1. सुज्ञ स्त्री आपले घर बांधते, [QBR] पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते. [QBR]
2. जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो, [QBR] पण जो कोणी आपल्या मार्गात अप्रामाणिक आहे तो त्यास तुच्छ मानतो. [QBR]
3. मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते, [QBR] पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते. [QBR]
4. गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो, [QBR] पण बैलाच्या बलाने विपुल पिक येऊ शकते. [QBR]
5. विश्वासू साक्षीदार खोटे बोलत नाही, [QBR] पण खोटा साक्षीदार मुखाने लबाड्या करतो. [QBR]
6. निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही, [QBR] पण जो कोणी बुद्धिमान आहे त्यास ज्ञान मिळवणे सोपे आहे. [QBR]
7. मूर्ख मनुष्यापासून दूर जा, [QBR] कारण त्याच्या वाणीत तुला काही ज्ञान सापडणार नाही. [QBR]
8. शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे, [QBR] परंतु मूर्खाचे मूर्खपण कपट आहे. [QBR]
9. मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते, [QBR] पण सरळांमध्ये परस्पर कृपा असते. [QBR]
10. हृदयाला आपल्या स्वतःच्या खेदाची जाणीव असते, [QBR] आणि त्याच्या आनंदात परक्याला भाग नाही. [QBR]
11. दुष्टाच्या घराचा नाश होईल, [QBR] पण सरळांच्या तंबूची भरभराट होईल. [QBR]
12. मनुष्यास एक मार्ग बरोबर आहे असे वाटते, [QBR] पण त्याचा शेवट फक्त मरणाकडे नेतो. [QBR]
13. हृदय हसू शकते पण तरी त्यामध्ये वेदना असतात, [QBR] आणि आनंदाचा शेवट शोकात होतो. [QBR]
14. जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल, [QBR] पण चांगल्या मनुष्यास जे काही त्याचे आहे तेच मिळेल. [QBR]
15. भोळा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो, [QBR] पण शहाणा मनुष्य आपल्या पावलांविषयी विचार करतो. [QBR]
16. शहाणा मनुष्य भय धरतो आणि वाईटापासून दूर राहतो, [QBR] पण मूर्ख धिटाईने इशारा विचारात घेत नाही. [QBR]
17. शीघ्रकोपी मूर्खासारख्या गोष्टी करतो, [QBR] आणि जो वाईट योजना करतो त्या मनुष्याचा द्वेष होतो. [QBR]
18. भोळ्यांना मूर्खपणाचे वतन मिळते, [QBR] पण शहाणे ज्ञानाने वेढलेले असतात. [QBR]
19. दुर्जन सज्जनापुढे नमतात, [QBR] आणि नीतिमानाच्या दारापुढे दुष्ट नमतील. [QBR]
20. गरीब मनुष्याचे स्वतःचे सोबतीसुद्धा द्वेष करतात, [QBR] पण श्रीमंताला खूप मित्र असतात. [QBR]
21. जो कोणी आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी आहे, [QBR] परंतु जो कोणी गरीबावर दया दाखवतो तो आनंदी आहे. [QBR]
22. जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का? [QBR] पण जो कोणी चांगले करण्याची योजना करतो, तो कराराचा विश्वास आणि विश्वसनियता स्वीकारतो. [QBR]
23. सर्व कष्टात फायदा आहे, [QBR] पण जेव्हा तेथे फक्त बोलतच राहिलात, ते दारिद्र्याकडे घेऊन जाईल. [QBR]
24. शहाण्याची संपत्ती त्याचा मुकुट आहे, [QBR] पण मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच आणते. [QBR]
25. खरा साक्षी जीव वाचवतो, [QBR] पण खोटा साक्षीदार लबाड्या करतो तो दगलबाज आहे. [QBR]
26. परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे, [QBR] आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत. [QBR]
27. परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे, [QBR] याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर रहावे. [QBR]
28. प्रजावृद्धित राजाचे गौरव सापडते, [QBR] पण प्रजेशिवाय राजपुत्राचा नाश आहे. [QBR]
29. सहनशील मनुष्य खूप समजदार असतो, [QBR] पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो. [QBR]
30. शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, [QBR] पण मत्सराने हाडे कुजतात. [QBR]
31. जो मनुष्य गरीबांवर जुलूम करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याला शाप देतो, [QBR] परंतु जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो. [QBR]
32. दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो, [QBR] पण नीतिमानाला मरणाच्या वेळेसही आश्रय मिळतो. [QBR]
33. बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते, [QBR] पण मूर्खाच्या अंतर्यामात जे असते ते कळून येते. [QBR]
34. योग्य ते केल्याने राष्ट्राची उन्नती होते, [QBR] पण पाप लोकांस कलंक आहे. [QBR]
35. शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते, [QBR] पण जो लज्जास्पद कृत्य करतो त्याच्यासाठी त्याचा राग आहे. [PE]