्याचे स्वतःचे सोबतीसुद्धा द्वेष करतात, [QE][QS]पण श्रीमंताला खूप मित्र असतात. [QE]
21. [QS]जो कोणी आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी आहे, [QE][QS]परंतु जो कोणी गरीबावर दया दाखवतो तो आनंदी आहे. [QE]
22. [QS]जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का? [QE][QS]पण जो कोणी चांगले करण्याची योजना करतो, तो कराराचा विश्वास आणि विश्वसनियता स्वीकारतो. [QE]
23. [QS]सर्व कष्टात फायदा आहे, [QE][QS]पण जेव्हा तेथे फक्त बोलतच राहिलात, ते दारिद्र्याकडे घेऊन जाईल. [QE]
24. [QS]शहाण्याची संपत्ती त्याचा मुकुट आहे, [QE][QS]पण मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच आणते. [QE]
25. [QS]खरा साक्षी जीव वाचवतो, [QE][QS]पण खोटा साक्षीदार लबाड्या करतो तो दगलबाज आहे. [QE]
26. [QS]परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे, [QE][QS]आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत. [QE]
27. [QS]परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे, [QE][QS]याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर रहावे. [QE]
28. [QS]प्रजावृद्धित राजाचे गौरव सापडते, [QE][QS]पण प्रजेशिवाय राजपुत्राचा नाश आहे. [QE]
29. [QS]सहनशील मनुष्य खूप समजदार असतो, [QE][QS]पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो. [QE]
30. [QS]शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, [QE][QS]पण मत्सराने हाडे कुजतात. [QE]
31. [QS]जो मनुष्य गरीबांवर जुलूम करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याला शाप देतो, [QE][QS]परंतु जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो. [QE]
32. [QS]दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो, [QE][QS]पण नीतिमानाला मरणाच्या वेळेसही आश्रय मिळतो. [QE]
33. [QS]बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते, [QE][QS]पण मूर्खाच्या अंतर्यामात जे असते ते कळून येते. [QE]
34. [QS]योग्य ते केल्याने राष्ट्राची उन्नती होते, [QE][QS]पण पाप लोकांस कलंक आहे. [QE]
35. [QS]शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते, [QE][QS]पण जो लज्जास्पद कृत्य करतो त्याच्यासाठी त्याचा राग आहे. [QE]